Sunday, January 5, 2020

सत्तांतराचे वारे

आजची वात्रटिका
-----------------------------------------
सत्तांतराचे वारे
जे वर केले आहे,
तेच खाली करू लागतात.
विधानसभा फिरली की,
झेडपीही फिरू लागतात.
साथीच्या रोगासारखी,
सत्तांतराची लागण आहे !
दिल्लीपासून गल्ली पर्यंत,
जणू हाच स्लोगन आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7169
दैनिक झुंजार नेता
5जानेवारी2020

फुकटचा सल्ला

आजची वात्रटिका
-----------------------------------------
फुकटचा सल्ला
न्यूज चॅनलचे सल्ले घ्या,
काही घोळ होणार नाही.
मंत्र्याच्या खातेवाटपात,
अडचण येणार नाही.
तुमच्यापेक्षा जास्त घोर,
आमच्या जीवाला आहे !
आमच्या या बातमीला
आमच्या सूत्रांचा हवाला आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5677
दैनिक पुण्यनगरी
5जानेवारी 2020
------------------------------------

Saturday, January 4, 2020

नाराज आघाडी

आजची वात्रटिका
-----------------------------------------
नाराज आघाडी
याचा अंदाज होताच,
तिघाडीत बिघाडी होऊ शकते.
नाराज एवढे वाढलेत की,
नाराज आघाडी होऊ शकते.
मनातल्या मनात तडफड,
चेहराही भकास आहे !
नाराज आघाडीचा मात्र,
संख्यात्मक विकास आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7168
दैनिक झुंजार नेता
4जानेवारी2020

खाते वाटप

आजची वात्रटिका
-----------------------------------------
खाते वाटप
हातघाईच्या लढाईसोबत,
काट्यांसोबत गाठ आहे.
धनुष्य ताणलेले,
बाण मात्र ताठ आहे.
महाआघाडीचा विकास,
नमनालाच गोत्यात आहे !
सर्वांची आवड,
त्याच त्याच खात्यात आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5676
दैनिक पुण्यनगरी
4जानेवारी 2020

Friday, January 3, 2020

शुभमंगल सावधान !

आजची वात्रटिका
-----------------------------------------
शुभमंगल सावधान !
ट्वेन्टी-ट्वेन्टीच्या जमान्यात,
टेस्टी बातम्या ऐका.
क्रिकेटपटूंना मिळतात,
सिनेमातल्या बायका.
क्रिकेट आणि सिनेमा,
यांचे जन्मोजन्मीचे नाते आहे !
त्याच्याशिवाय का कुणाची तरी,
सतत विकेट जाते आहे ?
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5675
दैनिक पुण्यनगरी
3जानेवारी 2020
---------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना
शेअर करण्यासाठी क्लिक करा.

सावित्रीची आण

आजची वात्रटिका
-----------------------------------------
सावित्रीची आण
काही काही कर्त्या आहेत,
काही फक्त बोलक्या आहेत.
सावित्रीच्या लेकींमध्ये,
काही डबल ढोलक्या आहेत.
स्वतःबरोबर सावित्रीलाही
बोलघेवड्यांनो फसवू नका.
सावित्रीने जे टाचलेय,
ते संवगपणे उसवू नका.
आण आहे,बाण आहे,
सावित्री आपली शान आहे !
चळू नका,ढळू नका,
पुन्हा मागे वळू नका,
तुम्हांला सावित्रीची आण आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7167
दैनिक झुंजार नेता
3जानेवारी2020

Thursday, January 2, 2020

आत्मोद्धार

आजची वात्रटिका
-----------------------------------------
आत्मोद्धार
स्वतःच्या उद्धाराची
स्वतःलाच स्फुर्ती आहे.
जिकडे बघावे तिकडे,
गद्दारांना स्फुर्ती आहे.
काल गद्दार ही शिवी होती,
आज गद्दार ही ओवी आहे !
हल्ली गद्दारी म्हणजे,
आत्मोद्धाराची चावी आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7166
दैनिक झुंजार नेता
2जानेवारी2020

भाटगिरी

आजची वात्रटिका
-----------------------------------------
भाटगिरी
नव्या सत्ताधाऱ्यांचे,
नवे नवे थाट असतात.
नव्या नव्या झेलकऱ्यांसोबत,
नवे नवे भाट असतात.
मीडिया ते सोशल मीडिया
भाटांच्या कर्तृत्वाला वाव असतो !
भाट जेवढे लाळघोटे,
तेवढा त्यांचा भाव असतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5674
दैनिक पुण्यनगरी
2जानेवारी 2020

