आजची वात्रटिका
-------------------
बापू,संग्राम अजून जारी आहे
उघड उघड हिंसाचाराचे किर्तन,
फिरून फिरून पुन्हा पुन्हा,
नथुरामचीच बारी आहे.
बापू,संग्राम अजून जारी आहे.
नको त्याला थोपटू लागले,
नको त्याला धोपटू लागले.
सत्याच्या प्रयोगाची चोरी आहे,
बापू,संग्राम अजून जारी आहे.
अधर्मच झाला धर्म,
अहिंसा आणि सत्याग्रह तर,
त्यांच्याकडून हसण्यावारी आहे !
बापू,संग्राम अजून जारी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-9012
वर्ष-25 वे,
दैनिक झुंजार नेता
21ऑगस्ट2025

No comments:
Post a Comment