आजची वात्रटिका
--------------------------
सर्वांच्या तोंडी एकच चर्चा,
लाडकी आणि लाडकी आहे.
तोपर्यंत बातमी आली,
तिजोरीत म्हणे कडकी आहे.
विरोधकांच्या तोंडी सुद्धा,
फक्त लाडकी एक लाडकी आहे.
बहिणीचे लाड कसे पुरवायचे?
तिजोरीला म्हणे धडकी आहे.
ज्याच्या त्याच्या आवडीचा,
लाडकी हा शब्द लाडका आहे !
उठसूट कोणत्याही प्रकरणाला,
लाडकी शब्दाचा तडका आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8635
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
27जुलै 2024