Monday, February 10, 2020

व्हॅलेंटाईन सप्ताह

आजची वात्रटिका
----------------------------------------
व्हॅलेंटाईन सप्ताह
दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात,
प्रेमिकांचा राबता असतो.
अखंड प्रेम नामाचा,
फेब्रुवारीत सप्ता असतो.
सप्ताहातील प्रत्येक दिवशी,
वेगवेगळी कृती असते!!
त्या मदनांचेच बाण उपयोगी,
ज्यांच्या नशिबी रती असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5711
दैनिक पुण्यनगरी
10फेब्रुवारी 2020

Sunday, February 9, 2020

चेंडूची फुले


ऑनलाईन भक्ती

आजची वात्रटिका
----------------------------------------
ऑनलाईन भक्ती
ज्यांच्याकडे पैसा-पाणी,
त्यांच्यासाठी फाईन झाले.
माणसांबरोबर देवही,
हल्ली ऑनलाईन झाले.
जशी ऑनलाईन दर्शन बुकींग,
तशी ऑनलाईन देवपूजा आहे !
ऑनलाईन प्रसादातही,
एक वेगळीच मजा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7202
दैनिक झुंजार नेता
9फेब्रुवारी2020

बदलती 'राज' मुद्रा

आजची वात्रटिका
----------------------------------------
बदलती 'राज' मुद्रा
कालची 'राज-मुद्रा'आगळी होती,
आजची 'राजमुद्रा' आगळी आहे.
कालची घुसखोरी वेगळी होती,
आजची घुसखोरी वेगळी आहे.
काल उठवलेले रान वेगळे होते,
आज वेगळे रान उठवत आहेत !
काळ काढलेल्या ब्ल्यू प्रिंट,
आता कुठे आठवत आहेत ?
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5710
दैनिक पुण्यनगरी
9फेब्रुवारी 2020

Saturday, February 8, 2020

व्हॅलेंटाईन डे


आलटी-पलटी

आजची वात्रटिका
----------------------------------------
आलटी-पलटी
कुणाची आलटी, कुणाची पलटी,
कुणाकुणाची तर कल्टी आहे.
तरीही सांगत राहतात,
उलटी भूमिका कशी सुलटी आहे.
त्यांच्या उलट सुलट भूमिकाही,
त्यांना सरळसोट वाटतात !
आपणच फक्त साव आहोत,
बाकीचे त्यांना चोट वाटतात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------------
फेरफटका-7201
दैनिक झुंजार नेता
8फेब्रुवारी2020

पचनक्रिया

आजची वात्रटिका
----------------------------------------
पचनक्रिया
तेच पटवून देतात,
राजकारणात
काहीही अशक्य नसते.
तत्वहीन तडजोडीनंतर,
हेच टाळीचे वाक्य असते.
जश्या भूमिका बदलतात,
तसे तत्वज्ञान रचले जात असते!
दुसऱ्याकडे बोट दाखविले की,
स्वत:चेही पचले जात असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5709
दैनिक पुण्यनगरी
8फेब्रुवारी 2020

Friday, February 7, 2020

लॉबिंग

आजची वात्रटिका
----------------------------------------
लॉबिंग
कुठल्याही क्षेत्रामध्ये जा,
एकच समस्या उभी आहे.
कुठेही जाऊन बघा,
ज्याची त्याची लॉबी आहे.
जिथे लॉबी आहे,
तिथे लॉबिंग रुजलेली असते !
तुम्हांला एकटे पाडले जाते,
जिथे लॉबिंग माजलेली असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7200
दैनिक झुंजार नेता
7फेब्रुवारी2020

कोरोना इफेक्ट

आजची वात्रटिका
----------------------------------------
कोरोना इफेक्ट
चिकन मटण विक्रेत्यांना
कोरोना व्हायरसचा झटका आहे.
व्हायरल झालेल्या अफवांचा,
जगभरात मोठा फटका आहे.
अफवांच्या व्हायरसचा वेग,
कोरोनापेक्षाही फास्ट आहे !
आयता प्रचार होऊ लागला,
शाकाहारच सर्वश्रेष्ठ आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5708
दैनिक पुण्यनगरी
7फेब्रुवारी 2020

