आजची वात्रटिका
-------------------
नसती उठाठेव
कुणाचा नवरा कुठे जातो?
कुणाची बायको कुठे आली?
राजकारणाची पातळी,
बघा कुठपासून कुठे गेली?
वेगवेगळा विचार आहे,
वेगवेगळी विचारधारा आहे.
कुणी प्रतिप्रश्न केला की?
त्यांचा चढलेला पारा आहे.
कुणाचे आचरण सुसंगत,
कुणाचे आचरण विसंगत आहे !
त्यांची अंगत पंगत वाढताच,
राजकीय चर्चा रंगत आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9014
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
23ऑगस्ट2025

No comments:
Post a Comment