साप्ताहिक
वात्रटिका
----------------
निमताळे
ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये,
कसली तरी दंगल आहे.
आशा सर्व अंध भक्तांकडून,
सर्वधर्मसमभावाची टिंगल आहे.
हिंसाचार आणि अशांतता,
नेमकी त्यांच्याच डोक्यात आहे.
या अंध भक्तांचा गजर असतो,
आपला धर्म धोक्यात आहे.
जे जे उदात्त आणि मंगल आहे,
त्यातही ते अमंगल दाखवू शकतात !
ते एवढे निमताळे की,
उठसूठ त्यांच्या भावना दुखवू शकतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
साप्ताहिक सरकारनामा
30 ऑगस्ट 2025
No comments:
Post a Comment