Thursday, February 6, 2020

ट्रीपल पॉवर

आजची वात्रटिका
----------------------------------------
ट्रीपल पॉवर
जुन्याच मुद्द्याला
पुन्हा नव्याने हवा आहे.
आजोबा पंतप्रधान होतील,
आता नातवाचाही दावा आहे.
पाठीशी आकडे नसले तरी,
त्यांचा सर्वपक्षीय वावर आहे !
आता तर पाठीशी,
चक्क 'ट्रीपल पॉवर 'आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5707
दैनिक पुण्यनगरी
6फेब्रुवारी 2020

नामी उपाय

आजची वात्रटिका
----------------------------------------
नामी उपाय
याचे बघून त्याला,
त्याचे बघून याला चेव आहे.
सरकारनियुक्त पदाधिकाऱ्याच्या,
राजीनाम्यांचे पेव आहे.
काल भोगलेल्या पदाची
आता कुठे हमी आहे ?
हकालपट्टीपेक्षा राजीनामा देणे,
हा उपायच नामी आहे !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7199
दैनिक झुंजार नेता
6फेब्रुवारी2020

Wednesday, February 5, 2020

प्रेमाची कसोटी

आजची वात्रटिका
----------------------------------------
प्रेमाची कसोटी
जनावराला माणूस बनविण्याची,
खऱ्या प्रेमामध्ये जादू आहे.
माणसाला जे जनावर बनविते,
ते प्रेम विकृत आणि अधू आहे.
मी तुझ्यावर प्रेम करतो,
तू माझ्यावर प्रेम कर,
असे कुणाला छळू-बिळू नका.
नकारही स्विकारायला शिका,
कुणाला जाळू-बिळू नका.
खरे प्रेम जाळायला नाही,
प्रेम जळायला शिकवित असते !
जाच आणि आच पचवित
प्रेम पोळायला शिकवित असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7198
दैनिक झुंजार नेता
5फेब्रुवारी2020

मंत्रोपचार

आजची वात्रटिका
----------------------------------------
मंत्रोपचार
बडे बडे धर्मपंडीत
डॉक्टर व्हायला लागले.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी,
मंत्रोपचार द्यायला लागले.
ज्याचा त्याचा उपचार,
ज्याला त्याला लखलाभ आहे !
कोरोना व्हायरसएवढीच,
ही चिंताजनक बाब आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5706
दैनिक पुण्यनगरी
5फेब्रुवारी 2020

जन्मतारीख

आ।ठ।व।णी।ती।ल वा।त्र।टि।का
-------------------------------------------
जन्मतारीख:एक संवाद
मॉंसाहेब,
आम्ही असलो छत्रपती,
तरी आम्हांला आता भिती आहे.
तुम्हीच आठवून सांगा,
आमची जन्मतारीख किती आहे?
शिवबा,तुमची जन्मतारीख
आम्ही मुद्दाम सांगत नाहीत.
इथले इतिहाचार्य,बुद्धिवादी
राजकारण्यांची
अब्रु वेशीला टांगत नाहीत.
राजांची भिती,
मॉंसाहेबांची इच्छा,
आता आता आम्हांला कळत आहे !
कुत्र्याने पीठ खाऊनसुद्धा
आंधळे पुन्हा पुन्हा दळत आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
फेरफटका-45
दैनिक झुंजार नेता
17फेब्रुवारी2000

Tuesday, February 4, 2020

महापुरुषांची दुर्दशा

आजची वात्रटिका
----------------------------------------
महापुरुषांची दुर्दशा
महापुरुषांच्या नावावर
आपापले दुकान थाटले गेले.
जाती आणि धर्मामध्ये,
सर्व महापुरुष वाटले गेले.
कधीही होवू नये अशी,
महापुरुषांची दुर्दशा झाली आहे !
आज फक्त जात आणि धर्मच,
महापुरुषांचा वाली आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7197
दैनिक झुंजार नेता
4फेब्रुवारी2020

