Tuesday, August 19, 2025

व्यवहारिक तह...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

व्यवहारिक तह

संघर्ष आणि विरोधाचे,
मार्ग त्यांनी टाळले आहेत.
जे कालपर्यंत भुंकत होते,
तेच त्यांनी पाळले आहेत.

कालचा विरोध आणि संघर्ष,
भुंकणारेही टाळीत आहेत.
आपली शेपटी,आपला गोंडा,
पाहिजे तसा घोळीत आहेत.

सर्वांनाच नसले तरी,
खूप जणांना हे मोह आहेत !
लढाई सुरू होण्याअगोदरच,
त्यांचे व्यवहारिक तह आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
फेरफटका-9010
वर्ष-25 वे,
दैनिक झुंजार नेता
19ऑगस्ट2025
 

No comments:

daily vatratika...29jane2026