आजची वात्रटिका
-------------------
आदर्श विचार
काही पुरस्कार भेटले जातात,
काही पुरस्कार लाटले जातात.
आदर्श शिक्षक पुरस्कारच,
सर्वाधिक प्रमाणात वाटले जातात.
जणू गल्लीपासून दिल्लीपर्यंत,
आदर्श शिक्षकांची खाणच खाण आहे.
त्याला याचे ज्ञान नक्की होऊ शकते,
ज्याला वास्तवाची खरी जाण आहे.
आदर्श आहात;आदर्शच रहा,
पुरस्कारांची वेगळी खेळी नको !
उठसूठ याच्या त्याच्या दारात,
आदर्श पुरस्कारांसाठी झोळी नको !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
फेरफटका-9017
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
26ऑगस्ट2025

No comments:
Post a Comment