आजची वात्रटिका
-------------------
आयाराम आणि गयाराम
सगळेच आयाराम गयाराम,
अगदीच एकसारखे आहेत.
विश्वास आणि सहानुभूतीला,
एकसारखेच पारखे आहेत.
गयारामांना विचारतो कोण?
आयारामांचे मात्र स्वागत होते.
आयाराम आणि गयाराम,
दोघेही दयाराम म्हणून जगत होते.
एकाला झाकावे दुसऱ्याला उघडावे,
अशी दोघांची सारखीच तऱ्हा आहे!
दोघांच्याही सुखदुःखाचा निवाडा,
आपण न केलेलाच बरा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
फेरफटका-9007
वर्ष-25 वे,
दैनिक झुंजार नेता
15ऑगस्ट2025

No comments:
Post a Comment