मार्च एण्डची रात्र
मार्च एण्डच्या रात्रीला
इतिहास घडवला जातो.
उरलासुरला सगळा पैसा
एका रात्रीत उडवला जातो.
उरलासुरला सगळा पैसा
एका रात्रीत अँडजेस्ट केला जातो!
मार्च एण्डच्या रात्रीलाच
एपिल्र फूलला जन्म दिला जातो!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
Saturday, March 31, 2012
Friday, March 30, 2012
चोरीचे अभंग
देवाचिया द्वारी
देवाचिया घरी
होतसे चोरी
कशी काय? ।।1।।
आमच्या रक्षणाच
तुझ्यावर भरवसा
ठेवावा कसा?
सांग देवा ।।2।।
किती तुझ्या लीला
किती तुझे बहाणे
चोरच शहाणे
भक्तांपेक्षा ।।3।।
- सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
देवाचिया घरी
होतसे चोरी
कशी काय? ।।1।।
आमच्या रक्षणाच
तुझ्यावर भरवसा
ठेवावा कसा?
सांग देवा ।।2।।
किती तुझ्या लीला
किती तुझे बहाणे
चोरच शहाणे
भक्तांपेक्षा ।।3।।
- सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
Thursday, March 29, 2012
चोर ते चोर
उडवू नका खिल्ली त्यांची
असंसदीय शब्द खिल्लीत आहेत.
जसे चोरटे गल्लीत आहेत,
तसे चोरटे दिल्लीत आहेत.
चोरटे एकटे दुकटे नाहीत,
चोरट्यांच्या टोळ्या आहेत !
विचारू नका नावे त्यांची
या फक्त ढगात गोळ्या आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
चोर नामाचा गजर
गजर करा रे गजर करा
चोर नामाचा गजर करा
कोण आम्हाला चोर म्हणतो ?
त्याला इथे हजर करा
लुटले आम्ही, लुटतो आम्ही
तुम्ही पुरावे हजर करा
गजर करा रे गजर करा
चोर नामाचा गजर करा
नेहमी तुम्हाला वाकडे दिसते
सरळ तुमची नजर करा
गजर करा रे गजर करा
चोर नामाचा गजर करा
घुसलो आम्ही, पोसलो आम्ही
व्यवस्थेचे 'सिझर' करा!
गजर करा रे गजर करा
चोर नामाचा गजर करा!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Wednesday, March 28, 2012
सगळीच चोरी
चोरांनाही चोर म्हणायचे
दिवस आता उरले नाहीत.
ते अट्टल चोर असूनही
अजून चोर ठरले नाहीत.
चोरांनाही चोर म्हणणे
ही असंसदीय भाषा आहे!
कोणतेही काम हलके नाही
चोरी तर त्यांचा अधिकृत पेशा आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
दिवस आता उरले नाहीत.
ते अट्टल चोर असूनही
अजून चोर ठरले नाहीत.
चोरांनाही चोर म्हणणे
ही असंसदीय भाषा आहे!
कोणतेही काम हलके नाही
चोरी तर त्यांचा अधिकृत पेशा आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Tuesday, March 27, 2012
अर्थाचा अनर्थ
महाराष्ट्राकडून महाराज्याकडे
हाच संकल्पाचा अर्थ आहे.
मंत्री आणि आमदारांना वाटतेय
हा संकल्पच व्यर्थ आहे.
एवढे मात्र कबूल की,
हा अर्थसंकल्प शिलकी आहे!
विरोधकांपेक्षा सहकार्यांचीच
प्रतिक्रिया कितीतरी बोलकी आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
हाच संकल्पाचा अर्थ आहे.
मंत्री आणि आमदारांना वाटतेय
हा संकल्पच व्यर्थ आहे.
एवढे मात्र कबूल की,
हा अर्थसंकल्प शिलकी आहे!
विरोधकांपेक्षा सहकार्यांचीच
प्रतिक्रिया कितीतरी बोलकी आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Monday, March 26, 2012
बातमीचा परिणाम
राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाले
एकमेकांना फटकू लागले
घटस्फोटाची बातमी ऐकून
जरा जास्तच खटकू लागले
घटस्फोटाच्या बातमीच्या परिणामाचे
हेच उदाहरण देता येईल!
कारण आता घटस्फोटही
लगेचच्या लगेच घेता येईल!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
एकमेकांना फटकू लागले
घटस्फोटाची बातमी ऐकून
जरा जास्तच खटकू लागले
घटस्फोटाच्या बातमीच्या परिणामाचे
हेच उदाहरण देता येईल!
