आजची वात्रटिका
-------------------
पक्षांतराची कारणमीमांसा
कुणावर लवकर;कुणावर उशिरा,
नेतृत्वाकडून नक्की अन्याय होतो.
त्यामुळे कुणी विचारू नका,
पक्षांतराचा प्रकार कसा काय होतो?
कधी अन्यायाचा बाऊ केला जातो,
कधी अन्यायाचे समर्थन केले जाते.
कधी मांडला जातो तमाशा,
कधी कधी मात्र किर्तन केले जाते.
आपलीच आपल्याला नसते खात्री,
नेतृत्वावरचाही विश्वास उडला जातो!
नेहमीच तात्पुरता उपाय म्हणून,
राजकीय पक्षच सोडला जातो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9004
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
12ऑगस्ट2025

No comments:
Post a Comment