Saturday, May 31, 2025
दैनिक वात्रटिका l 31मे2025वर्ष- चौथेअंक - 361वा l पाने -57
अंध भक्तांचा दृष्टांत...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
------------------
अंध भक्तांचा दृष्टांत
आपण अंधभक्त झाल्याशिवाय,
दुसऱ्या अंधभक्तांशी भांडता येत नाही.
आपला आंधळा मुद्दासुद्धा,
अंधभक्तासमोर काही मांडता येत नाही.
अंधभक्ताला अंधभक्त भेटला की,
भांडणाला वेगळाच रंग चढत जातो.
असंगाशी संग झाला की,
अंधभक्ताला अंधभक्त भिडत जातो.
एकदा अंधभक्तीची ओळख पटली की,
ते वाट्टेल तसे आभाळ हाणू लागतात !
तेरी भी चुप मेरी भी चुप करीत,
एकमेकांना कट्टर भक्त म्हणू लागतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8933
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
31मे 2025
Friday, May 30, 2025
दैनिक वात्रटिका l 29 आणि30मे2025वर्ष- चौथेअंक - 359 आणि 360वा l पाने -69
एका संवादकाचे कौतुक...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
------------------
एका संवादकाचे कौतुक
महाराष्ट्रात टिकेवर चर्चा व्हायची,
आता मात्र कौतुकावर चर्चा आहे.
अड्ड्यावरच्या रंगलेल्या गप्पा ऐकून,
कुणाकुणाला मात्र मूर्च्छा आहे.
संवादाने म्हणे संवाद वाढत जातो,
महत्त्वाचा मात्र संवादक आहे.
बिटवीन द लाईन्स मधला अर्थ मात्र,
जेवढा सूचक तेवढाच वेधक आहे.
तुझ्या गळा माझ्या गळा.....
आज तरी महाराष्ट्रात हेच दृश्य आहे !
घडेल किंवा घडणार नाही,
हे बिटवीन द लाईन वरचे भाष्य आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8932
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
30मे 2025
Thursday, May 29, 2025
नेमबाजी,,,,प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
ट्रम्प कार्ड.....साप्ताहिक सरकारनामा...वात्रटिका
कोरोना वारी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
------------------
कोरोना वारी
कुणी म्हणतोय,कोरोनाला भ्या
कुणी म्हणतोय भिऊ नका.
कुणी म्हणतोय,काळजी घ्या,
उतावळे बावळे होऊ नका.
कुणी म्हणतोय,आला रे आला,
कुणी म्हणतोय, ही चाल आहे.
सगळे लोक झाले संभ्रमित,
तरी त्यांची आपलीच लाल आहे.
हे वारंवार सिद्ध झालेय,
कोरोना आपला साथी आहे !
अफवांचे विलगीकरण करा
आपले भविष्य आपल्या हाती आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8931
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
29मे 2025
Wednesday, May 28, 2025
दैनिक वात्रटिका l 28मे2025वर्ष- चौथेअंक - 358वा l पाने -57
साप्ताहिक वात्रटिका....मंत्रीपद...
हंगामी विरोधक...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
------------------
हंगामी विरोधक
सत्तेवर कधीही कुणीही असले तरी,
पाऊस त्यांचे पितळ उघडे करतो.
एकमेकांची कितीही झाकली तरी,
पाऊस त्यांना अलगद नागडे करतो.
भ्रष्टाचाऱ्यांनी ओढलेला बुरखा,
प्रत्येक पावसाळ्यामध्ये फाटू लागतो.
पाऊस कधी मांडवली करत नाही,
पाऊसच खरा विरोधी पक्ष वाटू लागतो.
शेतकऱ्यांसाठी त्याने तारक व्हावे,
पावसाला दुष्टपणा कुठे शोभतो आहे ?
साऱ्या जगाचा सत्ताधारी असूनही,
हंगामी विरोधक म्हणून लाभतो आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8930
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
28मे 2025
Tuesday, May 27, 2025
दैनिक वात्रटिका l 27मे2025वर्ष- चौथेअंक - 357वा l पाने -57
पावसाचे जलदागमन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
Monday, May 26, 2025
दैनिक वात्रटिका l 26मे2025वर्ष- चौथेअंक - 356वा l पाने -57
मान्सून घाई...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
------------------
मान्सून घाई
अवकाळी पावसाच्या कहराने,
मान्सूनचे मान्सूनपण हरवले आहे.
