Monday, August 18, 2025

बेंगॉल फाइल्स...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

बेंगॉल फाइल्स

केरळा फाईलनंतर,
आता बेंगॉल फाईल आहे.
चित्रपटांच्या वादग्रस्ततेची,
सारखीच स्टाईल आहे.

चित्रपटांची वादग्रस्तता,
हा प्रमोशनचा फंडा आहे.
प्रेक्षकांच्या रसिकतेला,
उघड उघड गंडा आहे.

निर्मात्यांच्या भविष्यासाठी,
इतिहास वेठीला धरला जातो !
वैधानिक इशारा देत देत,
सोयीचा इतिहास माथी मारला जातो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
फेरफटका-9009
वर्ष-25 वे,
दैनिक झुंजार नेता
18ऑगस्ट2025
 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...