Thursday, August 14, 2025

मुद्द्यावरती बोलू काही...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

मुद्द्यावरती बोलू काही

पक्षावाला असो वा अपक्षावाला,
प्रत्येकजण पक्का फेक्या आहे.
मुद्दे सलामत तो निवडणुका पचास,
असा एकूण राजकीय खाक्या आहे.

किती निवडणुका आल्या गेल्या ?
त्याच त्याच मुद्द्यावर गुद्दागुद्दी आहे.
दिल्लीवाले असोत वा गल्लीवाले,
जुन्याच मुद्द्यांना नव्याने सद्दी आहे.

जुन्याच मुद्द्यांच्या पंगतीला,
काहीतरी नवे तोंडी लावले जाते !
किमान समान कार्यक्रम म्हणून,
जुन्याच मुद्द्यांना जिवंत ठेवले जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
फेरफटका-9006
वर्ष-25 वे,
दैनिक झुंजार नेता
14ऑगस्ट2025
 

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...