कारण आता घटस्फोटही
लगेचच्या लगेच घेता येईल!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Sunday, March 25, 2012
आघाडी धर्माचा अर्थ
ते म्हणाले, हय़ांनी शब्द पाळला नाही.
हे म्हणाले, त्यांनी शब्द पाळला नाही.
त्यांचे माहिती नाही पण,
आम्हाला आघाडी धर्म कळला नाही.
शब्दाने शब्द वाढवून
वाद वाफसायचा असतो!
जणू आघाडी धर्म म्हणजे
पाठीत खंजीर खुपसायचा असतो!!
- सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
हे म्हणाले, त्यांनी शब्द पाळला नाही.
त्यांचे माहिती नाही पण,
आम्हाला आघाडी धर्म कळला नाही.
शब्दाने शब्द वाढवून
वाद वाफसायचा असतो!
जणू आघाडी धर्म म्हणजे
पाठीत खंजीर खुपसायचा असतो!!
- सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
Saturday, March 24, 2012
तात्काळ घटस्फोट
ती लवंगी मिरची,
तो निव्वळ ढोकळा आहे
अशांना घटस्फोटाचा मार्ग
आता तत्काळ मोकळा आहे
आततायी निर्णयाचा
झटपट निकाल लागला जाईल!
घटस्फोटांचा आकडा
आता वरचेवर फुगला जाईल!!
- सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
Friday, March 23, 2012
मोका आणि धोका
कुठल्याही प्रश्नाचे उत्तर
राजकारणात सेम नाही.
धोक्यात आणि मोक्याचा
राजकारणात नेम नाही.
मोका आणि धोका
दबा धरून बसलेला असतो!
इथे समाधानी कुणीच नाही
प्रत्येक जण वसवसलेला असतो!!
- सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
राजकारणात सेम नाही.
धोक्यात आणि मोक्याचा
राजकारणात नेम नाही.
मोका आणि धोका
दबा धरून बसलेला असतो!
इथे समाधानी कुणीच नाही
प्रत्येक जण वसवसलेला असतो!!
- सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
Thursday, March 22, 2012
झेडपीचे सत्ताकारण
एकाचा दांडा, एकाचा झेंडा,
झेडपी म्हणजे मोंढा आहे.
कुणीही असले तरी
त्यांचा सत्तेकडेच लोंढा आहे.
जमेल ते समीकरण
झेडपीत मांडले गेले!
कुणाचाही कुणाला पाठिंबा
बिचारे लोक गंडले गेले!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
झेडपी म्हणजे मोंढा आहे.
कुणीही असले तरी
त्यांचा सत्तेकडेच लोंढा आहे.
जमेल ते समीकरण
झेडपीत मांडले गेले!
कुणाचाही कुणाला पाठिंबा
बिचारे लोक गंडले गेले!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Wednesday, March 21, 2012
आघाडीची सल
आघाडीची सल
कुणी खुपसतो नाक,
कुणी कशात काय घालतो.
विकासाच्या राजकारणात
मित्रपक्ष पाय घालतो.
सत्तेसाठी एकत्र आले तरी
प्रत्येकाचा वेगवेगळा कल आहे!
आघाडीच्या राजकारणाची
ही सार्वत्रिक सल आहे!!
- सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
कुणी खुपसतो नाक,
कुणी कशात काय घालतो.
विकासाच्या राजकारणात
मित्रपक्ष पाय घालतो.
सत्तेसाठी एकत्र आले तरी
प्रत्येकाचा वेगवेगळा कल आहे!
आघाडीच्या राजकारणाची
ही सार्वत्रिक सल आहे!!
- सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
Tuesday, March 20, 2012
निर्लज्जम सदासुखी
विचारांची आणि निष्ठेची
गरजच आज वाटत नाही.
पक्षप्रवेश देणार्या-घेणार्याला
पक्षांतराची लाज वाटत नाही.
पक्षप्रवेशाचे जाहीर सोहळे
कुठे ना कुठे रोज साजरे आहेत!
देणारे-घेणारे-बघणारे
सगळेच निलाजरे आहेत!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
गरजच आज वाटत नाही.
पक्षप्रवेश देणार्या-घेणार्याला
पक्षांतराची लाज वाटत नाही.
पक्षप्रवेशाचे जाहीर सोहळे
कुठे ना कुठे रोज साजरे आहेत!
देणारे-घेणारे-बघणारे
सगळेच निलाजरे आहेत!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Monday, March 19, 2012
जल-स्वराज्य
गावच्या गावं तहानलेली
कुणी पोटभर पाणी प्याले नाही.
पाण्यासारखा पैसा गेला
पण 'जलस्वराज्य' आले नाही.
