Friday, August 29, 2025

ज्याचे त्याचे डावपेच...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

ज्याचे त्याचे डावपेच

एकाची असते बंदूक,
दुसऱ्या कुणाचातरी खांदा असतो.
प्रत्येक गोष्टीचे राजकारण होते,
इथेच तर सगळा वांधा असतो.

राजकारणाशिवाय समाजकारण नाही,
समाजकारणाशिवाय राजकारण नाही.
विरोधाला विरोध करणारे आहेत,
तोपर्यंत राजकारणाला मरण नाही.

ज्यांनी जखमा ओल्या केल्या,
त्यांच्याकडूनच पुन्हा मीठ चोळले जाते !
समाजकारणाचा भोळा आव आणून,
सोईस्करपणे राजकारण खेळले जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-9020
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
29ऑगस्ट2025
 

No comments:

daily vatratika...29jane2026