आजची वात्रटिका
-------------------------
राजकीय भूक
कधी उघड;कधी आडून,
राजकारण घुसवले जाते.
मुद्दा कितीही चांगला असो,
त्याचे बुड बसवले जाते.
एकदा राजकारण घुसले की,
सगळी वाट लागली जाते !
आपला फायदा झाला की
राजकीय भूक भागली जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------
दैनिक वात्रटिका
9जून2023
Friday, June 9, 2023
दैनिक वात्रटिका9जून203वर्ष तिसरेअंक - पाचवा
दैनिक वात्रटिका
9जून203
वर्ष तिसरे
अंक - पाचवा
अंक डाऊनलोड लिंक-
कसाब करणी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
-------------------------
कसाब करणी
धार्मिक दंगली पाठोपाठ,
राजकीय दंगली घडू लागतात.
आरोप प्रत्यारोपांच्या फैरी,
मोठ्या जोरात झडू लागतात.
दंगलीचा फायदा उठवायला,
सगळेच उतावळे होवू लागतात,
कुणी कुणी होतात गिधाडे,
कुणी डोमकावळे होवू लागतात.
राजकीय नेत्यांचे हे पक्षांतर,
आगामी दंगलीची पेरणी असते !
आपल्या राजकीय फायद्यासाठी,
नेत्यांची कसाब करणी असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
चिमटा-6829
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
9जून2023
Thursday, June 8, 2023
दैनिक वात्रटिका 8जून203 वर्ष तिसरे...
दैनिक वात्रटिका
8जून203
वर्ष तिसरे
अंक चौथा
अंक डाऊनलोड लिंक
https://drive.google.com/file/d/1iDJa37ODb7LfgysN1RyrPmolPsoJyeTu/view?usp=drivesdk
8जून203
वर्ष तिसरे
अंक चौथा
अंक डाऊनलोड लिंक
https://drive.google.com/file/d/1iDJa37ODb7LfgysN1RyrPmolPsoJyeTu/view?usp=drivesdk
ऐतिहासिक वापर....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
-------------------------
ऐतिहासिक वापर
दंगल कुठलीही असो,
दंगलीमागे एकच सूत्र असते.
बहुतेक दंगलीचे कारण,
एखादे ऐतिहासिक किंवा
पौराणिक पात्र असते.
पुराणाचा आणि इतिहासाचा,
असा ऐतिहासिक वापर आहे !
परस्परांच्या डोक्यावरती,
दंगलीचे खापर आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8273
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
8जून2023
-------------------------
ऐतिहासिक वापर
दंगल कुठलीही असो,
दंगलीमागे एकच सूत्र असते.
बहुतेक दंगलीचे कारण,
एखादे ऐतिहासिक किंवा
पौराणिक पात्र असते.
पुराणाचा आणि इतिहासाचा,
असा ऐतिहासिक वापर आहे !
परस्परांच्या डोक्यावरती,
दंगलीचे खापर आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8273
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
8जून2023
सोशल मीडियाचे कोलीत...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
-------------------------
सोशल मीडियाचे कोलीत
वादग्रस्त सोशल मीडिया,
वादग्रस्त स्टेटस आणि पोस्ट आहे.
कायदा आणि सुव्यवस्थेची,
सोशल मीडियाकडून टेस्ट आहे.
नको त्याची टिंगल टवाळी आहे,
नको त्याचे उदात्तीकरण होते.
पुढे नाक खाजवणारे दिसले की,
माकडांनासुद्धा खूप स्फुरण येते.
खेळते वेगळे;खेळविणारे वेगळे,
याचेच हे विद्रूप असे फलित आहे !
जणू पेताड माकडांच्या हाती,
सोशल मीडियाचे कोलीत आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
चिमटा-6828
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
8जून2023
-------------------------
सोशल मीडियाचे कोलीत
वादग्रस्त सोशल मीडिया,
वादग्रस्त स्टेटस आणि पोस्ट आहे.
कायदा आणि सुव्यवस्थेची,
सोशल मीडियाकडून टेस्ट आहे.
नको त्याची टिंगल टवाळी आहे,
नको त्याचे उदात्तीकरण होते.
पुढे नाक खाजवणारे दिसले की,
माकडांनासुद्धा खूप स्फुरण येते.
खेळते वेगळे;खेळविणारे वेगळे,
याचेच हे विद्रूप असे फलित आहे !
