Sunday, August 31, 2025

दैनिक वात्रटिका l 31ऑगस्ट 2025वर्ष- पाचवेअंक -89वा l पाने -54

दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक..
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com

मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका

बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..

आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 31ऑगस्ट 2025
वर्ष- पाचवे
अंक -89वा l पाने -54
अंक डाऊनलोड लिंक  -
https://drive.google.com/file/d/1kTFndXHWyKeVb_NP5x9tCuGBtNjwkP13/view?usp=drivesdk

काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 160
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2011 ते 2025 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या  25+ सदाबहार  वात्रटिका
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय

अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे

इच्छाशक्ती....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

इच्छाशक्ती

सत्ता हातात असली की,
इच्छाशक्ती मारली जाते
सत्ता हातात नसली की,
इच्छाशक्ती स्फुरली जाते.

सत्तेचे आणि इच्छाशक्तीचे,
विसंगत असे नाते आहे.
विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचे,
परस्परांकडून हसे होते आहे.

जसा इकडेही दंभ आहे,
तसा तिकडेही दंभ आहे !
इच्छाशक्तीच्या नावाने,
सगळीकडेच बोंबाबोंब आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-9022
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
31ऑगस्ट2025
 
Saturday, August 30, 2025

दैनिक वात्रटिका l 30ऑगस्ट 2025वर्ष- पाचवेअंक -88वा l पाने -57

दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक..
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com

मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका

बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..

आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 30ऑगस्ट 2025
वर्ष- पाचवे
अंक -88वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक  -
https://drive.google.com/file/d/1ibLOT2_ZZUXnOf1W0qeZKLW3Dvs0SDMD/view?usp=drivesdk

काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 159
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2011 ते 2025 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या  25+ सदाबहार  वात्रटिका
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय

अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे

निमताळे.... साप्ताहिक सरकारनामा वात्रटिका

साप्ताहिक 
वात्रटिका
----------------

निमताळे

ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये, 
कसली तरी दंगल आहे. 
आशा सर्व अंध भक्तांकडून,
सर्वधर्मसमभावाची टिंगल आहे.

हिंसाचार आणि अशांतता, 
नेमकी त्यांच्याच डोक्यात आहे. 
या अंध भक्तांचा गजर असतो, 
आपला धर्म धोक्यात आहे.

जे जे उदात्त आणि मंगल आहे,
त्यातही ते अमंगल दाखवू शकतात !
ते एवढे निमताळे की,
उठसूठ त्यांच्या भावना दुखवू शकतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269

--------------------------------
साप्ताहिक सरकारनामा 
30 ऑगस्ट 2025

कॉमन अजेंडा.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

कॉमन अजेंडा

ज्याला त्याला जमेल तसा,
मतदार राजा घुलवायचा असतो.
मुद्दा कोणताही असला तरी,
आपला अजेंडा चालवायचा असतो.

कधी विरोधाला विरोध असतो,
कधी कधी पाठिंबाही मूक असतो.
मतदार राजालाच कळत नाही,
कोण बरोबर? कोण चूक असतो?

मतदार घुलवला आणि भूलवला की,
त्याला वाट्टेल तसे कोलावता येते !
पाहिजे तसे झोके देऊन देऊन,
त्याला वाट्टेल तसे झुलवता येते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9021
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
30ऑगस्ट2025
 
Friday, August 29, 2025

दैनिक वात्रटिका l 29ऑगस्ट 2025वर्ष- पाचवेअंक -87वा l पाने -57

दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक..
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com

मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका

बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..

आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 29ऑगस्ट 2025
वर्ष- पाचवे
अंक -87वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक  -
https://drive.google.com/file/d/1CEBRY-0RmWPwLuS-2BTxYv7EjtD7NdGa/view?usp=drivesdk

काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 158
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2011 ते 2025 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या  25+ सदाबहार  वात्रटिका
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय

अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे

DAILY VATRATIKA...29AUG2025

ज्याचे त्याचे डावपेच...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

ज्याचे त्याचे डावपेच

एकाची असते बंदूक,
दुसऱ्या कुणाचातरी खांदा असतो.
प्रत्येक गोष्टीचे राजकारण होते,
इथेच तर सगळा वांधा असतो.