Wednesday, January 1, 2020

सुभेदारी

आजची वात्रटिका
-----------------------------------------
सुभेदारी
आपापल्या सुभ्यात,
आपापली सुभेदारी असते.
स्थानिक स्वराज्य संस्थावर,
त्यांचीच ताबेदारी असते.
आपल्या ताबेदारीचा,
वाजत गाजत दावा असतो !
सुभ्या-सुभ्यात सुभेदारांचा,
गनिमी कावा असतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7165
दैनिक झुंजार नेता
1जानेवारी2020

शुभेच्छा संकल्प

आजची वात्रटिका
-----------------------------------------
शुभेच्छा संकल्प
संकल्प आणि नवे वर्ष,
यांची पारंपरिक युती आहे.
ज्याचे त्याला माहित असते,
आपल्या संकल्पसिद्धीची
टक्केवारी किती आहे?
मोडल्याशिवाय संकल्प,
संकल्पच वाटत नाहीत.
नववर्षाच्या स्वागताशिवाय,
नवे संकल्प सुटत नाहीत.
ज्यांची झाली संकल्पपूर्ती,
त्यांचा नव्यामागे पिच्छा आहे !
ज्यांनी जुनेच संकल्प नवे केले,
त्यांनासुद्धा शुभेच्छा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5673
दैनिक पुण्यनगरी
1जानेवारी 2020

Tuesday, December 31, 2019

प्रायव्हेट लिमिटेड

आजची वात्रटिका
-----------------------------------------
प्रायव्हेट लिमिटेड
जसे मुंढे अँड ब्रदर्स आहेत,
तसे ठाकरे अँड सन्स आहेत.
तुम्ही आम्ही वांझोटे,
त्यांच्यातच राजकीय जीन्स आहेत.
आज्जा जातो,नातू येतो,
पाटील अँड कंपनीचा वचक आहे !
घराणेशाहीमुळे लोकशाहीची,
अचक,वचक आणि पचक आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7164
दैनिक झुंजार नेता
31डिसेंबर2019

मंत्रिमंडळ दर्शन

आजची वात्रटिका
-----------------------------------------
मंत्रिमंडळ दर्शन
सोयरे आहेत;धायरे आहेत,
पाहूणे आणि रावळे आहेत.
हाताची घडी,तोंडावर बोट,
बावचळलेले मावळे आहेत.
लोकशाहीच्या फटीत,
घराणेशाहीची मेख आहे.
गजब-अजब सरकारमध्ये,
बापासोबत लेक आहे.
विक्रमावर विक्रम,
सोबत विक्रमादित्य आहेत !
परंपरेप्रमाणे विरोधकांचे आरोप,
शत प्रतिशत सत्य आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5672
दैनिक पुण्यनगरी
31डिसेंबर 2019

Monday, December 30, 2019

भूत विद्या

आजची वात्रटिका
-----------------------------------------
भूत विद्या
समाज पुरोगामी होतोय,
हा आपला मोठा भ्रम आहे.
बनारस विद्यापीठात म्हणे,
भूत-विद्येचा अभ्यासक्रम आहे.
तंत्रविद्या आहे,मंत्रविद्या आहे,
सोबतच जारण-मारण आहे !
जणू काळ्या जादूपुढे,
आपला विवेकवाद तारण आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7163
दैनिक झुंजार नेता
30डिसेंबर2019

महासत्तेची वाटचाल

आजची वात्रटिका
-----------------------------------------
महासत्तेची वाटचाल
देश महासत्ता होणार होता?
आमची काही भुणभुण नाही.
दोन हजार वीस साल आले;
पण त्याची काही कुणकुण नाही.
देश महासत्ता नक्की होईल,
आज महा मात्र सत्ता झाली आहे !
तुम्ही आम्ही पुन्हा निर्धार करू,
ती वेळ आज आत्ता आली आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5671
दैनिक पुण्यनगरी
30डिसेंबर 2019

Sunday, December 29, 2019

सिस्टीम जिंदाबाद

आजची वात्रटिका
-----------------------------------------
सिस्टीम जिंदाबाद
सिस्टीमचे झेले व्हा,
सिस्टीमचे चेले व्हा.
लुच्चे, लफंगे, लबाडांचे,
तुम्हीसुद्धा साले व्हा.
तुम्ही तिला डोक्यावर घ्या,
सिस्टीम तुम्हाला डोक्यावर घेते.
तुम्ही दलाल झालात की,
सिस्टीम तुम्हाला ठेक्यावर देते.
सिस्टीमला शेळ्या हव्यात,
तिला वाघ नको असतात !
सारखे फुस्स फुस्स करणारे,
तिला नाग नको असतात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7162
दैनिक झुंजार नेता
29डिसेंबर2019

