Tuesday, April 23, 2024

दैनिक वात्रटिका 23एप्रिल2024....वर्ष- तिसरे..




दैनिक वात्रटिका
23एप्रिल2024....वर्ष- तिसरे..
अंक -321 वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

यु टर्न ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

यु टर्न

कालच्या आपल्या सच्चाईचा,
अचानक बळी द्यावा लागतो.
सरळसोट घडले नाही की,
कुणालाही यु टर्न घ्यावा लागतो.

राजकारणामध्ये तर यू-टर्नचे,
वळणावरती नवे वळण असते.
आपल्याच सच्चाईची,
लोळणावरती नवी लोळण असते.

यु टर्न मारायची सवय झाली की,
साधे सरळही चालता येत नाही !
आपलाच बाणेदारपणाही,
आपल्यालाच पेलता येत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8542
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
23एप्रिल2024
 

Monday, April 22, 2024

दैनिक वात्रटिका22एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -320वा


दैनिक वात्रटिका
22एप्रिल2024....वर्ष- तिसरे..
अंक -320वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

आत्मवंचना....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

आत्मवंचना

ना त्यांना वेड लागले आहे,
न यांना वेड लागले आहे.
सत्तेच्या वाटेकऱ्यांना,
सगळेच गोड लागले आहे.

जसे तेही स्वप्नाळू आहेत,
तसे हेही स्वप्नाळू आहेत.
ते जर बाळू असतील तर,
हेसुद्धा नक्की काळू आहेत.

तुंबलेल्या गटारगंगेचा,
पंचवार्षिक निचरा आहे !
एकमेकांच्या इज्जतीचा,
हातानेच कचरा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8541
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
22एप्रिल2024
 

Sunday, April 21, 2024

दैनिक वात्रटिका21एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -319वा


दैनिक वात्रटिका
21एप्रिल2024....वर्ष- तिसरे..
अंक -319वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

उमेदवारीचा जुगार ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

उमेदवारीचा जुगार

कुणा कुणाचे गेले बुक,
कुणाची रम्मीच आरार आहे.
कुणाची झाली टांगा पलटी,
कुणाचे घोडेच फरार आहे.

हाती हुकूमाचे पत्ते असूनही,
कुणी नाविलाजाने पॅक आहे.
जे जे गुलाम;आदेशाला सलाम,
त्यांचे तर डोकेच क्रॅक आहे.

ज्यांची पानेच उलटी पडली,
त्यांची तर चक्क माघार आहे!
पुन्हा नव्याने सिद्ध झाले,
निवडणूक पक्का जुगार आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8540
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
21एप्रिल2024
 

Saturday, April 20, 2024

दैनिक वात्रटिका20एप्रिल2024....वर्ष- तिसरे..


दैनिक वात्रटिका
20एप्रिल2024....वर्ष- तिसरे..
अंक -318वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

उमेदवारीचे मायाजाल...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

उमेदवारीचे मायाजाल

कोणत्याही निवडणुकीमध्ये,
एक चालूपणा नक्की केला जातो.
नाव सारखे असणारा उमेदवार,
आपल्या विरोधकांपुढे दिला जातो.

जसे नाम साधर्म्य शोधले जाते,
तसे चिन्ह साधर्म्यही शोधले जाते.
गोंधळात गोंधळाचे मायाजाल,
मतदारांवरती लादले जाते.

एका जातीचे; एका धर्माचे,
ही चाल तर नेहमीच खेळली जाते !
निवडणूक म्हणजे ना युद्ध ना प्रेम,
तरीही जनता याला भाळली जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8539
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
20एप्रिल2024
 

Friday, April 19, 2024

दैनिक वात्रटिका19एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -317वा


दैनिक वात्रटिका
19एप्रिल2024....वर्ष- तिसरे..
अंक -317वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

गोड अपघात...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

गोड अपघात

उमेदवारीच्या स्पर्धेमध्ये
परस्परांवरती मात आहे.
कुणाकुणाची उमेदवारी,
हा निव्वळ अपघात आहे.

कुणासाठी गोड आहे,
कुणासाठी अपघात कडू आहे.
कुठे कुठेतर विरोधात,
चक्क आपलाच भिडू आहे.

कुठे मैत्रीपूर्ण लढती,
कुठे लुटूपुटूच्या लढाया आहेत !
काटे की टक्कर असल्याच्या,
सगळीकडून बढाया आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8538
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
19 एप्रिल2024
 

Thursday, April 18, 2024

दैनिक वात्रटिका18एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -316वा


दैनिक वात्रटिका
18एप्रिल2024....वर्ष- तिसरे..
अंक -316वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

संघटनेचे बळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

संघटनेचे बळ

राजकीय पक्षांवाल्यांपेक्षा
संघटनावालेच जास्त फॉर्मत आहेत.
या नाहीतर त्या राजकीय पक्षांच्या,
उमेदवाऱ्या त्यांच्या कर्मात आहे.

जाती-धर्म,शिक्षणाबरोबरच,
शेतकरी संघटनावालेही त्यात आहेत.
बाकीचेही तुम्हीच ओळखू शकता,
उरलेले जे जे कोणी यात आहेत.

