आजची वात्रटिका
-------------------
लोक हसतात खिदळतात,
म्हणतात काय जोकर आहे?
हशा टाळ्या मिळल्या तरी,
ही तुमच्यासाठी ठोकर आहे.
पुढच्यास ठोकर बसली तरी,
मागचे शहाणे होत नाहीत.
याची तुम्हाला लाज वाटू द्या,
लोक गांभीर्याने घेत नाहीत.
प्रबोधनाशिवाय मनोरंजनाचा,
अजिबातच ध्यास घेऊ नका !
फक्त विदूषकी चाळे करीत,
लोकांचा टाईमपास होऊ नका !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-9018
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
27ऑगस्ट2025

No comments:
Post a Comment