जणू पेताड माकडांच्या हाती,
सोशल मीडियाचे कोलीत आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
चिमटा-6828
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
8जून2023
Wednesday, June 7, 2023
दैनिक वात्रटिकादिनांक-7जून 2023वर्ष तिसरे l अंक तिसराl
दैनिक वात्रटिका
दिनांक-7जून 2023
वर्ष तिसरे l अंक तिसरा
पाने -30
अंक डाउनलोड लिंक-
भ्रष्टाचाराची सार्वत्रिकता...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
-------------------------
भ्रष्टाचाराची सार्वत्रिकता
जसा तो जळी आहे;स्थळी आहे,
तसा तो काष्ठी आणि पाषाणी आहे.
भ्रष्टाचाराची सार्वत्रिकता हीच,
भ्रष्टाचाराची खरी निशाणी आहे.
जगात अशी एकही गोष्ट नाही,
जिथे भ्रष्टाचार करता येत नाही.
भ्रष्टाचाऱ्याला भ्रष्टाचाऱ्याचा,
कधीच हात धरता येत नाही.
भ्रष्टाचाराची सार्वत्रिकता,
हा काही मुळीच नवा शोध नाही !
स्त्री - पुरुष असला काही,
भ्रष्टाचाऱ्यांमध्ये लिंगभेद नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-8272
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
7जून2023
-------------------------
भ्रष्टाचाराची सार्वत्रिकता
जसा तो जळी आहे;स्थळी आहे,
तसा तो काष्ठी आणि पाषाणी आहे.
भ्रष्टाचाराची सार्वत्रिकता हीच,
भ्रष्टाचाराची खरी निशाणी आहे.
जगात अशी एकही गोष्ट नाही,
जिथे भ्रष्टाचार करता येत नाही.
भ्रष्टाचाऱ्याला भ्रष्टाचाऱ्याचा,
कधीच हात धरता येत नाही.
भ्रष्टाचाराची सार्वत्रिकता,
हा काही मुळीच नवा शोध नाही !
स्त्री - पुरुष असला काही,
भ्रष्टाचाऱ्यांमध्ये लिंगभेद नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-8272
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
7जून2023
राजकीय मजबूरी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
-------------------------
राजकीय मजबूरी
कुणीही कुणाला खेटू लागले,
कुणाचेही कुणाशी पटू लागले.
राजकीय सुसंवादाचे वातावरण,
जिकडे बघावे तिकडे वाटू लागले.
संवादाचा सुसंवाद होऊ शकतो,
इथे विसंवादाचे सुसंवाद होत आहेत.
आपल्याच राजकीय सुसंवादाला,
सगळेच मोठ्याने दाद देत आहेत.
पोटात एक;ओठात एक आहे,
ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे !
विसंवादाचे सूसंवाद झाले,
त्याचे कारण मात्र मजबुरी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------
चिमटा-6827
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
7जून2023
-------------------------
राजकीय मजबूरी
कुणीही कुणाला खेटू लागले,
कुणाचेही कुणाशी पटू लागले.
राजकीय सुसंवादाचे वातावरण,
जिकडे बघावे तिकडे वाटू लागले.
संवादाचा सुसंवाद होऊ शकतो,
इथे विसंवादाचे सुसंवाद होत आहेत.
आपल्याच राजकीय सुसंवादाला,
सगळेच मोठ्याने दाद देत आहेत.
पोटात एक;ओठात एक आहे,
ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे !
विसंवादाचे सूसंवाद झाले,
त्याचे कारण मात्र मजबुरी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------
चिमटा-6827
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
7जून2023
Tuesday, June 6, 2023
पूल....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
-------------------------
पूल
उद्घाटनाच्या अगोदरच,
काही पूल उड्डाण घेऊ लागले.
पाणी कुठे मुरतेय ते बघायला,
काही पूल नदीत जाऊ लागले.
जिथे जमेल तिथे भ्रष्टाचारी,
भ्रष्टाचाराचे पूल जोडू लागले.
नदीत मुरलेले पाणीच,
पूलाला आपल्याकडे ओढू लागले.
केवळ पूलच नाही तर,
पैसेही पाण्यात जायला लागले !
भ्रष्टाचारी होतात नामानिराळे,
पूलांचे विसर्जन व्हायला लागले !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
फेरफटका-8271
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
6जून2023
-------------------------
पूल
उद्घाटनाच्या अगोदरच,
काही पूल उड्डाण घेऊ लागले.
