आजची वात्रटिका
-------------------
चोरीकडून हॅकिंगकडे
आमची इच्छा असून सुद्धा,
ते दोघे आमच्याकडे आले नाहीत.
सत्ता स्थापन करण्याचे,
आमचे इरादे पूर्ण झाले नाहीत.
मतदान चोरीची चर्चा,
ईव्हीएम हॅकिंगकडे वळली आहे.
कुणा कुणाची चिप चोरी गेली ?
ज्याची त्याला गोष्ट कळली आहे.
मतदान चोरीच्या वास्तवाला,
ईव्हीएम हॅकिंगचा उतारा आहे !
ज्याच्या त्याच्या खऱ्या विजयावर,
मतदान चोरीचा पोतारा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
फेरफटका-9003
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
11ऑगस्ट2025

No comments:
Post a Comment