Wednesday, August 13, 2025

खाद्यसंस्कृतीचा विजय असो!....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

खाद्यसंस्कृतीचा
विजय असो!

ज्याला खायचे ते खाऊ द्या,
ज्याला प्यायचे ते पिऊ द्या.
ज्याला त्याला स्वातंत्र्य आहे,
त्यांच्या मनासारखे होऊ द्या.

खाणारे आवडीने खातात,
खाणारे निवडीने खातात.
त्यांच्यावरती सक्ती कशाला?
जे आपल्या सवडीने खातात.

प्रत्येकाचे सहअस्तित्व,
चिरंजीव आणि अजय असो!
ज्याच्या त्याच्या खाद्यसंस्कृतीचा,
अगदी मनापासून विजय असो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
फेरफटका-9005
वर्ष-25 वे,
दैनिक झुंजार नेता
13ऑगस्ट2025
 

No comments:

daily vatratika...29jane2026