आजची वात्रटिका
-------------------
इच्छाशक्ती
सत्ता हातात असली की,
इच्छाशक्ती मारली जाते
सत्ता हातात नसली की,
इच्छाशक्ती स्फुरली जाते.
सत्तेचे आणि इच्छाशक्तीचे,
विसंगत असे नाते आहे.
विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचे,
परस्परांकडून हसे होते आहे.
जसा इकडेही दंभ आहे,
तसा तिकडेही दंभ आहे !
इच्छाशक्तीच्या नावाने,
सगळीकडेच बोंबाबोंब आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-9022
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
31ऑगस्ट2025

No comments:
Post a Comment