Wednesday, August 6, 2025

गुर्जींचा मिशाकिलपणा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

गुर्जींचा मिशाकिलपणा

राष्ट्रीय एकात्मता म्हणजे नपुंसकत्व,
असे म्हणण्यात काही मर्दानगी नाही.
वादग्रस्त आणि वाचाळ वक्तव्यांची,
फक्त एवढी एकच काही वानगी नाही.

आंबा आणि गर्भधारणेचाही,
आणखी पुन्हा नव्याने दावा आहे.
तिरंगा मान्य असला तरी,
लाल किल्ल्यावर भगवा हवा आहे.

सर्वधर्मसमभाव म्हणजे नीचपणा,
अशी सुद्धा नव्याने अर्जी आहे !
स्वातंत्र्याचा फायदा कसा घ्यायचा?
शेवटी ज्याची त्याची मर्जी आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8998
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
6ऑगस्ट2025
 

No comments:

ऑपरेशन तुडवा ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- ऑपरेशन तुडवा जाणारा म्हणतो मी कडवा आहे, राहिलेला म्हणतो मीच कडवा आहे. ऑपरेशन टायगरला उत्तर म्हणून, आता म...