Sunday, October 6, 2024

गोडी - गुलाबी ..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
गोडी - गुलाबी
गुलाबी गुलाबी रंगाचा,
गुण नाही पण वाण लागला आहे.
कालच्या 'दादागिरी' च्या भाषेला,
मवाळतेचा बाण लागला आहे.
एक घाव दोन तुकडे नाहीत,
आता संयम आणि सबुरी आहे.
सारे बोलणे तोलून मापून,
ही तर राजकीय मजबुरी आहे.
राजकीय मजबुरी असली तरी,
त्यांना नरमाई काही शोभत नाही !
राजकीय गोडी- गुलाबीशिवाय,
आजकाल कुणाचेच निभत नाही!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8704
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
6ऑक्टोबर 2024

 

Saturday, October 5, 2024

दैनिक वात्रटिका l 5ऑक्टोबर2024 वर्ष- चौथेअंक - 127वा

दैनिक वात्रटिका l 5ऑक्टोबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 127वा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.

 

वन नेशन वन इलेक्शन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

वन नेशन वन इलेक्शन

लोकसभा निवडणुकीला,
सात फेऱ्यांचा फेरा होता.
वन नेशन वन इलेक्शनचा,
तरीसुद्धा त्यांचा नारा होता.

वन नेशन वन इलेक्शन,
यातच त्यांना धन्यता आहे.
वन नेशन वन इलेक्शनला,
सरकारचीही मान्यता आहे.

वन नेशन वन इलेक्शनमध्ये,
त्यांचे वेगळेच लक्ष्य आहे !!
सरकारच्या डोक्यात म्हणे,
एक देश एक पक्ष आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8703
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
5ऑक्टोबर 2024
 

Friday, October 4, 2024

दैनिक वात्रटिका l 4ऑक्टोबर2024 वर्ष- चौथेअंक - 126वा

दैनिक वात्रटिका l 4ऑक्टोबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 126वा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.

 

अभिजात मराठी !...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

अभिजात मराठी !

धर्म मराठी,जात मराठी.
बाहेर मराठी,आत मराठी.
अभिमानाने बोलतो आम्ही,
आमची अभिजात मराठी.

श्वास मराठी,ध्यास मराठी,
चिऊ काऊचा घास मराठी.
संत,पंत आणि तंतांचा;
चिरंजीव सहवास मराठी.

इकडे मराठी;तिकडे मराठी,
हिमालयावरही फडफडे मराठी !
ज्ञानभाषेचे स्वप्न उराशी,
राजकारणाच्या पलीकडे मराठी !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8702
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
4ऑक्टोबर 2024
 

Thursday, October 3, 2024

दैनिक वात्रटिका l 3ऑक्टोबर2024 वर्ष- चौथेअंक - 125वा


दैनिक वात्रटिका l 3ऑक्टोबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 125वा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

जागा वाटप...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

जागा वाटप

ज्याला त्याला वाटत राहते,
हाच बालेकिल्ला;हाच गड आहे.
त्यामुळेच निवडून येणे सोपे,
पण जागा वाटप अवघड आहे.

प्रचारापेक्षाही जास्त शक्ती,
जागा वाटपात आटली जाते.
इच्छुक जरी अनेक असले तरी,
ती कुणा एकालाच सुटली जाते.

हवी ती जागा मिळविण्यासाठी,
मित्रांसोबतच द्रोह करावे लागतात !
विरोधकांशी लढाई खेळताना,
आपसातच तह करावे लागतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8701
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
3ऑक्टोबर 2024
 

Wednesday, October 2, 2024

दैनिक वात्रटिका l 2ऑक्टोबर2024 वर्ष- चौथेअंक - 124वा



दैनिक वात्रटिका l 2ऑक्टोबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 124वा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

लड्डू मुत्त्याचा ट्रेंड ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

लड्डू मुत्त्याचा ट्रेंड

आजकाल सोशल मीडियावरती,
लड्डू मुत्त्याचा ट्रेंड आला आहे.
सोशल मीडियावरील नेटकरी
लड्डू मुत्त्याचा 'फॅन' झाला आहे.

भाविक भक्त जेवढे भोळे,
तेवढेच भाविक भक्त अंध आहेत.
काहींचा वरचा मजला रिकामा,
काही काही तर मतिमंद आहेत.

किती बुवा बाबा आले गेले,
लड्डू मुत्त्याचा औरच थाट आहे !
भल्या भल्याची वाट लावू शकते,
अशी सोशल मीडियाची वाट आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8700
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
2 ऑक्टोबर 2024
 

Tuesday, October 1, 2024

दैनिक वात्रटिका l 1ऑक्टोबर2024 वर्ष- चौथेअंक - 123वा


दैनिक वात्रटिका l 1ऑक्टोबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 123वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

बैल म्हणाला बैलाला...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

 

आजची वात्रटिका
--------------------------

बैल म्हणाला बैलाला

कुणी झाल्या लाडक्या बहिणी,
कुणी झाल्या राज्यमाता-गोमाता.
आपण बसू गोमाशा हाणीत,
सांग नेमके काय करायचे आता?

त्या राज्यमाता गोमाता झाल्या तर,
आपणही राज्यपिता होऊ शकतो.
कुणी म्हणायचे तेव्हा म्हणेल,
आपण आपले म्हणून घेऊ शकतो.

स्त्री- पुरुष समानतेला तर,
सरकारकडूनच फाटा आहे !
त्या राज्यमाता-गोमाता होण्यात,
आपलाच तर सिंहाचा वाटा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8699
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
1 ऑक्टोबर 2024

गोडी - गुलाबी ..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- गोडी - गुलाबी गुलाबी गुलाबी रंगाचा, गुण नाही पण वाण लागला आहे. कालच्या 'दादागिरी' च्या भाष...