Monday, September 30, 2024

दैनिक वात्रटिका l 30सप्टेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 122वा


दैनिक वात्रटिका l 30सप्टेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 122वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

बॅनरबाजी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

बॅनरबाजी

ज्याच्या त्याच्या राजकीय निष्ठेचे,
अगदी वेगवेगळे स्कॅनर आहे.
म्हणूनच भावी मुख्यमंत्र्यांचे,
रोज कुठे ना कुठे नवे बॅनर आहे.

आपला उत्साह आणि वास्तव,
याची कुठे कुणाला जाण आहे ?
आपला महाराष्ट्र म्हणजे,
भावी मुख्यमंत्र्यांची खाण आहे.

अतिउत्साह आणि उतावळेपणा,
याची चौका चौकात झांकी आहे !
आता फक्त अपक्षांनीच,
आपले बॅनर लावणे बाकी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8698
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
30सप्टेंबर 2024
 

Sunday, September 29, 2024

दैनिक वात्रटिका l 29सप्टेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 121वा

दैनिक वात्रटिका l 29सप्टेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 121वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.

 

राजकीय गुंडा-गर्दी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


 आजची वात्रटिका

--------------------------

राजकीय गुंडा-गर्दी

जिकडे बघावे तिकडे,
सगळीकडेच गुंडा-गर्दी आहे.
गुंडा-पुंडांच्या अंगावरती,
पांढऱ्या खादीची वर्दी आहे.

पांढरी खादी घातली की,
सर्व काळे डाग विरून जातात.
सब कुछ चलता है..
असेच गृहीत धरून जातात.

गुन्हेगारी आणि राजकारण,
एकमेकांना अगदी पूरक आहेत !
दोन्हीकडच्याही यशाचे,
दोघेही तेवढेच कारक आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8697
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
29सप्टेंबर 2024

Saturday, September 28, 2024

दैनिक वात्रटिका l 28सप्टेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 120वा l पाने -51


दैनिक वात्रटिका l 28सप्टेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 120वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.

सवयीचे गुलाम....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

सवयीचे गुलाम

नेता कोणताही असला तरी,
फक्त सत्ता हेच लक्ष आहे.
दरवेळी नवीन निवडणूक,
दरवेळीच नवा पक्ष आहे.

नवा पक्ष;नवी निवडणूक;
ऑफरसुद्धा भारी आहे.
या पक्षातून त्या पक्षात,
सगळ्यांचीच वारी आहे.

उमेदवारापासून मतदारापर्यंत,
कुणालाच काही वाटत नाही !
विजयी असोत वा पराभूत,
कुणाकडूनच सवय सुटत नाही !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8696
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
28सप्टेंबर 2024
 

Friday, September 27, 2024

दैनिक वात्रटिका l 27सप्टेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 119वा

दैनिक वात्रटिका l 27सप्टेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 119वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.

 

खुर्द आणि बुद्रुक...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

खुर्द आणि बुद्रुक

राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे,
आता बुद्रुक आणि खुर्द झाले.
ज्याचे जळते त्यालाच कळते,
कुणी मर्द तर कुणी सर्द झाले.

फोडणे सोपे जोडणे अवघड,
फोडणाऱ्यांनाही जाणीव आहे.
सगळे एकत्र आले तरी,
समन्वयाची मात्र उणीव आहे.

खुर्द आणि बुद्रुक केल्याचा,
अहंकार मनामध्ये दाटू नये !
आपण एवढीच प्रार्थना करू,
कुणाचेच घर कधी फुटू नये !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8695
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
27सप्टेंबर 2024
 

Thursday, September 26, 2024

दैनिक वात्रटिका l 26सप्टेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 118वा l पाने -51


दैनिक वात्रटिका l 26सप्टेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 118वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

प्रचार तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

प्रचार तंत्र

ना कसला विचार आहे,
ना कसला आचार आहे.
त्याचेच तर नाव,
निवडणूक प्रचार आहे.

प्रचारापेक्षा अपप्रचार,
उपयोगी पडला जातो.
प्रचाराचा रोग मग,
सर्वांनाच जडला जातो.

