Sunday, August 24, 2025

लोकशाहीची स्वच्छता...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------
लोकशाहीची स्वच्छता
कुणी म्हणतो,मतांची चोरी आहे,
कुणी म्हणतो,मेंदूची चोरी आहे.
निवडणुकीतल्या मतदानाची,
मोठी रंजक अशी स्टोरी आहे.
विरोधकांना खोटे पाडण्याकडे,
अगदी सर्वांचेच जातीने लक्ष आहे.
लोकशाहीच्या उघड्या तमाशाला,
प्रत्यक्ष मतदार राजाची साक्ष आहे.
जर प्रत्येकालाच वाटते आहे,
सगळी घाण निघून जायला पाहिजे !
तर बोटावरच्या शाईची शपथ आहे,
सुरुवात स्वतःपासून व्हायला पाहिजे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-9015
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
24ऑगस्ट2025

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...