पाणी कुठे मुरतेय ते बघायला,
काही पूल नदीत जाऊ लागले.
जिथे जमेल तिथे भ्रष्टाचारी,
भ्रष्टाचाराचे पूल जोडू लागले.
नदीत मुरलेले पाणीच,
पूलाला आपल्याकडे ओढू लागले.
केवळ पूलच नाही तर,
पैसेही पाण्यात जायला लागले !
भ्रष्टाचारी होतात नामानिराळे,
पूलांचे विसर्जन व्हायला लागले !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
फेरफटका-8271
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
6जून2023
जात्यांधता...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
-------------------------
जात्यांधता
डोळे मिटलेल्या बोक्यांच्या तर,
ही गोष्ट लक्षात येणारही नाही.
पुरोगामी महाराष्ट्राला जात सांगते,
मी गेले नाही आणि जाणारही नाही.
काही बोक्यांनी डोळे मिटलेत,
काहींच्या डोळ्यावरती पडदे आहेत.
इथे जसे माणुसकीचे मुडदे आहेत,
तसे ते पुरोगामीत्वाचेही मुडदे आहेत.
अमुक माजलेत;तमुक माजलेत,
असे म्हणत जातीयता माजते आहे !
जातीयतेच्या शूद्र मानसिकतमुळे,
जातच जातीला पाणी पाजते आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6826
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
6जून2023
-------------------------
जात्यांधता
डोळे मिटलेल्या बोक्यांच्या तर,
ही गोष्ट लक्षात येणारही नाही.
पुरोगामी महाराष्ट्राला जात सांगते,
मी गेले नाही आणि जाणारही नाही.
काही बोक्यांनी डोळे मिटलेत,
काहींच्या डोळ्यावरती पडदे आहेत.
इथे जसे माणुसकीचे मुडदे आहेत,
तसे ते पुरोगामीत्वाचेही मुडदे आहेत.
अमुक माजलेत;तमुक माजलेत,
असे म्हणत जातीयता माजते आहे !
जातीयतेच्या शूद्र मानसिकतमुळे,
जातच जातीला पाणी पाजते आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6826
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
6जून2023
Monday, June 5, 2023
दैनिक वात्रटिका 5 जून 2023 अंक पहिला l वर्ष तिसरे
दैनिक वात्रटिका
5 जून 2023
अंक पहिला l वर्ष तिसरे
अंक डाउनलोड लिंक-
https://drive.google.com/file/d/1g0UVr5iu4DJv3Qjogoi2r0fVdSvtgoM2/view?usp=drivesdk
शाळेचा वेध...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
---------------------
शाळेचा वेध
कळत नाही वेधशाळा,
ज्योतिषासारख्या का वागतात?
पावसाची शक्यता नाही सांगताच,
लोक छत्र्या घेऊन निघतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-543
दैनिक झुंजार नेता
15जून2001
पावसाची नामांतरं....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
-------------------------
पावसाची नामांतरं
कधी रिपरिप तर कधी रिमझिम,
कधी कुसळ,कधी मुसळधार वाटतो.
वादळाला सोबत घेऊन आला की,
तो गारपिट्या आणि धुवांधार वाटतो.
वेळेपूर्वी आला की मान्सूनपूर्व,
वेळेत आला की मोसमी म्हटले जाते.
त्याला वाट्टेल तेव्हा तो आला की,
त्यालाच मग बेमोसमी म्हटले जाते.
कधी कधी आधीमधी आला की,
अवकाळ गाभडे असे हिणवले जाते !
पावसालाही आपल्या लहरीप्रमाणे,
आपल्या शब्दांचे गुलाम बनवले जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
चिमटा-6825
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
5जून2023
-------------------------
पावसाची नामांतरं
कधी रिपरिप तर कधी रिमझिम,
कधी कुसळ,कधी मुसळधार वाटतो.
वादळाला सोबत घेऊन आला की,
तो गारपिट्या आणि धुवांधार वाटतो.
वेळेपूर्वी आला की मान्सूनपूर्व,
वेळेत आला की मोसमी म्हटले जाते.
त्याला वाट्टेल तेव्हा तो आला की,
त्यालाच मग बेमोसमी म्हटले जाते.
कधी कधी आधीमधी आला की,
अवकाळ गाभडे असे हिणवले जाते !