निसर्गाने आपले ऋतुचक्र,
यंदा जरा जोरातच फिरवले आहे.
मान्सूनची भूमिका बजावत,
अवकाळीने हैदोस घातला आहे.
गोंधळलेल्या मृगाच्या किड्यांनीसुद्धा,
पेरते व्हा चा कानोसा घेतला आहे.
चक्रावून गेले हवामान तज्ञ,
बळीराजाचीही धांदल उडली आहे !
आखडलेला उन्हाळा बघून,
टँकर लॉबीनेही अशा सोडली आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8928
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
26मे 2025
Sunday, May 25, 2025
दैनिक वात्रटिका l 25मे2025वर्ष- चौथेअंक - 355वा l पाने -57
सूचक वास्तव...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
------------------
सूचक वास्तव
कळत नाही नेमके,
कोण कुणावर मेहरनजर होतात?
जवळजवळ सगळे फरार आरोपी,
आज-काल स्वतःहूनच हजर होतात.
कुणाचा कुणावर वचक आहे?
कुणाची कुणाकडून पचक आहे?
आरोपींचे स्वतः हजर होणे,
बऱ्याच काही गोष्टींचे सूचक आहे.
हिंदी सिनेमातली प्रत्येक गोष्ट,
खरी होण्याच्या बेतात आहे !
कायदा म्हणाला सुव्यवस्थेला,
आपली इज्जत आपल्याच हातात आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8927
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
25मे 2025
Saturday, May 24, 2025
दैनिक वात्रटिका l 24मे2025वर्ष- चौथेअंक - 354वा l पाने -57
श्वानदंश ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
------------------
श्वानदंश
कुत्रे चावल्याचे परिणाम,
भलते सलते व्हायला लागले.
चल रं वाघ्या..म्हणीत म्हणीत,
कुत्र्याची बाजू घ्यायला लागले.
नको तिथे तंगडी वर....
बघा वाघ्याचा पुळका किती आहे?
जुन्या कढीला नवा उत,
सर्वश्रेष्ठ तारीख की तिथी आहे ?
अंधभक्त आणि अंध इतिहासाचार्य,
चुकूनही कुणी होता कामा नये !
आंबे गोड लागले म्हणून,
मुलासाठी खायला देता कामा नये !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8926
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
24मे 2025
Friday, May 23, 2025
आजचा अंक दैनिक वात्रटिका l 23मे2025वर्ष- चौथेअंक - 353वा l पाने -57
घोटाळ्यांची साखळी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
------------------
घोटाळ्यांची साखळी
एक जात सगळे भ्रष्टाचारी,
भ्रष्टाचारात सामील व्हायला लागले.
आरोपी राहिले बाजूला,
फिर्यादींचेच बळी जायला लागले.
घोटाळ्यांच्या चौकशीमध्येसुद्धा,
पुन्हा घोटाळेच व्हायला लागले.
घोटाळेबहाद्दरच एकमेकांना,
स्वच्छतेचे प्रमाणपत्र द्यायला लागले.
स्वच्छता प्रमाणपत्र मिळवायची,
त्यांच्याकडे युक्ती सुद्धा नामी असते !
नव्या घोटाळ्यांच्या पात्रतेसाठी,
हेच स्वच्छता प्रमाणपत्र कमी असते. !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------
फेरफटका-8925
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
23मे 2025
Thursday, May 22, 2025
दैनिक वात्रटिका l 22मे2025वर्ष- चौथेअंक - 352वा l पाने -58
वेड्यांचा बाजार...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
------------------
वेड्यांचा बाजार
आपले खाजगी आयुष्य सुद्धा,
रात्रंदिवस व्हायरल व्हायला लागले.
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी,
नको त्या थराला जायला लागले.
काय दाखवावे? काय नाही?
याचा सारासार विवेक राहिला नाही.