राजकारणाशिवाय समाजकारण नाही,
समाजकारणाशिवाय राजकारण नाही.
विरोधाला विरोध करणारे आहेत,
तोपर्यंत राजकारणाला मरण नाही.

ज्यांनी जखमा ओल्या केल्या,
त्यांच्याकडूनच पुन्हा मीठ चोळले जाते !
समाजकारणाचा भोळा आव आणून,
सोईस्करपणे राजकारण खेळले जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-9020
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
29ऑगस्ट2025
 
Thursday, August 28, 2025

दैनिक वात्रटिका l 28ऑगस्ट 2025वर्ष- पाचवेअंक -86वा l पाने -57

दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक..
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com

मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका 

बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..

आजचा अंक 
दैनिक वात्रटिका l 28ऑगस्ट 2025
वर्ष- पाचवे
अंक -86वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक  -

काय आहे आजच्या अंकात? 
1) ग्रोकायन 157
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान 
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2011 ते 2025 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या  25+ सदाबहार  वात्रटिका 
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय

अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे

गणेशोत्सवाचा ट्रेंड....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

गणेशोत्सवाचा ट्रेंड

डीपीला बसले, स्टेटसला बसले,
स्टोरी आणि पोस्टलाही बसले आहेत.
प्रत्यक्षाहूनही कितीतरी जास्त,
आभासी युगात गणपती बसले आहेत.

अस्तिक काय? नास्तिक काय?
असा काही भेदभावही उरला नाही.
असा एकही सोशल मीडिया नाही,
जो गणेश भक्तीने भारला नाही.

मीडियापासून सोशल मीडियापर्यंत,
सगळा भक्ती - भावाचा धंदा आहे !
कुणी उघडे डोळे तर,
त्याचीच ट्रोलिंग र्आणि निंदा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-9019
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
28ऑगस्ट2025
 
Wednesday, August 27, 2025

दैनिक वात्रटिका l 27ऑगस्ट 2025वर्ष- पाचवेअंक -85वा l पाने -57

दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक..
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com

मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका 

बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..

आजचा अंक 
दैनिक वात्रटिका l 27ऑगस्ट 2025
वर्ष- पाचवे
अंक -85वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक  -

काय आहे आजच्या अंकात? 
1) ग्रोकायन 156
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान 
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2011 ते 2025 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या  25+ सदाबहार  वात्रटिका 
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय

अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे

टाईमपास ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------
टाईमपास
लोक हसतात खिदळतात,
म्हणतात काय जोकर आहे?
हशा टाळ्या मिळल्या तरी,
ही तुमच्यासाठी ठोकर आहे.
पुढच्यास ठोकर बसली तरी,
मागचे शहाणे होत नाहीत.
याची तुम्हाला लाज वाटू द्या,
लोक गांभीर्याने घेत नाहीत.
प्रबोधनाशिवाय मनोरंजनाचा,
अजिबातच ध्यास घेऊ नका !
फक्त विदूषकी चाळे करीत,
लोकांचा टाईमपास होऊ नका !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-9018
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
27ऑगस्ट2025

दैनिक वात्रटिका l 26ऑगस्ट 2025वर्ष- पाचवेअंक -84वा l पाने -57

दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक..
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com

मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका

बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..

आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 26ऑगस्ट 2025
वर्ष- पाचवे
अंक -84वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक  -
https://drive.google.com/file/d/1cTqypjaINNBLf92P_X0cJ9HOFzqKPXhJ/view?usp=drivesdk

काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 155
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2011 ते 2025 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या  25+ सदाबहार  वात्रटिका
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय

अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे

Tuesday, August 26, 2025

दैनिक वात्रटिका l 25ऑगस्ट 2025वर्ष- पाचवेअंक -83वा l पाने -57

दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक..
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com

मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका

बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..

आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 25ऑगस्ट 2025
वर्ष- पाचवे
अंक -83वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक  -
https://drive.google.com/file/d/1OKipe3Vtsd9lGiJY2COOBoATYJKWRGs3/view?usp=drivesdk

काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 154
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2011 ते 2025 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या  25+ सदाबहार  वात्रटिका
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय

अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे

आदर्श विचार....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

आदर्श विचार

काही पुरस्कार भेटले जातात,
काही पुरस्कार लाटले जातात.
आदर्श शिक्षक पुरस्कारच,
सर्वाधिक प्रमाणात वाटले जातात.

जणू गल्लीपासून दिल्लीपर्यंत,
आदर्श शिक्षकांची खाणच खाण आहे.
त्याला याचे ज्ञान नक्की होऊ शकते,
ज्याला वास्तवाची खरी जाण आहे.

आदर्श आहात;आदर्शच रहा,
पुरस्कारांची वेगळी खेळी नको !
उठसूठ याच्या त्याच्या दारात,
आदर्श पुरस्कारांसाठी झोळी नको !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
फेरफटका-9017
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
26ऑगस्ट2025
 
Monday, August 25, 2025

दैनिक वात्रटिका l 24ऑगस्ट 2025वर्ष- पाचवेअंक -82वा l पाने -57

दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक..
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com

मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका 

बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..

आजचा अंक 
दैनिक वात्रटिका l 24ऑगस्ट 2025
वर्ष- पाचवे
अंक -82वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक  -

काय आहे आजच्या अंकात? 
1) ग्रोकायन 153
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान 
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2012 ते 2025 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या  25+ सदाबहार  वात्रटिका 
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय

अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे

नंबरी गँग ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

नंबरी गँग

जन्मतारखा आणि गाडीक्रमांक झाले,
आता मोबाईलचेही लकी नंबर आहेत.
असल्या नंबरी गँगचे तर,
जिकडे बघावे तिकडे मेंबर आहेत.

जसे लकी नंबर्स आहेत,
तसे अनलकी नंबर्सही आहेत.
असल्या नंबरीपणावर विश्वास ठेवणारे,
पाहिजे तेवढे मेंबर्सही आहेत.

लकी असतात ना अनलकी असतात,
शेवटी आकडे ते आकडे असतात !
त्यांना साधे सरळ वाटणार कसे ?
जे जे स्वभावानेच वाकडे असतात!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-9016
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
25ऑगस्ट2025
 
Sunday, August 24, 2025

दैनिक वात्रटिका l 23ऑगस्ट 2025वर्ष- पाचवेअंक -81वा l पाने -57

दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक..
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com

मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका

बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..

आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 23ऑगस्ट 2025
वर्ष- पाचवे
अंक -81वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक  -
https://drive.google.com/file/d/1TUdYsIfnfszLSOHj7joELYfbrYYS087U/view?usp=drivesdk

काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 152
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2012 ते 2025 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या  25+ सदाबहार  वात्रटिका
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय

अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे

लोकशाहीची स्वच्छता...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------
लोकशाहीची स्वच्छता
कुणी म्हणतो,मतांची चोरी आहे,
कुणी म्हणतो,मेंदूची चोरी आहे.
निवडणुकीतल्या मतदानाची,
मोठी रंजक अशी स्टोरी आहे.
विरोधकांना खोटे पाडण्याकडे,
अगदी सर्वांचेच जातीने लक्ष आहे.
लोकशाहीच्या उघड्या तमाशाला,
प्रत्यक्ष मतदार राजाची साक्ष आहे.
जर प्रत्येकालाच वाटते आहे,
सगळी घाण निघून जायला पाहिजे !
तर बोटावरच्या शाईची शपथ आहे,
सुरुवात स्वतःपासून व्हायला पाहिजे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-9015
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
24ऑगस्ट2025

Saturday, August 23, 2025

दैनिक वात्रटिका l 22ऑगस्ट 2025वर्ष- पाचवेअंक -80वा l पाने -57

दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक..
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com

मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका

बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..

आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 22ऑगस्ट 2025
वर्ष- पाचवे
अंक -80वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक  -
https://drive.google.com/file/d/1H0F75TztZdf9i-fS4L_N8gLbi5OJw3It/view?usp=drivesdk

काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 151
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2012 ते 2025 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या  25+ सदाबहार  वात्रटिका
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय

अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे

आरोप :एक संधी...साप्ताहिक वात्रटिका

साप्ताहिक 
वात्रटिका
-----------------------

आरोप:एक संधी

मतांची चोरी झाली, 
पुरावाही उपलब्ध नाही.
मतांची चोरी हा काही,
संविधानिक शब्द नाही.

मतचोरीच्या आरोपावर, 
आयोगाचे प्रत्युत्तर आहे.
आरोपांपेक्षाही वास्तव, 
कितीतरी बत्थर आहे.

प्रत्येकाच्या डोळ्यावरती,
वेगवेगळी धुंदी आहे !
अधिकाधिक पारदर्शकतेसाठी,
ही एक नवी संधी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-992384726
-----------------------
साप्ताहिक सरकारनामा 
23 ऑगस्ट 2025

नसती उठाठेव...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

नसती उठाठेव

कुणाचा नवरा कुठे जातो?
कुणाची बायको कुठे आली?
राजकारणाची पातळी,
बघा कुठपासून कुठे गेली?

वेगवेगळा विचार आहे,
वेगवेगळी विचारधारा आहे.
कुणी प्रतिप्रश्न केला की?
त्यांचा चढलेला पारा आहे.

कुणाचे आचरण सुसंगत,
कुणाचे आचरण विसंगत आहे !
त्यांची अंगत पंगत वाढताच,
राजकीय चर्चा रंगत आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9014
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
23ऑगस्ट2025
 
Friday, August 22, 2025

आजचा अंक दैनिक वात्रटिका l 21ऑगस्ट 2025वर्ष- पाचवेअंक -79वा l पाने -57

दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक..
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com

मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका 

बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..

आजचा अंक 
दैनिक वात्रटिका l 21ऑगस्ट 2025
वर्ष- पाचवे
अंक -79वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक  -
काय आहे आजच्या अंकात? 
1) ग्रोकायन 150
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान 
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2012 ते 2025 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या  25+ सदाबहार  वात्रटिका 
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय

अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे

भूतदयेचे प्राणीशास्त्र....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

भूतदयेचे प्राणीशास्त्र

हत्ती झाला, कबूतर झाले,
आता चर्चेमध्ये डुक्कर आहे.
प्राणी म्हणाले प्राण्यांना,
आपल्यासाठी घी मे शक्कर आहे.

खऱ्याखुऱ्या गरजवंतांची तर,
दोन्ही हात जोडून गयावया आहे.
राजकारण्यांनासोबत लोकांनाही,
हल्ली जरा जास्तच भूतदया आहे.

सारे काही राजकारणासाठी,
उगीचच असा राजकीय चंग नको !
भूतदया तर नक्की करावी,
पण त्याला धार्मिक रंग नको !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-9013
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
22ऑगस्ट2025
 
Thursday, August 21, 2025

दैनिक वात्रटिका l 20ऑगस्ट 2025वर्ष- पाचवेअंक -78वा l पाने -57

दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक..
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com

मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका 

बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..

