आजची वात्रटिका
-------------------
नंबरी गँग
जन्मतारखा आणि गाडीक्रमांक झाले,
आता मोबाईलचेही लकी नंबर आहेत.
असल्या नंबरी गँगचे तर,
जिकडे बघावे तिकडे मेंबर आहेत.
जसे लकी नंबर्स आहेत,
तसे अनलकी नंबर्सही आहेत.
असल्या नंबरीपणावर विश्वास ठेवणारे,
पाहिजे तेवढे मेंबर्सही आहेत.
लकी असतात ना अनलकी असतात,
शेवटी आकडे ते आकडे असतात !
त्यांना साधे सरळ वाटणार कसे ?
जे जे स्वभावानेच वाकडे असतात!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-9016
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
25ऑगस्ट2025

No comments:
Post a Comment