इन्स्टा आणि फेसबुक सारखा तमाशा,
प्रत्यक्ष कनातीतही पाहिला नाही.
पैसा आणि प्रसिद्धीच्या नशेमुळे,
आयतेच लावलेल्या जाळ्यात आहेत !
जणू दाखवणारापेक्षा बघणारेच,
सोशल मीडियावर खुळ्यात आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8924
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
22मे 2025
Wednesday, May 21, 2025
दैनिक वात्रटिका l 21मे2025वर्ष- चौथेअंक - 351वा l पाने -58
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक..
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com
मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका
.
बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..
आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 21मे2025
वर्ष- चौथे
अंक - 351वा l पाने -58
अंक डाऊनलोड लिंक -
https://drive.google.com/file/d/181lTBfk587P-DaEtDnvIZHAMWcgQFlY5/view?usp=drivesdk
काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 64
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2012 ते 2025 या काळात लिहिलेल्या 25+ सदाबहार वात्रटिका
4) वाचकांचे अभिप्राय..
5) वात्रटिका संग्रह परिचय
6) बाल वात्रटिका
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
नेतृत्वाची ओळख....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
------------------
नेतृत्वाची ओळख
जात,धर्म आणि प्रवर्गानुसार
राजकारणी ओळखले जाऊ लागले.
सर्व समावेशक नेतृत्वाचे,
खोटे चेहरे खळकले जाऊ लागले.
जात,धर्म आणि प्रवर्गाच्या,
ओळखीचीही राजकीय नशा आहे.
नेतृत्वाच्या संकुचित ओळखीला,
सर्वत्र बेंडबाजा आणि ताशा आहे.
जात,धर्म आणि प्रवर्गातच,
कुणीही जखडून जाऊ नका !
सर्वव्यापी व्हा;सर्वसमावेशक व्हा,
छोटेपणातच आखडून जाऊ नका !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8923
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
21मे 2025
Tuesday, May 20, 2025
दैनिक वात्रटिका l 20मे2025वर्ष- चौथेअंक - 350वा l पाने -57
पक्षांतराचे चक्र....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
------------------
पक्षांतराचे चक्र
कुणाची टवकारते नजर,
कुणाची नजर वक्र असते.
जे कधीच थांबत नाही,
ते पक्षांतराचे चक्र असते.
जशी पक्षांतराची दिशा,
वादग्रस्त ठरू शकते.
तसे पक्षांतराचे चक्रही,
उलटे सुलटे फिरू शकते.
नाही नाही म्हणणाराचेही,
नकळत पक्षांतर होत असते !
पक्षांतराच्या चक्राला,
नेहमी सत्ताच गती देत असते !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------
फेरफटका-8922
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
20मे 2025
Monday, May 19, 2025
दैनिक वात्रटिका l 19मे2025वर्ष- चौथेअंक - 349वा l पाने -57
बॅट म्हणाली बॉलला...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
बॅट म्हणाली बॉलला
त्यांनी केली शस्त्रसंधी,
मी पुन्हा नव्याने सिद्ध आहे.
आयपीएलच्या नावाखाली,
पुन्हा तुझे माझे युद्ध आहे
बॅट्समनपेक्षा तुला मला,
चॅनलवाल्यांनी ठोकले आहे.
क्रिकेटसारख्या क्रिकेटचे,
त्यांनी युद्ध करून टाकले आहे.
कुणी म्हणतोय शस्त्र संधी,
कुणासाठी युद्धविराम आहे !
आपल्याला दहशतवाद्यांच्या कृपेने,
भारत पाकमध्ये आराम आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8921
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
19मे 2025
Sunday, May 18, 2025
दैनिक वात्रटिका l 18मे2025वर्ष- चौथेअंक - 348वा l पाने -54
वाचाल तर वाचाल..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
वाचाल तर वाचाल..
कुणी म्हणाले, नरकात स्वर्ग आहे.
कुणी म्हणाले,स्वर्गात नरक आहे.
यात खरे आणि खोटे काहीच नाही,
हा राजकीय दृष्टिकोनाचा फरक आहे.
ज्याला जसे लिहायचे आहे,
तसे तो अगदी खुशाल लिहू शकतो.
