आजची वात्रटिका
-------------------
मत चोरी
एकावरती झाले आरोप,
उत्तर मात्र दुसराच देतो आहे.
तोंडावर आपटले तरी,
जो तो तोंडसुख घेतो आहे.
चोरी झालीच नाही,
असाच उलटा हेका आहे.
चोरी एवढी मोठी की,
ती चोरी नसून डाका आहे.
फक्त एकच बॉम्ब फुटला,
खरा धमाका तर बाकी आहे !
पळसाला पाने तीन,
ही तर केवळ झाकी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-9001
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
9ऑगस्ट2025

No comments:
Post a Comment