Saturday, August 23, 2025

आरोप :एक संधी...साप्ताहिक वात्रटिका


साप्ताहिक 
वात्रटिका
-----------------------

आरोप:एक संधी

मतांची चोरी झाली, 
पुरावाही उपलब्ध नाही.
मतांची चोरी हा काही,
संविधानिक शब्द नाही.

मतचोरीच्या आरोपावर, 
आयोगाचे प्रत्युत्तर आहे.
आरोपांपेक्षाही वास्तव, 
कितीतरी बत्थर आहे.

प्रत्येकाच्या डोळ्यावरती,
वेगवेगळी धुंदी आहे !
अधिकाधिक पारदर्शकतेसाठी,
ही एक नवी संधी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-992384726
-----------------------
साप्ताहिक सरकारनामा 
23 ऑगस्ट 2025

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...