उधार-बिधार काही नाही
सचिनचा खेळच रोकडा आहे.
आता सचिनच्या नावावरती
शेकडय़ांचा शेकडा आहे.
धुतलेल्या गोलंदाजांच्या साक्षीला
सचिनची आकडेवारी आहे!
कोणत्याही गणितात न बसणारी
सचिनची शेकडेवारी आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...
2 comments:
सूर्यकांती...
फिरकी घेणारी
गिरक्या घेणारी
(अ)भल्या-(अ)भल्यांवर
असूड वडणारी
सूर्यकांती...
हवीहवी वाटणारी
गुदगुल्या करणारी
हसून हसून
लोटपोट करणारी
सूर्यकांती...
सूर्यकांती...
फिरकी घेणारी
गिरक्या घेणारी
(अ)भल्या-(अ)भल्यांवर
असूड वडणारी
सूर्यकांती...
हवीहवी वाटणारी
गुदगुल्या करणारी
हसून हसून
लोटपोट करणारी
सूर्यकांती...
Post a Comment