आजची वात्रटिका
-------------------
आपले प्राणीप्रेम
कुठे हत्तीवरून साठमारी,
कुठे कबुतरावरून राडा आहे
माणसांपेक्षाही प्राण्यांचा,
सगळ्यांनाच ओढा आहे.
हे साधेसुधे मॅटर नाही,
हे तर सगळेच कोर्ट मॅटर आहे.
अहिंसक झाले हिंसक,
कबुतराचे गुटर गुटर आहे.
प्राण्यांवरती भूतदया करा,
गरजवंतांकडेही बघत चला !
जित्या जागत्या माणसांबरोबर,
माणसाप्रमाणे वागत चला !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-9000
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
8ऑगस्ट2025

No comments:
Post a Comment