Saturday, May 4, 2024

दैनिक वात्रटिका4मे2024....वर्ष- तिसरे..अंक -332 वा

दैनिक वात्रटिका
4मे2024....वर्ष- तिसरे..
अंक -332 वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

 

अतृप्त आत्मे...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

अतृप्त आत्मे

विधानसभेचे अतृप्त आत्मे,
लोकसभेत जागे होऊ लागले.
जमेल त्या झाडाला,
जमेल तसे झटे देऊ लागले.

सगळ्यात अतृप्त आत्म्यांनी,
पक्षच शिल्लक ठेवले नाहीत.
अजून तरी अतृप्त आत्म्यांच्या,
पिंडाला कावळे शिवले नाहीत.

सगळ्यात अतृप्त आत्म्यांना,
भटका-भटकी सोसावी लागते !
अतृप्त आत्मे दिसायला,
कावळ्यांची नजर असावी लागते !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
 

Friday, May 3, 2024

दैनिक वात्रटिका3मे2024....वर्ष- तिसरे..अंक -331वा


दैनिक वात्रटिका
3मे2024....वर्ष- तिसरे..
अंक -331वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

मळकट आणि जळकट...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

मळकट आणि जळकट

उमेदवारांचे हात बळकट करा,
मळकट हात ओरडायला लागले.
उमेदवारांच्या पाठीशी उभे रहा,
कळकट हात ओरडायला लागले.

मळकट आणि कळकट हातांची,
आज जळकट अशी एकी आहे.
त्यांची त्यांनाच पक्की खात्री आहे,
आपली सगळी फेकाफेकी आहे.

मळकट आणि कळकटांकडून,
आज विजयाच्या ललकाऱ्या आहेत !
जळकटांना जळकट म्हणायच्याही,
आजकाल चोऱ्या आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8551
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
3मे2024
 

Thursday, May 2, 2024

दैनिक वात्रटिका2मे2024....वर्ष- तिसरे..



दैनिक वात्रटिका
2मे2024....वर्ष- तिसरे..
अंक -330वा 
पाने -21
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

Wednesday, May 1, 2024

दैनिक वात्रटिका1मे2024....वर्ष- तिसरे..अंक -329वा


दैनिक वात्रटिका
1मे2024....वर्ष- तिसरे..
अंक -329वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

उमेदवारीच्या खेळ्या ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

उमेदवारीच्या खेळ्या

कुणी उभे केलेले आहेत,
कुणी उभे राहिले आहेत.
कुणी हौसोबा-नवसोबा,
कुणी नहिले पे दहीले आहेत.

जशी डमीची कमी नाही,
तशी जिंकण्याचीही हमी नाही.
उमेदवारांची खोगीरभरती,
त्यामुळेच तर कुठेच कमी नाही.

जातीपाती आणि नातीगोती,
सगळेच फंडे खेळ्यात आहेत !
प्रत्यक्ष उमेदवारांबरोबरच,
मतदारही बुचकळ्यात आहेत !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8550
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
1मे2024
 

Tuesday, April 30, 2024

दैनिक वात्रटिका30एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -328 वा

दैनिक वात्रटिका
30एप्रिल2024....वर्ष- तिसरे..
अंक -328 वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

 

मामला गडबड हैं..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

मामला गडबड हैं..

जाहिराती आदळू लागल्या,
प्रचार सभा खिदळू लागल्या.
आरोप आणि प्रत्यारोपाच्या,
पुष्पमालाही उधळू लागल्या.

कुणी रेटून बोलतो आहे,
कुणी नटून थटून बोलतो आहे.
कुणी आधीच विझलेला,
कुणी कुणी पेटून बोलतो आहे.

कुणाला विजय दिसतो आहे,
कुणाला पराभव दिसतो आहे !
मतदार राजा मात्र,
स्वतःच स्वतःवर हसतो आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8549
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
30एप्रिल2024
 

Monday, April 29, 2024

दैनिक वात्रटिका29एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -327 वा


 दैनिक वात्रटिका
29एप्रिल2024....वर्ष- तिसरे..
अंक -327 वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

उपद्रव मूल्य...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

उपद्रव मूल्य

उपयोगीता मूल्य दाखविता येत नाही,
तेच उपद्रव मूल्य दाखवायला लागले.
आपल्या उपद्रव मूल्याच्या कंड्या,
तेच जोर जोराने पिकवायला लागले.

उपद्रवमूल्य दाखविणारांची,
भूमिकाच अगदी टोकाची आहे.
त्यांनाही माहिती असते,
झाकली मूठ किती लाखाची आहे?

उपयोगीता मूल्यापेक्षाही,
उपद्रव मूल्याचा गाजावाजाअसतो !
निसटत्या पराभवामागे,
उपद्रव्य मूल्यावाल्याचा भेजा असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8548
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
29 एप्रिल2024
 

Sunday, April 28, 2024

दैनिक वात्रटिका28एप्रिल2024....वर्ष- तिसरे..


