आजची वात्रटिका
-------------------
दानशूरहो....
लोक जसे महाज्ञानी आहेत,
लोक तसे महादानी आहेत.
आपल्या प्राथमिक गरजा कोणत्या?
लोकांच्या कुठे ध्यानी आहेत?
दानधर्माच्या अजब गोष्टी,
आपण वेळोवेळी पाहिल्या आहेत.
पाहिजे तिथे सोडून,
नको तिथे मोकळ्या थैल्या आहेत.
नको तिथे होतो वादविवाद,
नको तिथे मात्र दिलजमाई आहे !
त्यावरती आपण बोलणार कोण?
त्यांची जी बाप आणि आपकमाई आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------
फेरफटका-9011
वर्ष-25 वे,
दैनिक झुंजार नेता
20ऑगस्ट2025

No comments:
Post a Comment