पावसालाही आपल्या लहरीप्रमाणे,
आपल्या शब्दांचे गुलाम बनवले जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
चिमटा-6825
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
5जून2023
Sunday, June 4, 2023
राजकीय सभ्यता....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
-------------------------
राजकीय सभ्यता
कुणी धरणग्रस्त होते,
कुणी थुंकीग्रस्त आहेत.
त्यांच्याच कुरघोड्यांनी,
लोक मात्र त्रस्त आहेत.
एकाची धरणात लघुशंका,
दुसरा केवळ थुकला आहे.
दोघांचाही एकमेकांना,
सभ्यतेचा दाखला आहे.
राजकीय सभ्यतेचा,
दोघांकडूनही बाऊ आहे !
दगडापेक्षा वीट म्हणे,
कितीतरी मऊ आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8270
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
4जून2023
-------------------------
राजकीय सभ्यता
कुणी धरणग्रस्त होते,
कुणी थुंकीग्रस्त आहेत.
त्यांच्याच कुरघोड्यांनी,
लोक मात्र त्रस्त आहेत.
एकाची धरणात लघुशंका,
दुसरा केवळ थुकला आहे.
दोघांचाही एकमेकांना,
सभ्यतेचा दाखला आहे.
राजकीय सभ्यतेचा,
दोघांकडूनही बाऊ आहे !
दगडापेक्षा वीट म्हणे,
कितीतरी मऊ आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8270
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
4जून2023
डबल धमाका...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
-------------------------
डबल धमाका
उत्सवांवर राजकारणाचा,
रंग नेहमीच ओतला जातो.
तिथी आणि तारखेचा,
नेहमीच घोळ घातला जातो.
नेहमीच तारखेमध्ये तिथीचे,
हळूच पिल्लू सोडले जाते.
एकदा रान मोकळे भेटले की,
जोरात पिल्लू उडले जाते.
समर्थक आणि विरोधक,
एकमेकांना भिडवला जातो !
खेळ रंगात आला की,
डबल धमाका उडवला जातो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------
चिमटा-6824
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
4जून2023
-------------------------
डबल धमाका
उत्सवांवर राजकारणाचा,
रंग नेहमीच ओतला जातो.
तिथी आणि तारखेचा,
नेहमीच घोळ घातला जातो.
नेहमीच तारखेमध्ये तिथीचे,
हळूच पिल्लू सोडले जाते.
एकदा रान मोकळे भेटले की,
जोरात पिल्लू उडले जाते.
समर्थक आणि विरोधक,
एकमेकांना भिडवला जातो !
खेळ रंगात आला की,
डबल धमाका उडवला जातो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------
चिमटा-6824
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
4जून2023
Saturday, June 3, 2023
थुकटपणा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
-------------------------
थुकटपणा
आधी फक्त पिपाण्याचे फुंकायचे,
फुंकता फुंकता भुंकायला लागले.
फुंकणे आणि भुंकणे सहन होताच,
आता तर चक्क थुंकायला लागले.
दाताखाली जीभ चावली तरी,
कुणाच्या नावाने थुंकणे बरे नाही.
आपलीच पिंक;आपलीच पिंकदानी,
तरी किळसवाणे पिंकणे बरे नाही.
आम्ही काही कुणालाच कधी,
वेगवेगळ्या मापाने तोलत नाही !
कितीही तोंडदेखलेपणा केला तरी,
कॅमेरा मुळीच झूठ बोलत नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
चिमटा-6823
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
3जून2023
-------------------------
थुकटपणा
आधी फक्त पिपाण्याचे फुंकायचे,
फुंकता फुंकता भुंकायला लागले.
फुंकणे आणि भुंकणे सहन होताच,
आता तर चक्क थुंकायला लागले.
दाताखाली जीभ चावली तरी,
कुणाच्या नावाने थुंकणे बरे नाही.
आपलीच पिंक;आपलीच पिंकदानी,
तरी किळसवाणे पिंकणे बरे नाही.
आम्ही काही कुणालाच कधी,
वेगवेगळ्या मापाने तोलत नाही !
कितीही तोंडदेखलेपणा केला तरी,
कॅमेरा मुळीच झूठ बोलत नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
चिमटा-6823
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
3जून2023
Friday, June 2, 2023
समृद्धी महामार्ग...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
-------------------------
समृद्धी महामार्ग
समृद्धी महामार्गावरती,
अपघातांची वृद्धी आहे.
दुर्दैवाने म्हणावे लागते,
अपघातांची समृद्धी आहे.
