Sunday, May 12, 2024

दैनिक वात्रटिका12मे2024....वर्ष- तिसरे..अंक -340वा


दैनिक वात्रटिका
12मे2024....वर्ष- तिसरे..
अंक -340वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

महागाईचे परिणाम ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

महागाईचे परिणाम

दहा पाच रुपयात होणारे काम,
आता हजारात व्हायला लागले.
वाढत्या भ्रष्टाचारामुळे तरी,
हे सगळे लक्षात यायला लागले.

पूर्वी हजारात नेते फुटायचे,
आता खोक्याशिवाय फुटत नाहीत.
वाढत्या महागाईचे चटके,
त्याशिवाय खरे वाटत नाही.

महागाईच्या वाढत्या शब्दाला,
प्रत्येक जण जागतो आहे !
शेकड्यात विकणारा मतदार,
हजारांचा भाव मागतो आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8560
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
12मे2024
 

Saturday, May 11, 2024

दैनिक वात्रटिका11मे2024....वर्ष- तिसरे..अंक -339 वा


दैनिक वात्रटिका
11मे2024....वर्ष- तिसरे..
अंक -339 वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

पुराव्या अभावी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

पुराव्या अभावी....

मोठे मासे नामानिराळे,
छोटे मात्र पकडले जातात.
कायद्याचे लांब लांब हात,
इथे मात्र आखडले जातात.

मास्टर माईंड मोकाट,
हस्तकांना मात्र शिक्षा असते.
सबळ पुराव्याची,
वांझोटी अशी भिक्षा असते.

दुधाची तहान अशी,
ताकावरती भागवली जाते !
सत्याग्रहींची न्याय्य अपेक्षा,
पुराव्या अभावी नागवली जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8559
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
11मे2024
 

Friday, May 10, 2024

दैनिक वात्रटिका10मे2024....वर्ष- तिसरे..अंक -338 वा

दैनिक वात्रटिका
10मे2024....वर्ष- तिसरे..
अंक -338 वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

 

ईव्हीएमची बदनामी..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

ईव्हीएमची बदनामी

आज अळीमिळी गुपचिळी,
त्यांचे गुपित आम्ही खोलत नाहीत.
काल ईव्हीएम विरोधात बोलणारे,
आज मात्र विरोधात बोलत नाहीत.

ईव्हीएम आहे तसेच आहे,
कुणाकुणाचा लंगडा विरोध आहे.
ईव्हीएम हॅक होऊ शकते,
हा सरळ सरळ जावईशोध आहे.

पुराव्याशिवाय बोलणे,
हा प्रकार तर खुले आम आहे !
नाचता येईना अंगण वाकडे,
हकनाक ईव्हीएम बदनाम आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8558
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
10मे2024
 

Thursday, May 9, 2024

दैनिक वात्रटिका9मे2024....वर्ष- तिसरे..अंक -337 वा


दैनिक वात्रटिका
9मे2024....वर्ष- तिसरे..
अंक -337 वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

फूट आणि विलीनीकरण...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

फूट आणि विलीनीकरण

फुटीनंतर विलीनीकरण असते,
विलीनीकरणानंतर फूट असते.
तरीही दिल्लीपासून गल्लीपर्यंत,
सगळ्यांचीच काथ्याकुट असते.

फुटीला आणि विलीनीकरणाला,
एकमेकांशिवाय काहीच अर्थ नाही.
एकही राजकीय कृती अशी नसते
जिच्यामध्ये राजकीय स्वार्थ नाही.

फुटीचे आणि विलीनीकरणाचे,
जसे आनंद तेवढेच त्रास आहेत !
फुटीचे आणि विलीनीकारणाचेही,
इतिहासावर इतिहास आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8557
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
9मे2024
 

Wednesday, May 8, 2024

दैनिक वात्रटिका8मे2024....वर्ष- तिसरे..अंक -336वा

दैनिक वात्रटिका
8मे2024....वर्ष- तिसरे..
अंक -336वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

 

घरोघरी मातीच्या चुली...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

घरोघरी मातीच्या चुली

कारण ती माझी आई आहे,
कारण तो माझा बाप आहे.
आशा फिल्मी डायलॉगचा,
राजकारणालाच ताप आहे.

जसा गोंधळलेला पुतण्या,
तसा गोंधळलेला काका आहे.
काकांच्या राजकारणाला,
आज पुतण्यांचा धोका आहे.