दीडशे वर्षानी स्वराज्य मिळाले
पण 'जलस्वराज्या'चा पत्ता नाही!
आता लढावे तरी कुणाविरुद्ध?
आता काही परक्यांची सत्ता नाही!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
कुणी पोटभर पाणी प्याले नाही.
पाण्यासारखा पैसा गेला
पण 'जलस्वराज्य' आले नाही.
दीडशे वर्षानी स्वराज्य मिळाले
पण 'जलस्वराज्या'चा पत्ता नाही!
आता लढावे तरी कुणाविरुद्ध?
आता काही परक्यांची सत्ता नाही!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Sunday, March 18, 2012
जातीचा 'राखीव' चमत्कार
कुणाच्या जातीवर जाऊ नये
पण जातीची बातच आगळी असते.
दोन सख्ख्या भावांचीही
इथे जातच वेगळी असते.
एकाची जात एक असते,
दुसर्याची जात दुसरी असते!
जातीय चमत्कार असा की,
बापाची जात तिसरी असते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
पण जातीची बातच आगळी असते.
दोन सख्ख्या भावांचीही
इथे जातच वेगळी असते.
एकाची जात एक असते,
दुसर्याची जात दुसरी असते!
जातीय चमत्कार असा की,
बापाची जात तिसरी असते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Saturday, March 17, 2012
सचिनची 'शेकडे' वारी
उधार-बिधार काही नाही
सचिनचा खेळच रोकडा आहे.
आता सचिनच्या नावावरती
शेकडय़ांचा शेकडा आहे.
धुतलेल्या गोलंदाजांच्या साक्षीला
सचिनची आकडेवारी आहे!
कोणत्याही गणितात न बसणारी
सचिनची शेकडेवारी आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
सचिनचा खेळच रोकडा आहे.
आता सचिनच्या नावावरती
शेकडय़ांचा शेकडा आहे.
धुतलेल्या गोलंदाजांच्या साक्षीला
सचिनची आकडेवारी आहे!
कोणत्याही गणितात न बसणारी
सचिनची शेकडेवारी आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Friday, March 16, 2012
रेल-खेल-रत्न
भाडेवाढीला बळी म्हणून
दिनेश (त्रि)वेदीवर चढवले गेले.
प्रवाशांच्या ममतेपोटी
बजेटवर 'मेगाब्लॉक' घडवले गेले.
प्रवाशांना त्रास होऊ नये
असा प्रयत्न व्हायला हवा!
ममता बॅनर्जीनाच
पहिला 'रेल-खेलरत्न' द्यायला हवा!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Thursday, March 15, 2012
पांढरे दु:ख
लागली काय? उठली काय?
भावात फरक पडला नाही.
निर्यातबंदी उठली तर
भाव कसा वाढला नाही?
शेतकर्याचा चेहरा
कापसासारखा पांढराफटक आहे!
शेतकर्यांचा समज होतोय
हे सगळेच नाटक आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
भावात फरक पडला नाही.
निर्यातबंदी उठली तर
भाव कसा वाढला नाही?
शेतकर्याचा चेहरा
कापसासारखा पांढराफटक आहे!
शेतकर्यांचा समज होतोय
हे सगळेच नाटक आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Wednesday, March 14, 2012
कव्हर -स्टोरी
घोटाळ्यावर घोटाळे
घोटाळ्यांना जोर आहेत.
यांच्यातही चोर आहेते
त्यांच्यातही चोर आहेत.
नेत्यांची पाठराखण करण्याची
पक्षा पक्षाला चोरी आहे!
कितीही कव्हर घातले तरी
घोटाळ्यांचीच स्टोरी आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
घोटाळ्यांना जोर आहेत.
यांच्यातही चोर आहेते
त्यांच्यातही चोर आहेत.
नेत्यांची पाठराखण करण्याची
पक्षा पक्षाला चोरी आहे!
कितीही कव्हर घातले तरी
घोटाळ्यांचीच स्टोरी आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Tuesday, March 13, 2012
लोकहिताचे तत्वज्ञान
एक मस्तवाल नेता
दादागिरी करीत वदला.
लोकहित साधत असेल तर
शंभर वेळा पक्ष बदला.
लोकहिताच्या तत्वज्ञानाची
मोठी अजबच भाषा आहे !
पक्ष बदलूंपेक्षा बरी
बाजारातली वेश्या आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड )
दादागिरी करीत वदला.
लोकहित साधत असेल तर
शंभर वेळा पक्ष बदला.
लोकहिताच्या तत्वज्ञानाची
मोठी अजबच भाषा आहे !
