-------------------
बोगसगिरी
बोगस मतदानाच्या जोडीला,
बोगस मतदारांची जोड आहे.
भारतीय लोकशाहीला,
बोगसगिरीची जुनीच खोड आहे.
बॅलेट पेपर पासून ईव्हीएम पर्यंत,
बोगसगिरीची परंपरा कायम आहे.
बोगसगिरीशिवाय निवडणूक नको,
जणू असाच अलिखित नियम आहे.
वाढती सत्तापि पासू वृत्ती हीच,
बोगसगिरीची आई आहे !!
बॅलेट पेपर असो ईव्हीएम,
साक्षीदार बोटावरची शाई आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
फेरफटका-9002
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
10ऑगस्ट2025

No comments:
Post a Comment