प्रचारापेक्षा अपप्रचारावर,
सर्वांचीच मदार आहे !
ज्याच्या त्याच्या विजयाचा,
अपप्रचारच आधार आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8694
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
26सप्टेंबर 2024
 

Wednesday, September 25, 2024

दैनिक वात्रटिका l 25सप्टेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 117वा


दैनिक वात्रटिका l 25सप्टेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 117वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

हम सब एक है...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

हम सब एक है

एखादा पक्ष फुटला तरी,
म्हणे एखाद्याचे घर फुटत नाही.
पण वास्तव अनुभवले की,
हे विधान अजिबातच पटत नाही.

आपल्या राजकारणामध्ये तर,
हीच घर घर की कहानी आहे.
जनतेला वेड्यात काढू नका,
जनता तशी खूप शहाणी आहे

राजकारणात नाती रक्ताने नाही,
सत्तेच्या खुर्चीने बांधली जातात !
एकदा सत्ता हातात असली की,
तुटलेली नातीही सांधली जातात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8693
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
25सप्टेंबर 2024
 

Tuesday, September 24, 2024

दैनिक वात्रटिका l 24सप्टेंबर2024 वर्ष- चौथे


दैनिक वात्रटिका l 24सप्टेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 116वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

संशयास्पद...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

संशयास्पद

मोर्चे आणि आंदोलनांना,
निवडणुकांच्या तोंडावर जोर येतो.
मागण्या आणि आश्वासनांना,
सगळीकडून सारखाच भर येतो.

मोर्चे आणि आंदोलनांचा,
एकच धुराळा उडला जातो,
निवडणुकांच्या तोंडावरती,
बॅकलॉग भरून काढला जातो.

देणारे तेच मागणारे तेच,
आंदोलन फुगवलेला फुगा असते!
सगळे कसे आयोजित प्रायोजित,
संशयाला खूप मोठी जागा असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8692
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
24सप्टेंबर 2024
 

Monday, September 23, 2024

दैनिक वात्रटिका l 23सप्टेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 115वा..

 
दैनिक वात्रटिका l 23सप्टेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 115वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.

पक्षांतराची थिअरी ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

पक्षांतराची थिअरी

इन्कमिंग आणि आउटगोइंगला,
सध्या सारखीच भरती आहे.
येणाऱ्या बरोबर जाणाऱ्यांनाही,
अगदी सारखीच स्फूर्ती आहे.

कुणी कुठे आले काय? गेले काय?
याचा कुणालाच फरक पडत नाही.
आयारामांचे स्वागत झाले तरी,
गयारामांवरही कोणी चिडत नाही.

आयारामांच्या आडोशाला,
भावी गयाराम दडलेले असतात !
त्यांचीच होते घर वापसी,
जे कुठेतरी सडले पडलेले असतात!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8691
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
23सप्टेंबर 2024
 

Sunday, September 22, 2024

निक वात्रटिका l 22सप्टेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 114वा

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 114वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.

चरबीयुक्त लाडू....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

चरबीयुक्त लाडू

तीर्थ तर वादग्रस्त होतेच,
आता वादग्रस्त प्रसाद आहे,
लाडूतल्या कोलेस्ट्रॉलचा,
भावनिक असा वाद आहे.

बैल गेला झोपा केला,
असाच काहीसा भास आहे.
लाडूमधल्या चरबीला,
राजकारणाचाही वास आहे.

दृष्टीआड सृष्टी असते,
यातच सगळे सामावले आहे !
भक्तांमध्ये अपराधाची भावना,
कमावलेले पुण्य गमावले आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8690
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
22सप्टेंबर 2024
 

Saturday, September 21, 2024

दैनिक वात्रटिका l 21सप्टेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 113वा

दैनिक वात्रटिका l 21सप्टेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 113वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.

 

कावळ्याची नजर...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

कावळ्याची नजर

तुमच्या आमच्या नजरा,
तेव्हा नक्की चोरट्या असतात.
जेव्हा वृद्धाश्रमांच्या दारात,
कावळ्यांच्या घिरट्या असतात.

पितृ पाठाच्या पंधरवड्यात,
जेव्हा पित्रं जेवू लागतात.
तेव्हा छद्मी हास्य करीत,
कावळे कावकावू लागतात.

