आजची वात्रटिका
-------------------
भूतदयेचे प्राणीशास्त्र
हत्ती झाला, कबूतर झाले,
आता चर्चेमध्ये डुक्कर आहे.
प्राणी म्हणाले प्राण्यांना,
आपल्यासाठी घी मे शक्कर आहे.
खऱ्याखुऱ्या गरजवंतांची तर,
दोन्ही हात जोडून गयावया आहे.
राजकारण्यांनासोबत लोकांनाही,
हल्ली जरा जास्तच भूतदया आहे.
सारे काही राजकारणासाठी,
उगीचच असा राजकीय चंग नको !
भूतदया तर नक्की करावी,
पण त्याला धार्मिक रंग नको !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-9013
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
22ऑगस्ट2025

No comments:
Post a Comment