प्रत्येक संघटनेवाल्यांकडे,
आपले आपले हुकमी कार्ड आहे !
संघटनावाल्यांच्याच हातामध्ये,
प्रत्येक पक्षा-पक्षाचं नरडं आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8537
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
18 एप्रिल2024
 

Wednesday, April 17, 2024

दैनिक वात्रटिका17एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -315वा


दैनिक वात्रटिका
17एप्रिल2024....वर्ष- तिसरे..
अंक -315वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

परिस्थितीजन्य पुरावे..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

परिस्थितीजन्य पुरावे

उतलेल्या आणि मातलेल्यांसाठी,
अगदी अनुकूल असा काळ आहे.
बंडोबा,थंडोबा आणि कंडोबांच्या,
गळ्यात उमेदवारीची माळ आहे.

गरजवंतांना अक्कल नसते,
सगळे काही असेच झाले आहे.
बंडोबा,थंडोबा आणि कंडोबांकडून,
आपल्या लोकशाहीचे चांगभले आहे.

जे निवडणुकीला उभे राहिले,
त्यातलेच कुणीतरी निवडून येतील !
उद्या हेच बंडोबा थंडोबा आणि कांडोबा,
एकमेकांना जाहीर पाठिंबा देतील !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8536
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
17 एप्रिल2024
 

Tuesday, April 16, 2024

दैनिक वात्रटिका16एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -314 वा


 दैनिक वात्रटिका
16एप्रिल2024....वर्ष- तिसरे..
अंक -314 वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

डिनर डिप्लोमसी..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

डिनर डिप्लोमसी

साग्र संगीत अंगत पंगत केली की,
त्याला डिनर डिप्लोमसी म्हणतात.
राजकारण्यांची ही थिअरी,
लोकही प्रॅक्टिकलसह जाणतात.

डिनर डिप्लोमसीमध्ये,
खाल्ल्या मिठाला जागावे लागते.
अंगती पंगतीत मिठाचा खडा पडू नये,
हे सुद्धा टेबलावरती बघावे लागते.

जशी अंगत पंगत स्वीकारली जाते,
तशी अंगत पंगत नाकारली जाते !
खाल्ल्या घराचे वासे न मोजण्यासाठी,
कधीकधी संगत नाकारली जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8535
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
16 एप्रिल2024
 

Monday, April 15, 2024

दैनिक वात्रटिका15एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -313 वा


 दैनिक वात्रटिका
15एप्रिल2024....वर्ष- तिसरे..
अंक -313 वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

तिकिटांचा सुकाळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

तिकिटांचा सुकाळ

सगळ्याच राजकीय पक्षांचे,
टाक्यावर टाके ढिले आहेत.
बंडखोरी वाढण्याचे कारण,
पर्यायच पर्याय खुले आहेत.

इकडून नाही तर तिकडून,
उमेदवारीची पक्की खात्री आहे.
ज्याला आधीच दिले होते,
त्याच्या तिकिटालाही कात्री आहे.

ज्याचे तिकीट कापले गेले,
त्यालासुद्धा काही वाटत नाही !
खरी गोम अशी की,
पक्ष पक्षाला उमेदवार भेटत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8534
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
15 एप्रिल2024
 

Sunday, April 14, 2024

दैनिक वात्रटिका14एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -312वा

दैनिक वात्रटिका
14एप्रिल2024....वर्ष- तिसरे..
अंक -312वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

बालिशपणा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

बालिशपणा

प्रत्येकाच्या सवाल जवाबाचे,
अगदी वेगळेच तर्कट आहे.
पोरकट असतात सवाल,
आणि जवाबही पोरकट आहे.

ते सवाल;तेच जवाब,
बघा सगळेच कसे बालिश आहे.
सगळे मटेरियल जुने,
वरून फक्त नवी पॉलिश आहे.

कुणाचा राजकीय कच्चेपणा आहे,
कुणाचा राजकीय बच्चेपणा आहे !
आपल्या लबाडीलाच म्हणतात,
हाच आमचा सच्चेपणा आहे !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8533
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
14 एप्रिल2024
 

Saturday, April 13, 2024

दैनिक वात्रटिका13एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -311वा


दैनिक वात्रटिका
13एप्रिल2024....वर्ष- तिसरे..
अंक -311वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

फजितवाडा ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

फजितवाडा

आरोप आणि प्रत्यारोपांचा,
एकच ठोका चालू आहे.
आपल्याच भूतकाळावर,
वर्तमानाची टीका चालू आहे.

काल ज्यांचे कौतुक केले,
त्यांच्यावरच आज टीका आहे.
काल ज्यांच्यावर टीका केली,
आज त्यांच्या कौतुकाचा ठेका आहे.

वर्तमान आणि भूतकाळ बघून,
सगळ्यांवरती भविष्य हसते आहे !
सगळ्यांची चाललेली फजिती,
त्याला बरोबर दिसते आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8532
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
13 एप्रिल2024
 

दैनिक वात्रटिका 23एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 23एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -321 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1L7d09rSTvZKajObapVCl...