आपल्या पित्रांच्या नावाने,
आपला प्रासंगिक गजर आहे!
त्यालाच विसंगती दिसते,
ज्याची कावळ्याची नजर आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8689
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
21सप्टेंबर 2024
 

Friday, September 20, 2024

दैनिक वात्रटिका l 20सप्टेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 112वा l


दैनिक वात्रटिका l 20सप्टेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 112वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.


 

फिट्टम् फाट...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

फिट्टम् फाट

महायुती असो वा महाआघाडी,
नाव मोठे लक्षण खोटे आहे.
एकमेकांचा उद्धार करण्यात,
सगळ्यांचेच साटेलोटे आहे.

परस्परांचा उद्धार करीत,
राजकीय इज्जत काढू लागले.
राजकारणात रस नसणाऱ्यांचीही,
राजकीय लज्जत वाढू लागले.

विधानसभेच्या तोंडावरती,
बेताल वक्तव्यांचा नाट आहे !
अगदी चक्रवाढ व्याजासहित,
रोखठोक फिट्टम फाटआहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8688
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
20सप्टेंबर 2024
 

Thursday, September 19, 2024

दैनिक वात्रटिका l 19सप्टेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 111वा


दैनिक वात्रटिका l 19सप्टेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 111वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

ज्याचा त्याचा मुख्यमंत्री प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

ज्याचा त्याचा मुख्यमंत्री

जसा यांच्या मनात एक आहे,
तसा त्यांच्या मनात एक आहे.
प्रत्येकाचा मुख्यमंत्री वेगळा,
इथेच तर सगळी मेख आहे.

लोकांच्या मनातला वेगळा आहे,
नेत्यांच्या मनातला वेगळा आहे.
आघाडी आणि युतीमधल्यांचा,
विचारही अगदी आगळा आहे.

प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य आहे,
इथपर्यंत अगदी ठीक आहे !
निवडणुकीच्या पूर्वीच,
मुख्यमंत्री पदाचे पीक आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8687
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
19सप्टेंबर 2024
 

Wednesday, September 18, 2024

दैनिक वात्रटिका l 18सप्टेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 110वा

दैनिक वात्रटिका l 18सप्टेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 110वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.

 

Tuesday, September 17, 2024

दैनिक वात्रटिका l 17सप्टेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 109वा


दैनिक वात्रटिका l 17सप्टेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 109वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

नाराजी नाट्य...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

नाराजी नाट्य

सत्तेचे वाटप करण्यात,
सत्ताधारी पक्ष बिझी असतात.
मंत्रीपदातून हुकलेले,
महामंडळाला राजी असतात.

महामंडळाचे गाजर,
नाराराजांपुढे टांगले जाते.
सत्ताधाऱ्यातले नाराजीनाट्य,
अगदी बारामाही रंगले जाते.

राजकीय सत्ता नाट्याचे
वेगवेगळे अंक असतात !
सत्ताधाऱ्यांच्या नावाने,
सत्ताधाऱ्यांचेच शंख असतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8686
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
17सप्टेंबर 2024
 

Monday, September 16, 2024

दैनिक वात्रटिका l 16सप्टेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 108 वा

दैनिक वात्रटिका l 16सप्टेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 108 वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.

 

नाकारलेली ऑफर....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

नाकारलेली ऑफर

राजकारणातही जे 'नितीनं' वागतात,
त्यांचे नाव गडकरी आहे.
जे राजकारणात गडबड करतात,
त्यांचे नाव गडबडकरी आहे.

ज्याला मतभिन्नतेचे मतही,
अगदी उघडपणे स्वीकारता येते.
फक्त त्याला आणि त्यालाच,
कुठलीही ऑफर नाकारता येते.

गडकरींचा स्पष्टवक्तेपणा म्हणजे,
महाआघाडीमध्ये नवी फुणगी आहे !
पंतप्रधानपदाची नाकारलेली ऑफर,
महाआघाडीसाठी नवी ठिणगी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8685
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
16सप्टेंबर 2024
 

Sunday, September 15, 2024

दैनिक वात्रटिका l 15सप्टेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 107 वा


दैनिक वात्रटिका l 15सप्टेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 107 वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

धार्मिक भ्रष्टाचार...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


 आजची वात्रटिका

--------------------------

धार्मिक भ्रष्टाचार

धर्माची चिकित्सा केली तरी,
तो धर्माचा अपमान वाटू लागला.
किरकोळ किरकोळ गोष्टीवरून,
आजकाल धर्म बाटू लागला.

