आजची वात्रटिका
-------------------
आणीबाणीचा उपाय
काल पोसलेल्या चमच्यांचेच,
आज बोचरे काटे होत आहेत.
काटे चमचे ओळखती डाव त्यांचे,
इथेच खरे तोटे होत आहेत.
कालच्या काट्याचे झाले नायटे,
नायटे जोरात पसरू लागले.
आपण एकाच पापाचे वाटेकरी,
सोयीस्करपणे विसरू लागले.
त्यांनीच टाकलेल्या जाळ्यामध्ये,
नेमके तेच वेढले जात आहेत !
आणीबाणीचा उपाय म्हणून,
काट्याने काटे काढले जात आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
फेरफटका-8994
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
1 ऑगस्ट2025

No comments:
Post a Comment