Wednesday, December 4, 2024

दैनिक वात्रटिका l 4 डिसेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 185 वा


दैनिक वात्रटिका l 4 डिसेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 185 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

मारकडवाडीचा संदेश...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

मारकडवाडीचा संदेश

मारकडवाडीच्या मतदारांचा दावा,
ईव्हीएमने दिलेला कौल फेक आहे.
मारकडवाडीचे उदाहरण म्हणजे,
स्वतः स्वतःचीच रियालिटी चेक आहे.

एक मारकडवाडी रोखली गेली,
पण सर्वांनाच असे रोखता येणार नाही.
कायदा आणि सुव्यवस्थेच्या मापात,
सच्ची लोकभावना जोखता येणार नाही.

बॅलेट पेपर नको; चिठ्ठ्या नको,
यंत्रणा आपली परीक्षा बघू शकते !
उद्या शाळेतले मॉनिटर निवडतानाही,
ईव्हीएम मशीन आणावे लागू शकते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8759
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
4 डिसेंबर2024
 

Tuesday, December 3, 2024

दैनिक वात्रटिका l 3 डिसेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 184 वा l पाने -42


दैनिक वात्रटिका l 3 डिसेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 184 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

लोकसंख्या वाढवा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

लोकसंख्या वाढवा

आपापल्या धार्मिकतेचे,
खरेखुरे दर्शन घडवा.
सगळीकडूनच आवाज येतोय,
आपली लोकसंख्या वाढवा.

लोकसंख्या वाढ शाप नाही,
लोकसंख्या एक वरदान आहे.
फक्त त्यालाच हे समजू शकते,
जो खरा कदरदान आहे.

लोकसंख्या वाढ प्रेरकांचा,
असा अजब गजब दावा आहे !
हम दो....हमारे तीन....
असा संकल्प त्यांना हवा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8758
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
3 डिसेंबर2024
 

Monday, December 2, 2024

दैनिक वात्रटिका l 2 डिसेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 183 वा l पाने -42

दैनिक वात्रटिका l 2 डिसेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 183 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.

 

नांदा सौख्य भरे...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

नांदा सौख्य भरे

मुहूर्त ठरला;स्थळ ठरले,
सुपारी फोडायला अडकित्ता नाही.
नवरा आणि नवरीचासुद्धा,
अजून कसलाच पत्ता नाही.

नवरा आणि नवरी सोडून,
कलवरे कलवऱ्याच नटल्या आहेत.
पाहुणे ठरले ; रावळे ठरले,
अनधिकृत पत्रिका वाटल्या आहेत.

ज्याची जुळवा जुळवा झाली,
ते तर आकड्यांचे कोष्टक आहे !
मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन..
लग्ना आधीच मंगल अष्टक आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
----------------------------
फेरफटका-8757
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
2 डिसेंबर2024
 

Sunday, December 1, 2024

दैनिक वात्रटिका l 1 डिसेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 182 वा


दैनिक वात्रटिका l 1 डिसेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 182 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.



 

ईव्हीएमची अग्निपरीक्षा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

ईव्हीएमची अग्निपरीक्षा

जसे कुणी कुणी अज्ञ आहेत,
तसे कुणी कुणी सुज्ञ आहेत.
ईव्हीएम वर बोलणारे,
कुणी कुणी संगणक तज्ञ आहेत.

सगळेच ईव्हीएम विरोधक,
अचानक एकवटले आहेत.
ज्यांची झाली होती बोलती बंद,
त्यांनासुद्धा कंठ फुटले आहेत.

निवडणूक आयोगाला सुद्धा,
आपला हेका नडता कामा नये !
किमान मतदार राजाचा तरी,
ईव्हीएमवरचा विश्वास उडता कामा नये !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8756
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
1 डिसेंबर2024
 

दैनिक वात्रटिका l 4 डिसेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 185 वा

दैनिक वात्रटिका l 4 डिसेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 185 वा l पाने -42 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1Elm-bAY7vNSQzSIn_iX...