चिकित्सेचा आणि प्रश्नांचा,
धर्माला वावडे आणि बाट आहे.
मी म्हणजेच अंतिम सत्य,
असा धर्मा-धर्माचा थाट आहे.

धर्माची सार्वजनिक चर्चा नको,
धर्म अत्यंत खाजगी गोष्ट आहे !
जो धार्मिक चिकित्सा करेल,
तो धर्मद्रोही आणि शिष्ट आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8684
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
15सप्टेंबर 2024

Saturday, September 14, 2024

दैनिक वात्रटिका l 14सप्टेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 106 वा


दैनिक वात्रटिका l 14सप्टेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 106 वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

लाडक्या बहिणीचे वास्तव...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

लाडक्या बहिणीचे वास्तव

लोकांना जशी जनाची आहे,
तशी लोकांना मनाची आहे.
लोक लोकांना विचारू लागले,
लाडकी बहीण कुणाची आहे?

लाडक्या बहिणीच्या जाहिरातीत,
युतीतला भेदभाव दिसतो आहे.
भेदभाव करून नामानिराळे,
मनात वेगळाच डाव दिसतो आहे.

कुणी का स्वतःला भाऊ म्हणेना,
जो तो स्वतःच्या प्रचारात धुंद आहे !
लाडक्या बहिणीचा तर,
फक्त ओवाळणीशीच संबंध आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8683
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
14सप्टेंबर 2024
 

Friday, September 13, 2024

दैनिक वात्रटिका l 13सप्टेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 105 वा


दैनिक वात्रटिका l 13सप्टेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 105 वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

भावी उमेदवार....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


 आजची वात्रटिका

--------------------------

भावी उमेदवार

कुणी इच्छुक, कुणी लोचट,
कुणी कुणी तर हावरे आहेत.
कुणा कुणाच्या भेटीगाठी,
कुणाचे संपर्क दौरे आहेत.

जसे कुणाचे आहे स्वकर्तृत्व,
तशी आई-बापाची पुण्याई आहे.
कालचे अन्याय करते सांगती,
बघा मीच कसा न्यायी आहे ?

उपयोगिता आणि उपद्रव्यमूल्य,
याचीही सार्वत्रिक झलक आहे !
आपल्या विजयाची कल्पनाही,
पूर्णपणे अज्ञानमूलक आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8682
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
13सप्टेंबर 2024

Thursday, September 12, 2024

दैनिक वात्रटिका l 12सप्टेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 104 वा


दैनिक वात्रटिका l 12सप्टेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 104 वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

Wednesday, September 11, 2024

दैनिक वात्रटिका l 11सप्टेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 103 वा


दैनिक वात्रटिका l 11सप्टेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 103 वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

माझी नवी ओळख...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

माझी नवी ओळख

आता अभिमानाने सांगत जाऊ,
आमच्या धडावर आमचे मस्तक आहे.
भारताचे संविधान म्हणजेच,
आमचे सर्वात आवडते पुस्तक आहे.

भारतीय हीच माझी जात,
भारतीय हाच माझा पहिला धर्म आहे.
पापा पुण्याचा हिशोब कशाला?
देशसेवा हेच माझे पहिले कर्म आहे.

विज्ञान हाच माझा गुरु,
विज्ञानाचाच मी पट्टशिष्य आहे !
जसा प्रथमही मी मनुष्य आहे,
तसा शेवटीही मी मनुष्य आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8680
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
11सप्टेंबर 2024
 

Tuesday, September 10, 2024

दैनिक वात्रटिका l 10सप्टेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 102 वा

दैनिक वात्रटिका l 10सप्टेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 102 वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.



 

कळतंय पण...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
--------------------------

कळतंय पण...

धार्मिक आणि सामाजिक उत्सव,
राजकारणाच्या पथ्यावर पडतात.
भावी कार्यकर्ते आणि नेते,
आशा उत्सवांमधूनच तर घडतात.

राजकारणाचे रहस्यच,
जशी खाण तशीच माती आहे.
उत्सवामधल्या राजकारणाची तर,
अगदी सगळीकडेच ख्याती आहे..

