आजची वात्रटिका
-------------------
वाऱ्या आणि फेऱ्या
यांच्या झाल्या की त्यांच्या,
वाऱ्यावरती वाऱ्या आहेत.
मुंबईपासून दिल्लीपर्यंत,
फेऱ्यावरती फेऱ्या आहेत.
कुणी जागा फिट्ट करतो आहे,
कुणी आपला हट्ट धरतो आहे.
कुणी कुणी पाचर हलवून,
आपला खुट्टा घट्ट करतो आहे.
चिडीचूप शांतता दिसूनही,
दिल्ली वारी बोलते आहे !
एकमेकांची दिल्ली वारी,
परस्परांना सलते आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8999
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
7ऑगस्ट2025

No comments:
Post a Comment