वेग म्हणजे झिंग असते,
वेग म्हणजे नशा आहे.
अपेक्षा केली समृद्धीची,
वास्तवात मात्र दशा आहे.
अपघात हा अपघात असतो,
पण तो टाळता येऊ शकतो!
मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक,
हा इशारा पाळता येऊ शकतो!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8269
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
2जून2023
-------------------------
समृद्धी महामार्ग
समृद्धी महामार्गावरती,
अपघातांची वृद्धी आहे.
दुर्दैवाने म्हणावे लागते,
अपघातांची समृद्धी आहे.
वेग म्हणजे झिंग असते,
वेग म्हणजे नशा आहे.
अपेक्षा केली समृद्धीची,
वास्तवात मात्र दशा आहे.
अपघात हा अपघात असतो,
पण तो टाळता येऊ शकतो!
मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक,
हा इशारा पाळता येऊ शकतो!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8269
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
2जून2023
महापुरुष जिंदाबाद !....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
-------------------------
महापुरुष जिंदाबाद !
आपल्या महापुरुषांची नावे आहेत.
महापुरुषांचे जसे गौरव आहेत,
तसेच त्यात राजकीय कावे आहेत.
राजकीय स्वार्थापोटी महापुरुष,
थेट रस्त्यावरती आणले गेले आहेत.
पुलापासून ते थेट विमानतळापर्यंत,
आपले महापुरुष विणले गेले आहेत.
कुणी नाणी आणि नोटांवर,
कुणी पोस्ट स्टॅम्पवर छापलेले आहेत!
कुणी उघड उघड;कुणी लपून छपून,
आपले महापुरुष ढापलेले आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------------
चिमटा-6821
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
2जून2023
Thursday, June 1, 2023
महापुरुष विरुद्ध महापुरुष...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
-------------------------
महापुरुष विरुद्ध महापुरुष
ज्यांचे राजकारण झाले नाही,
असे महापुरुष भेटले नाहीत.
कोणतेच महापुरुष,
राजकारणातून सुटले नाहीत.
काही महापुरुष यांनी,
काही त्यांनी वाटून घेतले आहेत.
जेवढे घेता येतील तेवढे फायदे,
ज्यांनी त्यांनी लाटून घेतले आहेत.
महापुरुष विरुद्ध महापुरुष,
असे आज राजकीय लढे आहेत !
महापुरुषांच्या प्रतिमांना,
रोजच नव्याने मोठाले तडे आहेत!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8268
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
1जून2023
संपर्काची दावेदारी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
-------------------------
संपर्काची दावेदारी
अमुक संपर्कात;तमुक संपर्कात,
संपर्कात असल्याचे दावे आहेत.
खरे काय आहे?खोटे काय आहे?
बदलते चेहरे,बदलणारी नावे आहेत.
कुणी संपर्क क्षेत्रात आहेत,
कुणी संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत.
संपर्कात असल्याच्या दाव्यावरून,
एकमेकांना जाहीर आहेर आहेत.
आपली रेंज आणि आपले दावे,
मोजून मापून पाहिले पाहिजेत!
नेहमी इतरांच्या संपर्कात असलेले,
जनतेच्या संपर्कात राहिले पाहिजेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
चिमटा-6821
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
1जून2023
-------------------------
संपर्काची दावेदारी
अमुक संपर्कात;तमुक संपर्कात,
संपर्कात असल्याचे दावे आहेत.
खरे काय आहे?खोटे काय आहे?
बदलते चेहरे,बदलणारी नावे आहेत.
कुणी संपर्क क्षेत्रात आहेत,
कुणी संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत.
संपर्कात असल्याच्या दाव्यावरून,
एकमेकांना जाहीर आहेर आहेत.
आपली रेंज आणि आपले दावे,
मोजून मापून पाहिले पाहिजेत!
नेहमी इतरांच्या संपर्कात असलेले,
जनतेच्या संपर्कात राहिले पाहिजेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
चिमटा-6821
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
1जून2023
Subscribe to:
Posts (Atom)
दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54
दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...
-
वात्रटिका : वर वर एक हलकाफुलका विनोदी काव्यप्रकार वाटत असला तरी केवळ विनोद निर्मिती हे वात्रटिकेचे एकच आणि अंतिम कार्य नाही. पश्चिमी ‘लिम्...


















