Thursday, August 28, 2025

गणेशोत्सवाचा ट्रेंड....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

गणेशोत्सवाचा ट्रेंड

डीपीला बसले, स्टेटसला बसले,
स्टोरी आणि पोस्टलाही बसले आहेत.
प्रत्यक्षाहूनही कितीतरी जास्त,
आभासी युगात गणपती बसले आहेत.

अस्तिक काय? नास्तिक काय?
असा काही भेदभावही उरला नाही.
असा एकही सोशल मीडिया नाही,
जो गणेश भक्तीने भारला नाही.

मीडियापासून सोशल मीडियापर्यंत,
सगळा भक्ती - भावाचा धंदा आहे !
कुणी उघडे डोळे तर,
त्याचीच ट्रोलिंग र्आणि निंदा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-9019
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
28ऑगस्ट2025
 

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...