निष्ठेचा सिद्धांत

आजची वात्रटिका
----------------------------------------
निष्ठेचा सिद्धांत
एखादं दुसऱ्या दर्शनाने
देव काही वृध्द होत नाही.
पुन्हा पुन्हा दाखविल्याशिवाय
निष्ठा सिद्ध होत नाही.
संधी मिळेल तिथे
निष्ठादर्शनाची खाज असते !
आपली निष्ठा दाखविताना,
कुठे कुणाला लाज असते?
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7196
दैनिक झुंजार नेता
3फेब्रुवारी2020

वाचाळांची जुगलबंदी

आजची वात्रटिका
----------------------------------------
वाचाळांची जुगलबंदी
वाचाळ आणि महावाचाळ
यांची जणू जुगलबंदी आहे.
तिथे तिथे जीभ टाळ्याला,
जिथे जिथे संधी आहे.
कुणी माप काढतो आहे,
कुणी बाप काढतो आहे !
एकमेकांचे बघून वाचाळांचा,
प्रतापावर प्रताप वाढतो आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5705
दैनिक पुण्यनगरी
4फेब्रुवारी 2020

Monday, February 3, 2020

सत्यामागचे सत्य

आजची वात्रटिका
----------------------------------------
सत्यामागचे सत्य
सत्य म्हणून असत्यच,
वेगाने व्हायरल होत आहे.
कसलेही आढेवेढे न घेता,
अर्धसत्य स्पायरल होत आहे.
अर्धसत्य आणि असत्य
यांचाच मोठा सेल आहे !
सत्याचा विजय होणारच,
पण सध्या तरी ते फेल आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5704
दैनिक पुण्यनगरी
3फेब्रुवारी 2020

Sunday, February 2, 2020

इमानदारीच्या 'आय' ला.....

आजची वात्रटिका
----------------------------------------
इमानदारीच्या 'आय' ला.....
कुठे प्रत्यक्ष, कुठे अप्रत्यक्ष
टॅक्स भरला जातो.
इमानदारांचा खिसा,
डोळ्यादेखत मारला जातो.
जिकडे बघावे तिकडे,
नाकेच नाके आहेत !
इमानदारीच्या 'आय' ला,
टॅक्सचे खरे धोके आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------------
फेरफटका-7195
दैनिक झुंजार नेता
2फेब्रुवारी2020

गॅदरींगचे 'गुण' दर्शन

आजची वात्रटिका
----------------------------------------
गॅदरींगचे 'गुण' दर्शन
पुन्हा जुनेच पाढे
नव्याने वाचायला लागले.
आयटम सॉंगच्या तालावर
विद्यार्थी नाचायला लागले.
जणू विविध गुणदर्शनाला
एकमेव पर्याय हाच आहे.
चिल्लर चिल्लर विद्यार्थ्यांचा
थिल्लर थिल्लर नाच आहे.
पालक आणि शिक्षकांना
कळायला आणि वळायला हवे !
अचकट विचकट गुणदर्शन,
जाणिवपूर्वक टाळायला हवे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5703
दैनिक पुण्यनगरी
2फेब्रुवारी 2020

Saturday, February 1, 2020

सुपर ओव्हर

आजची वात्रटिका
----------------------------------------
सुपर ओव्हर
आजकाल जरा जास्तच,
ट्वेन्टी-ट्वेन्टी चा फिव्हर आहे.
टाय-टाय फिश करण्यासाठी,
सतत 'सुपर ओव्हर' आहे.
क्रिकेट आणि वेळेचे,
अपव्यय टाळले पाहिजेत !
टाईमपास करण्यापेक्षा,
'सुपर ओव्हर' च खेळले पाहिजेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5699
दैनिक पुण्यनगरी
1फेब्रुवारी 2020

चायना माल

आजची वात्रटिका
----------------------------------------
चायना माल
कोरोना व्हायरसची
मोठ्या वेगाने वाटचाल आहे.
आता खात्री पटू लागली,
हा तर 'चायना माल' आहे.
एकदा 'चायना माल' म्हटले की,
त्याची वॉरंटी ना गॅरंटी आहे !
आपलीच लाल करताना,
चीनसाठीही धोक्याची घंटी आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7194
दैनिक झुंजार नेता
1फेब्रुवारी2020

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...