एखाद्याची समीक्षा करताना,
कुणी बाल साहित्य म्हणून पाहू शकतो.
ज्याला जसे नाचायचे आहे,
ते तसे खुशाल नाचू शकतात !
ज्याला विरोधक म्हणून बसायचे आहे,
तेच नरकातला स्वर्ग वाचू शकतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8920
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
18मे 2025
Saturday, May 17, 2025
दैनिक वात्रटिका l 17मे2025वर्ष- चौथेअंक - 347वा l पाने -54
गौप्यस्फोटांचा बार....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
गौप्यस्फोटांचा बार
जेवढे जेवढे आभाळ हाणता येईल,
तेवढे तेवढे आभाळ हाणले जाते.
दडवून ठेवलेल्या सत्यालाच,
राजकारणात गौप्यस्फोट मानले जाते.
ज्याच्या त्याच्या राजकीय स्वार्थापोटी,
नेहमी सत्याच्या नरडीचा घोट असतो.
तुझे माझे पटेना असे झाले की,
त्यांच्याकडून राजकीय गौप्यस्फोट असतो.
वैयक्तिक स्वार्थापोटी सामाजिक न्याय,
नेहमी पायदळी तुडवला जातो !
ज्याच्या त्याच्या राजकीय सोयीनुसार,
गौप्य स्फोटांचा बार उडवला जातो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8919
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
17मे 2025
Friday, May 16, 2025
दैनिक वात्रटिका l 16मे2025वर्ष- चौथेअंक - 346वा l पाने -54
कर्म धर्म संयोगची जातकुळी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
कर्म धर्म संयोगची जातकुळी
तुमची इच्छा असो वा नसो,
तुम्हाला जाती-धर्माशी जोडले जाते.
जाती धर्माच्या चौकटीमध्ये,
तुम्हाला जबरदस्तीने ओढले जाते.
जाती आणि धर्माच्या कल्पना,
वेडगळ आणि भाबड्या आहेत.
अनेकांच्या यशाचे रहस्य,
जाती आणि धर्माच्या कुबड्या आहेत.
दुसऱ्याने जाती धर्म काढला की,
आपल्याला नको तेवढा राग असतो !
जाती धर्माचा हा कर्म धर्म संयोग,
म्हणूनच तर समजून घेणे भाग असतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8918
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
16मे 2025
Thursday, May 15, 2025
दैनिक वात्रटिका l 15मे2025वर्ष- चौथेअंक - 345 वा l पाने -54
आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 15मे2025
वर्ष- चौथे
अंक - 345 वा l पाने -54
अंक डाऊनलोड लिंक -
https://drive.google.com/file/d/139rN2Dng2S6q1x68AwexsZtpx45YH6y4/view?usp=drivesdk
काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 58
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या 20+ सदाबहार
वात्रटिका
4) वाचकांचे अभिप्राय..
5) वात्रटिका संग्रह परिचय
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
विना सहकार नाही उद्धार ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
विना सहकार नाही उद्धार
यांच्या मांडीला त्यांची मांडी आहे,
त्यांच्या मांडीला यांची मांडी आहे.
वाढत्या राजकीय गुंडागर्दीची,
नेमकी अशीच तर गुंडी आहे.
वाढत्या राजकीय गुंडागर्दीला,
वाढती राजकीय पाठराखण आहे.
गुंडागर्दी आणि राजकारणाचे,
परस्परांना राजरोस टेकण आहे.
विना सहकार नाही उद्धार,
हाच यातला आशय आहे !
कुणाची कुणामुळे बदनामी होते ?
हा मात्र संशोधनाचा विषय आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8917
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
15मे 2025
Wednesday, May 14, 2025
दैनिक वात्रटिका l 14मे2025वर्ष- चौथेअंक - 344 वा l पाने -54
युद्धकालीन सत्य ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
युद्धकालीन सत्य
कोण खरे?कोण खोटे?
युद्धकाळात काही कळत नाही.
अफवा आणि वावड्यांशिवाय,
कानावर काही आदळत नाही.
कधी खरेही खोटे वाटू लागते,
कधी खोटेही खरे वाटू लागते.