वर्षावरची 'वॉल' पेंटींग

आजची वात्रटिका
-----------------------------------------
वर्षावरची 'वॉल' पेंटींग
'वर्षा' वरच्या पोरखेळाने,
धोक्याची घंटी वाजायला लागली.
आपल्यावरच्या कॉमेंट्स वाचून,
भिंतही लाजायला लागली.
टीका-टिप्पणी जरूर व्हावी,
त्यात खेद किंवा खंत नाही !
पण वर्षा बंगल्याची भिंत म्हणजे,
सुलभ शौचालयाची भिंत नाही!!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5670
दैनिक पुण्यनगरी
29डिसेंबर 2019

Saturday, December 28, 2019

धुराळा

आजची वात्रटिका
-----------------------------------------
धुराळा
कालचा राडा निराळा होता,
आजचा राडा निराळा आहे.
विधानसभेच्या धुराळ्यानंतर,
जिल्हा परिषदांचा धुराळा आहे.
जे चित्र अगदी स्पष्ट होते,
धुराळ्यामुळे ते आता अस्पष्ट आहे !
कानामागून येऊनच्या येऊन,
सासुपेक्षा सूनसुद्धा खाष्ट आहे!!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7161
दैनिक झुंजार नेता
28डिसेंबर2019

अकाऊंट डीटेल्स

आजची वात्रटिका
-----------------------------------------
अकाऊंट डीटेल्स
यशस्वी आणि अयशस्वी
पुरुषामागे बायकोचा हात असतो.
नवरोबाचा विक पॉईंट,
बायकांनाच पक्का ज्ञात असतो.
तुमची-आमची,मंत्र्या-संत्र्याची,
वा मुख्यमंत्र्यांची असो,
स्वभावामध्ये एकच नाते असते !
त्यांना पक्के ठाऊक,
नवऱ्याचे कुठे कुठे खाते असते ?
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5669
दैनिक पुण्यनगरी
28डिसेंबर 2019

अकाऊंट डीटेल्स


Friday, December 27, 2019

मालिकांची 'डब' घाई

आजची वात्रटिका
-----------------------------------------
मालिकांची 'डब' घाई
माझ्या नवऱ्याच्या बायकोनंतर,
माझ्या बायकोचा नवरा निघू शकते.
चॅनलवालेही परीक्षा बघत आहेत,
प्रेक्षक मंडळी काय काय बघू शकते?
रहस्यमय मालिकांपेक्षाही
कौटुंबिक मालिकाच हॉरर आहेत !
जणू हिंदी चॅनल वाल्यांचे,
मराठी चॅनलवाले मिरर आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5668
दैनिक पुण्यनगरी
27डिसेंबर 2019

बॉम्बे मार्केट

आजची वात्रटिका
-----------------------------------------
बॉम्बे मार्केट
गुणिले उलट भागिले,
भागिले उलट गुणिले होऊ लागले.
नव-नवे सत्ता समीकरणे,
रोज रोज उदयाला येऊ लागले.
जशी बनली समीकरणे,
तसे त्यामागचे लॉजिक आहे.
कुणालाही भुरळ पडावी,
अशी त्यांच्या फिगरचे मॅजिक आहे.
कुणाची स्थानिक किंमत वाढली,
कुणाचा हातचा उधार आहे !
गल्ली-बोळातल्या समीकरणांनाही,
बॉम्बे मार्केटचा आधार आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7160
दैनिक झुंजार नेता

Thursday, December 26, 2019

लोक निरपेक्षता

आजची वात्रटिका
-----------------------------------------
लोक निरपेक्षता
लोकशाहीत कुणावाचून कुणाचे,
कधी काहीच अडलेले नाही.
पंतप्रधान,मुख्यमंत्री आहेत की नाही?
याचेही कुणाला काही पडलेले नाही.
मग मंत्र्या-संत्र्याची तर,
गणतीही करायला नको वाटते !
मंत्रीमंडळ विस्तार होणार की नाही?
अशी अपेक्षा धरायला नको वाटते!!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7159
दैनिक झुंजार नेता
26डिसेंबर2019

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...