Saturday, August 2, 2025

नोबेलचा आग्रह...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
-------------------

नोबेलचा आग्रह

युद्ध पेटवा, युद्ध थांबवा,
अमेरिकेची चाल आहे.
आपलीच आपल्याकडून,
व्हाईट हाऊस ची लाल आहे.

जागतिक अशांततेवरती,
अमेरिकेचीच छाया आहे.
जणू एखाद्या कसायाला,
बकऱ्याची दया माया आहे.

एवढी एवढी युद्ध थांबवली,
व्हाईट आऊटचा कावा आहे !
डोनाल्ड ट्रम्पचा नोबेल वरती
उठता बसता दावा आहे!!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-8995
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
2ऑगस्ट202

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...