पक्ष बदलूंपेक्षा बरी
बाजारातली वेश्या आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड )
घरकुल-मसाला
घरकुल योजनेमध्ये
जो तो हात मारून घेतो आहे.
घरकुलातला मसाला
जमेल तसा खातो आहे.
खाणारांना मिरच्या झोंबतील,
तुमची खसखस पिकली जाईल!
गरजवंत नावाची वेडी हळद
काहीतरी धडा शिकली जाईल!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
जो तो हात मारून घेतो आहे.
घरकुलातला मसाला
जमेल तसा खातो आहे.
खाणारांना मिरच्या झोंबतील,
तुमची खसखस पिकली जाईल!
गरजवंत नावाची वेडी हळद
काहीतरी धडा शिकली जाईल!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Monday, March 12, 2012
जैन-ठिबक
असावे 'घरकुल' आपुले छान
असे कुणाला वाटत नाही?
दिल्या-घेतल्याशिवाय
साधी झोपडपट्टीही भेटत नाही
दादागिरी ही तर
भ्रष्टाचाराची बहीण आहे!
कुठे तरी पाणी ठिबकणारच
कारण नावातच 'जैन' आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
Sunday, March 11, 2012
प्राथमिक जबाबदारी
आयात-निर्यातीच्या धोरणामागे
जागतिक कारण आहे.
शेतकर्यांचे आयुष्य मात्र
सरकारकडे तारण आहे.
पिकांची निर्यात करा,
नाहीतर आयात करा !
पण शेतकर्यांच्या आत्महत्या
आपल्या कह्यात करा !!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
जागतिक कारण आहे.
शेतकर्यांचे आयुष्य मात्र
सरकारकडे तारण आहे.
पिकांची निर्यात करा,
नाहीतर आयात करा !
पण शेतकर्यांच्या आत्महत्या
आपल्या कह्यात करा !!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
स्वीकृती ते विकृती
नको त्याला सदस्यत्व देण्यास
पक्षीय स्वीकृती असते.
हे कसले राजकारण?
ही तर राजकीय विकृती असते.
स्वीकृतीकडून विकृतीकडे
सदस्यत्वाचा ओघ आहे!
लोकशाहीच्या विकृतीकरणाचा
हा संसर्गजन्य रोग आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Saturday, March 10, 2012
बेटी - बचाव
बेटी बचाव बेटी बचाव
पोकळ नारेबाजी नको.
मुलगा- मुलगी एक समान
पोकळ शेरेबाजी नको.
बेटी बचावचा नारा
हवेत नाही,
उरामध्ये द्यावा लागेल!
रस्त्यावरती देण्याअगोदर
तो घरामध्ये द्यावा लागेल!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
पोकळ नारेबाजी नको.
मुलगा- मुलगी एक समान
पोकळ शेरेबाजी नको.
बेटी बचावचा नारा
हवेत नाही,
उरामध्ये द्यावा लागेल!
रस्त्यावरती देण्याअगोदर
तो घरामध्ये द्यावा लागेल!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Friday, March 9, 2012
निष्ठा आणि विष्ठा
निष्ठा आणि विष्ठा
निष्ठेत आणि विष्ठेत
आजकाल फारसा फरक नाही.
कुणी असे म्हटले तर
त्यात काही आश्चर्यकारक नाही.
कार्यकर्त्यांच्या वर्तनामुळेच
असला भास होतो आहे!
विष्ठेसारखाच निष्ठेचाही
आजकाल वास येतो आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
निष्ठेत आणि विष्ठेत
आजकाल फारसा फरक नाही.
कुणी असे म्हटले तर
त्यात काही आश्चर्यकारक नाही.
कार्यकर्त्यांच्या वर्तनामुळेच
असला भास होतो आहे!
विष्ठेसारखाच निष्ठेचाही
आजकाल वास येतो आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Thursday, March 8, 2012
ऐतिहासिक मांडणी
इतिहास म्हणजे काही
कुणाच्या तोंडच्या वाफ़ा नसता
रिकाम्या जागा दिसल्या की,
कुणी मारलेल्या थापा नसतात.
इतिहास वेगळा,थापा वेगळ्या,
इतिहास म्हणजे कुचलाकुचली नाही.
चार आण्याच्या भांडवलावर
बारा आण्याची उचलाउचली नाही.
इतिहासाच्या पोटी वर्तमानाचे भविष्य
वर्तमानाला त्याच्या वेणा असतात !
इतिहासाच्या साक्षीला
भूगोलाच्या खाणाखुणा असतात !!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
कुणाच्या तोंडच्या वाफ़ा नसता
रिकाम्या जागा दिसल्या की,
कुणी मारलेल्या थापा नसतात.