पहिल्या अफवा जिरेपर्यंत,
नव्या अफवांना तोंड फुटू लागते.
कळत नाही कुणाची नियत खराब?
कुणाची नियत साफ असते ?
प्रेमात आणि युद्धात,
म्हणूनच तर सगळे माफ असते !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8916
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
14मे 2025
Tuesday, May 13, 2025
दैनिक वात्रटिका l 13मे2025वर्ष- चौथेअंक - 342आणि 343वा l पाने -63
युद्धानुभव...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
युद्धानुभव
ब्लॅक आउट, मॉक ड्रील,सायरन,
या शब्दांनी धुमाकूळ घातला आहे
तमाम भारतीयांनी युद्धाचा अनुभव,
याची देही याची डोळा घेतला आहे.
क्षेपणास्त्र, सुदर्शनचक्र, शस्त्रसंधी,
याचीही शब्द संग्रहात भर आहे.
अमेरिकेच्या ट्रम्प तात्याची तर,
गल्लीबोळातूनसुद्धा टर आहे.
ज्यांना बोलायला संधी मिळाली,
ते तर नाकाने कांदे सोलीत आहेत !
अजूनही लोकांच्या डोक्यावर,
ड्रोनच ड्रोन घिरट्या घालीत आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------
फेरफटका-8915
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
13मे 2025
Monday, May 12, 2025
अमेरिकेची शिष्टाई,,,,प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
अमेरिकेची शिष्टाई
दोघांच्या भांडणांमध्ये
तिसऱ्याचाच रुबाब आहे.
कबाब मे हड्डी नाही,
जणू हड्डीतच कबाब आहे.
जणू बोक्यांच्या भांडणामध्ये,
माकडाने संधी साधली आहे.
ज्यांची मागणीच नव्हती,
त्यांच्यावर शस्त्रसंधी लादली आहे
अमेरिकेच्या शिष्टाईत,
भारताच्या संयमाची माती आहे !
जणू नव्याने शोध लागला
जगाला अणुबॉम्बची भीती आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8914
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
12मे 2025
Sunday, May 11, 2025
दैनिक वात्रटिका l 11 मे2025वर्ष- चौथेअंक - 3401 वा l पाने -51
आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 11 मे2025
वर्ष- चौथे
अंक - 3401 वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक -
https://drive.google.com/file/d/1xYQnsUdRaYQkK5GY9_s1I49PjacJmTvw/view?usp=drivesdk
काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 55
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या 25+ सदाबहार
वात्रटिका
4) वाचकांचे अभिप्राय..
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#युद्धविराम
#india #pakistan #Ceasefire #SJaishankar #IndianArmy
युद्ध विराम आणि शस्त्रसंधी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
युद्ध विराम आणि शस्त्रसंधी
सुरु होण्याआधीच संपली कहानी,
अशी युद्ध विरामाची तऱ्हा आहे.
अमेरिकेला कुणीतरी सांगा,
पाकवर विश्वास न ठेवलेला बरा आहे.
शस्त्रांबरोबर बुद्धीने खेळला जातो,
असा युद्धाचा दुहेरी खेळ आहे.
युद्धविराम घेतो पण अटी आवरा,
अशीच पाकिस्तानवरती वेळ आहे.
युद्धविराम असो की शस्त्रसंधी ?
पाकिस्तान आपल्याच तालात आहे !
साऱ्या जगाला कळून चुकले,
बुडत्याचा पाय जास्तच खोलात आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8913
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
11 मे 2025
ऑपरेशन फोडाफोडी
आजची वात्रटिका ---------------------------- ऑपरेशन फोडाफोडी आज यांचे त्यांचे फुटले, उद्या दुसऱ्याची बारी आहे ऑपरेशन फोडाफोडी, सगळीकडूनच जारी...
-
आजची वात्रटिका ---------------------- गेट-टुगेदर भूतकाळातले मित्र -मैत्रिणी, खूप वर्षानंतर भेटू लागले. उजळून येतात आठवणी, छोटे झाल्यासारखे व...







