दैनिक वात्रटिका
28एप्रिल2024....वर्ष- तिसरे..
अंक -326वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

एनर्जी स्टॉक...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

एनर्जी स्टॉक

उद्याच्या आशेवरती,
सगळेचजण जगत आहेत.
म्हणूनच लोकसभेकडे,
कुणी तटस्थपणे बघत आहेत.

विधानसभेच्या आशेपोटी,
लोकसभेचे द्राक्ष आंबट आहेत.
लोकांच्या चर्चासुद्धा,
जास्तच आंबट चिंबट आहेत.

कुणा-कुणाच्या भविष्यावर,
आजच्या पुरते तरी लॉक आहे!
म्हणे विधानसभेसाठी,
त्यांचा एनर्जी स्टॉक आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8547
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
28एप्रिल2024
 

Saturday, April 27, 2024

दैनिक वात्रटिका27एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -325वा


दैनिक वात्रटिका
27एप्रिल2024....वर्ष- तिसरे..
अंक -325वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

गद्दारीच्या व्याख्या ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

गद्दारीच्या व्याख्या

आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कार्टे,
या गोष्टी अगदी पक्क्या आहेत.
ज्याच्या त्याच्या गद्दारीच्या,
आपल्या सोयीनुसार व्याख्या आहेत.

आजकाल कुऱ्हाडीचे दांडे,
आपल्याच गोताचे काळ आहेत.
त्यांचेच तर एकमेकांवरती,
गद्दारीचे रोखठोक आळ आहेत.

आता हे असेच होत राहणार,
ह्या गोष्टी गृहीत धराव्या लागतील !
गद्दारीच्या नव्या नव्या व्याख्या,
जनतेला तयार कराव्या लागतील !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8546
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
27 एप्रिल2024
 

Friday, April 26, 2024

दैनिक वात्रटिका26एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका
26एप्रिल2024....वर्ष- तिसरे..
अंक -324वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

 

दबाव तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

दबाव तंत्र

एकमेका साह्य करू..
जरी हा मंत्र चालू आहे.
तरीही मित्रांचे मित्रांवरती,
दबाव तंत्र चालू आहे.

जसे मित्रांचेच मित्रांवरती,
पुन्हा पुन्हा दबाव आहेत.
प्रत्येक तिकिटा तिकीटावर,
दबाव तंत्रांचे प्रभाव आहे.

कुणाचा चालला तळतळाट,
कुणाचा रुसवा फुगवा आहे !
मित्रांचा मित्रांपुढे,
उमेदवारीचा जोगवा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8545
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
26एप्रिल2024
 

Thursday, April 25, 2024

दैनिक वात्रटिका25एप्रिल2024....वर्ष- तिसरे..


दैनिक वात्रटिका
25एप्रिल2024....वर्ष- तिसरे..
अंक -323 वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

गर्दीचा शोध...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

गर्दीचा शोध

पक्ष फुटले;नेते फुटले,
प्रचार सभांना गर्दी आहे.
जरूर आपला मतदार राजा,
खरोखरच दर्दी आहे.

ऐकावे जनाचे;करावे मनाचे,
अशी काहीशी अवस्था असेल.
किंवा सगळीकडच्या गर्दीची,
काहीतरी व्यवस्था असेल.

प्रचार सभांच्या गर्दीचे,
खूप वेगवेगळे गुपित आहे !
तन- मन- धन लावूनही गर्दी नाही,
त्याचे राजकारण शापित आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8544
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
25एप्रिल2024
 

Wednesday, April 24, 2024

दैनिक वात्रटिका24एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -322 वा


दैनिक वात्रटिका
24एप्रिल2024....वर्ष- तिसरे..
अंक -322 वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

ॲक्शन रिॲक्शन..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

ॲक्शन रिॲक्शन

कुठे प्रचार शांतपणे,
कुठे प्रचार भडकला आहे.
लोकसभेच्या पायामध्ये,
विधानसभेचा पाय अडकला आहे.

कुणाची सीट खात्रीशीर,
कुणाची सीट धोक्यात आहे.
सगळे गणितं बांधताना,
विधानसभा डोक्यात आहे.

प्रत्येकाच्या डावपेचाला,
विधानसभा कारण आहे !
विधानसभेच्या सुटकेसाठी,
लोकसभा तारणआहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8543
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
24एप्रिल2024
 

Tuesday, April 23, 2024

दैनिक वात्रटिका 23एप्रिल2024....वर्ष- तिसरे..




दैनिक वात्रटिका
23एप्रिल2024....वर्ष- तिसरे..
अंक -321 वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

दैनिक वात्रटिका4मे2024....वर्ष- तिसरे..अंक -332 वा

दैनिक वात्रटिका 4मे2024....वर्ष- तिसरे.. अंक -332 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1UyLeMOndM9XLNExsNiNHCgV0d...