आजचा अंक 
दैनिक वात्रटिका l 20ऑगस्ट 2025
वर्ष- पाचवे
अंक -78वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक  -

काय आहे आजच्या अंकात? 
1) ग्रोकायन 149
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान 
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2012 ते 2025 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या  25+ सदाबहार  वात्रटिका 
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय

अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे

बापू,संग्राम अजून जारी आहे

आजची वात्रटिका
-------------------

बापू,संग्राम अजून जारी आहे

उघड उघड हिंसाचाराचे किर्तन,
फिरून फिरून पुन्हा पुन्हा,
नथुरामचीच बारी आहे.
बापू,संग्राम अजून जारी आहे.

नको त्याला थोपटू लागले,
नको त्याला धोपटू लागले.
सत्याच्या प्रयोगाची चोरी आहे,
बापू,संग्राम अजून जारी आहे.

अधर्मच झाला धर्म,
अहिंसा आणि सत्याग्रह तर,
त्यांच्याकडून हसण्यावारी आहे !
बापू,संग्राम अजून जारी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-9012
वर्ष-25 वे,
दैनिक झुंजार नेता
21ऑगस्ट2025
 
Wednesday, August 20, 2025

दैनिक वात्रटिका l 19ऑगस्ट 2025वर्ष- पाचवेअंक -77वा l पाने -57

दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक..
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com

मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका 

बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..

आजचा अंक 
दैनिक वात्रटिका l 19ऑगस्ट 2025
वर्ष- पाचवे
अंक -77वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक  -

काय आहे आजच्या अंकात? 
1) ग्रोकायन 148
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान 
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2012 ते 2025 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या  25+ सदाबहार  वात्रटिका 
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय

अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे

दानशूरहो....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

दानशूरहो....

लोक जसे महाज्ञानी आहेत,
लोक तसे महादानी आहेत.
आपल्या प्राथमिक गरजा कोणत्या?
लोकांच्या कुठे ध्यानी आहेत?

दानधर्माच्या अजब गोष्टी,
आपण वेळोवेळी पाहिल्या आहेत.
पाहिजे तिथे सोडून,
नको तिथे मोकळ्या थैल्या आहेत.

नको तिथे होतो वादविवाद,
नको तिथे मात्र दिलजमाई आहे !
त्यावरती आपण बोलणार कोण?
त्यांची जी बाप आणि आपकमाई आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------
फेरफटका-9011
वर्ष-25 वे,
दैनिक झुंजार नेता
20ऑगस्ट2025
 
Tuesday, August 19, 2025

व्यवहारिक तह...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

व्यवहारिक तह

संघर्ष आणि विरोधाचे,
मार्ग त्यांनी टाळले आहेत.
जे कालपर्यंत भुंकत होते,
तेच त्यांनी पाळले आहेत.

कालचा विरोध आणि संघर्ष,
भुंकणारेही टाळीत आहेत.
आपली शेपटी,आपला गोंडा,
पाहिजे तसा घोळीत आहेत.

सर्वांनाच नसले तरी,
खूप जणांना हे मोह आहेत !
लढाई सुरू होण्याअगोदरच,
त्यांचे व्यवहारिक तह आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
फेरफटका-9010
वर्ष-25 वे,
दैनिक झुंजार नेता
19ऑगस्ट2025
 
Monday, August 18, 2025

आजचा अंकदैनिक वात्रटिका l 18ऑगस्ट 2025वर्ष- पाचवेअंक -76वा l पाने -57

दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक..
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com

मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका

बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..

आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 18ऑगस्ट 2025
वर्ष- पाचवे
अंक -76वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक  -
https://drive.google.com/file/d/1JDcCh-eq7I_kxTkKX1_ExJlqLzcP5HOB/view?usp=drivesdk

काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 146
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2012 ते 2025 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या  25+ सदाबहार  वात्रटिका
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय

अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे

बेंगॉल फाइल्स...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

बेंगॉल फाइल्स

केरळा फाईलनंतर,
आता बेंगॉल फाईल आहे.
चित्रपटांच्या वादग्रस्ततेची,
सारखीच स्टाईल आहे.

