आजची वात्रटिका
-------------------
बचेंगे तो और भी लढेंगे...
कुणी कुणाला सुटकेचे मार्ग,
उघड उघड सुचवतो आहे.
कुणी कुणाला वाचवतो आहे,
कुणी कुणाचे पाप पचवतो आहे.
उपकाराची फेड उपकाराने,
वाम मार्गातही जारी आहे.
ज्याला त्याला प्रत्येकालाच,
शेवटी सुटका प्यारी आहे.
भ्रष्टांना भ्रष्टाकडूनच,
भ्रष्ट मार्गाने थारा आहे !
बचेंगे तो और भी लढेंगे...
सगळ्याच भ्रष्टांचा नारा आहे!!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-8996
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
3ऑगस्ट2025

No comments:
Post a Comment