साप्ताहिक
वात्रटिका
--------------------------------
पार्टी आणि राजकारण
खाजगी खाजगी गोष्टीही,
हल्ली सार्वजनिक ठरू लागल्या.
कसल्या कसल्या पार्ट्याही.
राजकारणाभोवती फिरू लागल्या.
पार्टी पार्टीच्या राजकारणाला,
भलताच राजकीय चेव आहे.
सीडी म्हणाली पेन ड्राईव्हला,
आपल्यावरही त्यांचा जीव आहे.
आहे ही वस्तुस्थिती आहे
उगीच वाटू शकते हा टोला आहे !
कोणता सासरा म्हणणार नाही?
जावई माझा भला आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
साप्ताहिक सरकारनामा
2ऑगस्ट 2025
No comments:
Post a Comment