इतिहास वेगळा,थापा वेगळ्या,
इतिहास म्हणजे कुचलाकुचली नाही.
चार आण्याच्या भांडवलावर
बारा आण्याची उचलाउचली नाही.
इतिहासाच्या पोटी वर्तमानाचे भविष्य
वर्तमानाला त्याच्या वेणा असतात !
इतिहासाच्या साक्षीला
भूगोलाच्या खाणाखुणा असतात !!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Wednesday, March 7, 2012
महागाईची नाळ
पेट्रोल चढाईच्या तयारीत,
कापसाचे भाव पडू लागले.
उत्तर प्रदेशाचा 'निकाल ' लागताच
अपेक्षित तेच घडू लागले.
निवडणुकांशी घट्ट जोडलेली
महागाईची नाळ आहे!
युपीत 'मुलायम' असला तरी
इतरांसाठी कठीण काळ आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
कापसाचे भाव पडू लागले.
उत्तर प्रदेशाचा 'निकाल ' लागताच
अपेक्षित तेच घडू लागले.
निवडणुकांशी घट्ट जोडलेली
महागाईची नाळ आहे!
युपीत 'मुलायम' असला तरी
इतरांसाठी कठीण काळ आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Tuesday, March 6, 2012
अपहरणनाटय़
बेभरवशाचे राजकारण
गृहीतच धरावे लागते.
आपल्या बायकोचेही अपहरण
नवर्याला करावे लागते.
बायकोचे अपहरण करूनही
काय घडेल ते सांगता येत नाही!
आपल्या बायकोचे मत
कुणाला पडेल ते सांगता येत नाही!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
गृहीतच धरावे लागते.
आपल्या बायकोचेही अपहरण
नवर्याला करावे लागते.
बायकोचे अपहरण करूनही
काय घडेल ते सांगता येत नाही!
आपल्या बायकोचे मत
कुणाला पडेल ते सांगता येत नाही!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Monday, March 5, 2012
मंगळ मंगळ हो!
पत्रिका बघणार्यांची अधिकच चंगळ आहे. आज पृथ्वीच्या जवळ ग्रहमालेतला मंगळ आहे. आकाशातले सारे ग्रह पत्रिकेमध्ये आणले जातात. पत्रिका बघणार्यांकडून ढगात गोळ्या हाणल्या जातात. सर्वानाच कळून चुकले आहे त्यांचे काय हेतू असतात! अंगठीबहाद्दरांच्या मागेच राहू आणि केतू असतात!! - सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड) | - |
Sunday, March 4, 2012
इशाराही काफी है.....
पिऊन वाहन चालवायचा
ज्याला ज्याला कंड आहे.
मोटार वाहन कायद्यानुसार
त्याला वाढीव दंड आहे.
वाढलेला दंड तर
मधल्या मध्ये ढापला जाईल!
चिरीमिरी देऊन-घेऊन
कायदा रस्त्यावर जपला जाईल!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Saturday, March 3, 2012
सत्तेचा कुंभमेळा
सगळय़ांचाच डोळा आहे.
सगळेच संधिसाधू
डोक्यात 'कुंभमेळा' आहे.
आलेली संधी सोडायची नाही
त्यांचा सत्तेसाठी दणका आहे!
सगळय़ांचीच तपश्चर्या भंगली
सत्ता म्हणजे मेणका आहे!!
- सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
Friday, March 2, 2012
मंकी मॅन
माकड आणि माणसात
फरक कुठे उरला जातो? राहून राहून कुठे तरी
मंकी मॅन अवतरला जातो.
पुन:पुन्हा सांगावे लागते
मंकी मॅनची कथा भाकड असते !
मात्र प्रत्येक माणसा-माणसात
दडलेले एक माकड असते !!
- सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
Thursday, March 1, 2012
अफूची नशा
कालपर्यंत बेदखल होते
आज केवढे गाजले आहे.
अचानकपणे लक्षात आले
राज्यात अफूचे पीक माजले आहे.
अगदी कालपरवापर्यंत
अफूची शेती दडलेली होती!
जणू अफू पिकण्याअगोदरच
अफूची नशा चढलेली होती!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Subscribe to:
Posts (Atom)
दैनिक वात्रटिका l 28मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 298वा l पाने -54
दैनिक वात्रटिका l 28मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 298वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1QFQFkgKdfL7eY4viFxy...

-
आजची वात्रटिका ---------------------- गेट-टुगेदर भूतकाळातले मित्र -मैत्रिणी, खूप वर्षानंतर भेटू लागले. उजळून येतात आठवणी, छोटे झाल्यासारखे व...