साप्ताहिक
वात्रटिका
---------------------------
देवा शपथ सांगतो...
जिकडे बघावे तिकडे,
आरोपी निर्दोष सुटायला लागले.
कायदा आंधळा असतो,
हे पुराव्यानिशी वाटायला लागले
लोकांचे गैरसमज होऊ लागले,
आपली न्यायदेवता वेंधळी आहे,
डोळ्यावरची पट्टी निघाली तरी,
अजूनही न्यायदेवता आंधळी आहे.
न्यायदेवतेवरच्या लोकविश्वासाला,
उठसूट हातोड्याचा झटका आहे !
पुरावे सिद्ध झाले नाहीत म्हणून,
आरोपींची निर्दोष सुटका आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
साप्ताहिक सरकारनामा
9ऑगस्ट 2025
No comments:
Post a Comment