नणंद असो वा भावजय,
राजकारण्यांच्याच मुली आहेत !
राजकारण्यांच्या घरोघरी,
सर्वत्र मातीच्याच चुली आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8556
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
8मे2024
 

Tuesday, May 7, 2024

दैनिक वात्रटिका7मे2024....वर्ष- तिसरे..अंक -335वा


 दैनिक वात्रटिका
7मे2024....वर्ष- तिसरे..
अंक -335वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

पॉलिटिकल सेटिंग...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
पॉलिटिकल सेटिंग
आपले ते समाजकारण,
दुसऱ्याचा तो जातीयवाद असतो.
आपले तेच खरे करण्याचा,
राजकारण्यांना नाद असतो.
जातीविरुद्ध जात;धर्मविरुद्ध धर्म,
बेमालूमपणे पेटवले जातात.
जातकारण आणि धर्मकारणाचे,
राजकीय फायदे उठवले जातात.
कधी कधी जातकारणाला,
समाजकारणाचे कोटींग असते !
दुसऱ्याचा तो अपप्रचार,
आपली मात्र सेटिंग असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8555
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
7मे2024

Monday, May 6, 2024

दैनिक वात्रटिका6मे2024....वर्ष- तिसरे..अंक -3334वा


दैनिक वात्रटिका
6मे2024....वर्ष- तिसरे..
अंक -3334वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

मतांची शेती...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

मतांची शेती

वरवर वाटत राहते,
ते निवडणूक लढत आहेत.
मात्र पैशांची पेरणी करून,
मतांचे पीक काढत आहेत.

मतांच्या भरघोस पिकासाठी,
नको त्याला खतपाणी आहे.
त्यामुळेच वाटत राहते,
निवडणूक आणीबाणी आहे.

मतांच्या पिकावरती,
फवारणी आणि धुरळणीआहे !
द्वेषाचे खतपाणी घालून,
लोकांची भुरळणी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8554
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
6मे2024
 

Sunday, May 5, 2024

दैनिक वात्रटिका5मे2024....वर्ष- तिसरे..अंक -333 वा



 दैनिक वात्रटिका
5मे2024....वर्ष- तिसरे..
अंक -333 वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

मत वाया जात नाही...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

मत वाया जात नाही...

प्रत्येकाने ज्याला कुणाला मत दिले,
तो प्रत्येकजणच निवडून येत नाही.
तरीही याची मात्र खात्री बाळगा,
कुणाचेच मत वायाला जात नाही.

जसे मतदान केल्याने कधीच,
कुणाचेच मत वाया गेलेले नाही.
तसे प्रत्येक मतदाराचे मतही,
प्रत्येक वेळी कामी आलेले नाही.

याचे त्याचे मत वाया गेले,
याची खंत आणि अपप्रचार नको !
मतदार वाया गेली की कामी आले?
असला व्यावहारिक विचार नको !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8553
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
5मे2024
 

Saturday, May 4, 2024

दैनिक वात्रटिका4मे2024....वर्ष- तिसरे..अंक -332 वा

दैनिक वात्रटिका
4मे2024....वर्ष- तिसरे..
अंक -332 वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

 

अतृप्त आत्मे...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

अतृप्त आत्मे

विधानसभेचे अतृप्त आत्मे,
लोकसभेत जागे होऊ लागले.
जमेल त्या झाडाला,
जमेल तसे झटे देऊ लागले.

सगळ्यात अतृप्त आत्म्यांनी,
पक्षच शिल्लक ठेवले नाहीत.
अजून तरी अतृप्त आत्म्यांच्या,
पिंडाला कावळे शिवले नाहीत.

सगळ्यात अतृप्त आत्म्यांना,
भटका-भटकी सोसावी लागते !
अतृप्त आत्मे दिसायला,
कावळ्यांची नजर असावी लागते !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
 

Friday, May 3, 2024

दैनिक वात्रटिका3मे2024....वर्ष- तिसरे..अंक -331वा


दैनिक वात्रटिका
3मे2024....वर्ष- तिसरे..
अंक -331वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

मळकट आणि जळकट...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

मळकट आणि जळकट

उमेदवारांचे हात बळकट करा,
मळकट हात ओरडायला लागले.
उमेदवारांच्या पाठीशी उभे रहा,
कळकट हात ओरडायला लागले.

मळकट आणि कळकट हातांची,
आज जळकट अशी एकी आहे.
त्यांची त्यांनाच पक्की खात्री आहे,
आपली सगळी फेकाफेकी आहे.

मळकट आणि कळकटांकडून,
आज विजयाच्या ललकाऱ्या आहेत !
जळकटांना जळकट म्हणायच्याही,
आजकाल चोऱ्या आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8551
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
3मे2024
 

Thursday, May 2, 2024

दैनिक वात्रटिका2मे2024....वर्ष- तिसरे..



दैनिक वात्रटिका
2मे2024....वर्ष- तिसरे..
अंक -330वा 
पाने -21
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

Wednesday, May 1, 2024

दैनिक वात्रटिका1मे2024....वर्ष- तिसरे..अंक -329वा


दैनिक वात्रटिका
1मे2024....वर्ष- तिसरे..
अंक -329वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

दैनिक वात्रटिका12मे2024....वर्ष- तिसरे..अंक -340वा

दैनिक वात्रटिका 12मे2024....वर्ष- तिसरे.. अंक -340वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Zd1_pYvShsfLd1cZ_cwdJ8BVm...