आजची वात्रटिका
-------------------
चला उठा जागे व्हा !
उपहास करण्यासाठी का होईना,
पुन्हा अण्णा आठवायला लागले.
सगळेच झोपी गेल्यासारखे,
पुन्हा अण्णांना उठवायला लागले.
जे झोपले आहेत त्यांना झोपू द्या,
तुम्ही तरी नीट झोपेतून जागे व्हा.
किमान जो पुढे झाला आहे,
इमानदारीने त्याच्या तरी मागे व्हा.
त म्हटले की ताक भात,
गोष्ट समजून घेतलेलीच बरी असते !
झोपेचे सोंग घेण्यामागेही,
प्रत्येकाची काहीतरी मजबुरी असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-9008
वर्ष-25 वे,
दैनिक झुंजार नेता
17ऑगस्ट2025

No comments:
Post a Comment