आजची वात्रटिका
-------------------
कॉमन अजेंडा
ज्याला त्याला जमेल तसा,
मतदार राजा घुलवायचा असतो.
मुद्दा कोणताही असला तरी,
आपला अजेंडा चालवायचा असतो.
कधी विरोधाला विरोध असतो,
कधी कधी पाठिंबाही मूक असतो.
मतदार राजालाच कळत नाही,
कोण बरोबर? कोण चूक असतो?
मतदार घुलवला आणि भूलवला की,
त्याला वाट्टेल तसे कोलावता येते !
पाहिजे तसे झोके देऊन देऊन,
त्याला वाट्टेल तसे झुलवता येते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9021
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
30ऑगस्ट2025

No comments:
Post a Comment