म्हणूनच उत्सवामधले राजकारण,
किती टाळले तरी टळत नाही !
उत्सवाचे राजकारण करू नये,
कितीही कळाले तरी वळत नाही !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8679
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
10सप्टेंबर 2024

Monday, September 9, 2024

दैनिक वात्रटिका l 9सप्टेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 101 वा


दैनिक वात्रटिका l 9सप्टेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 101 वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

डीजे,लेझर आणि टिझर....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

डीजे,लेझर आणि टिझर

कुणाला आला ॲटक,
कुणाचे डोळे गेले आहेत.
डीजे म्हणाला लेझरला,
लोकच खुळे झाले आहेत.

जशी गाणी अचकट आहेत,
तशी गाणी विचकट आहेत.
गाण्यांचा प्लस पॉइंट म्हणजे,
गाणी फक्त नाचकट आहेत.

थरारलेला डीजे आहे,
चमचमटलेला लेझर आहे !
गणपती मनाला भक्तांना,
सांभाळा हा फक्त टिझर आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8678
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
9सप्टेंबर 2024
 

Sunday, September 8, 2024

दैनिक वात्रटिका वाचकांचे अभिप्राय


 

दैनिक वात्रटिका l 7सप्टेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 100 वा


दैनिक वात्रटिका l 7सप्टेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 100 वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

महायुतीचे देखावे....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

महायुतीचे देखावे

कुठे एकीचे;कुठे बेकीचे,
गणपतीपुढे देखाव्यावर देखावे,
महायुतीच्या देखाव्यांना,
सांग आपण कसे बरे रोखावे ?

ज्याने त्याने आपले अस्तित्व,
देखाव्यामधून जपले आहे .
इथे आमचे काहीच नाही,
जे ते सगळेच आपापले आहे.

जशी आहे लाडकी बहीण,
तसा बाप्पासुद्धा लाडका आहे !
श्रेयवादाच्या स्पर्धेला,
देखाव्यांचा खमंग तडका आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8677
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
8सप्टेंबर 2024
 

Saturday, September 7, 2024

दैनिक वात्रटिका l 7सप्टेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 99 वा


दैनिक वात्रटिका l 7सप्टेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 99 वा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

बाप रे बाप !...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

बाप रे बाप !

सर्वच राजकीय घराण्यांमध्ये,
जणू परंपरागत मस्त्या आहेत.
त्यामुळेच घरातल्या घरात,
त्यांच्या राजकीय कुस्त्या आहेत.

प्रत्येक राजकीय घराण्यात,
जणू दालबराबर मुर्गी आहे.
बापाविरुद्ध केवळ पोरगाच नाही,
बापाविरुद्ध चक्क पोरगी आहे.

हे सांगता येणार नाही,
कोण कोणापेक्षा अडमुठे आहेत?
काका - पुतण्यांच्या संघर्षापेक्षा,
हे राजकीय संघर्ष मोठे आहेत !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8676
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
7सप्टेंबर 2024
 

Friday, September 6, 2024

दैनिक वात्रटिका l 6सप्टेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 98 वा


दैनिक वात्रटिका l 6सप्टेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 98 वा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

जाहिरात संपादन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

जाहिरात संपादन

यांनी केलेल्या जाहिरातीमधून,
त्यांच्या चेहऱ्यावरती काट आहे.
महायुतीच्या प्रचाराला,
घटक पक्षांतूनच नाट आहे.

ज्याला जशी पाहिजे आहे तशी,
जाहिरात एडिट करायला लागले.
जे ते स्वतःच सरकारी योजनांचे,
जाहीरपणे क्रेडिट मारायला लागले.

नाव महायुती असले तरी,
त्यांची स्वतःवर जास्त प्रीती आहे.!
सहन होईना; सांगताही येईना,
महायुतीतल्या घटकांची कृती आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8675
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
6सप्टेंबर 2024
 

Thursday, September 5, 2024

दैनिक वात्रटिका l 5सप्टेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 97 वा


दैनिक वात्रटिका l 5सप्टेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 97 वा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

दैनिक वात्रटिका l 28मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 298वा l पाने -54

दैनिक वात्रटिका l 28मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 298वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1QFQFkgKdfL7eY4viFxy...