चित्रपटांची वादग्रस्तता,
हा प्रमोशनचा फंडा आहे.
प्रेक्षकांच्या रसिकतेला,
उघड उघड गंडा आहे.

निर्मात्यांच्या भविष्यासाठी,
इतिहास वेठीला धरला जातो !
वैधानिक इशारा देत देत,
सोयीचा इतिहास माथी मारला जातो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
फेरफटका-9009
वर्ष-25 वे,
दैनिक झुंजार नेता
18ऑगस्ट2025
 
Sunday, August 17, 2025

दैनिक वात्रटिका l 17ऑगस्ट 2025वर्ष- पाचवेअंक -75वा l पाने -57

दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक..
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com

मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका

बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..

आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 17ऑगस्ट 2025
वर्ष- पाचवे
अंक -75वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक  -
https://drive.google.com/file/d/16FJivNQPsmkTtRD0XuV27cq1mjG5HtI-/view?usp=drivesdk

काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 145
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2012 ते 2025 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या  25+ सदाबहार  वात्रटिका
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय

अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे

चला उठा जागे व्हा !...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

चला उठा जागे व्हा !

उपहास करण्यासाठी का होईना,
पुन्हा अण्णा आठवायला लागले.
सगळेच झोपी गेल्यासारखे,
पुन्हा अण्णांना उठवायला लागले.

जे झोपले आहेत त्यांना झोपू द्या,
तुम्ही तरी नीट झोपेतून जागे व्हा.
किमान जो पुढे झाला आहे,
इमानदारीने त्याच्या तरी मागे व्हा.

त म्हटले की ताक भात,
गोष्ट समजून घेतलेलीच बरी असते !
झोपेचे सोंग घेण्यामागेही,
प्रत्येकाची काहीतरी मजबुरी असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-9008
वर्ष-25 वे,
दैनिक झुंजार नेता
17ऑगस्ट2025
 
Saturday, August 16, 2025

दैनिक वात्रटिका l 15ऑगस्ट 2025वर्ष- पाचवेअंक -73 आणि 74वा l पाने -69

दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक..
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com

मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका 

बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..

आजचा अंक 
दैनिक वात्रटिका l 15ऑगस्ट 2025
वर्ष- पाचवे
अंक -73 आणि 74वा l पाने -69
अंक डाऊनलोड लिंक  -

काय आहे आजच्या अंकात? 
1) ग्रोकायन 144
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान 
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2012 ते 2025 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या  40+ सदाबहार  वात्रटिका 
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय

अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे

Friday, August 15, 2025

आयाराम आणि गयाराम ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

आयाराम आणि गयाराम

सगळेच आयाराम गयाराम,
अगदीच एकसारखे आहेत.
विश्वास आणि सहानुभूतीला,
एकसारखेच पारखे आहेत.

गयारामांना विचारतो कोण?
आयारामांचे मात्र स्वागत होते.
आयाराम आणि गयाराम,
दोघेही दयाराम म्हणून जगत होते.

एकाला झाकावे दुसऱ्याला उघडावे,
अशी दोघांची सारखीच तऱ्हा आहे!
दोघांच्याही सुखदुःखाचा निवाडा,
आपण न केलेलाच बरा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
फेरफटका-9007
वर्ष-25 वे,
दैनिक झुंजार नेता
15ऑगस्ट2025
 
Thursday, August 14, 2025

मुद्द्यावरती बोलू काही...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

मुद्द्यावरती बोलू काही

पक्षावाला असो वा अपक्षावाला,
प्रत्येकजण पक्का फेक्या आहे.
मुद्दे सलामत तो निवडणुका पचास,
असा एकूण राजकीय खाक्या आहे.

किती निवडणुका आल्या गेल्या ?
त्याच त्याच मुद्द्यावर गुद्दागुद्दी आहे.
दिल्लीवाले असोत वा गल्लीवाले,
जुन्याच मुद्द्यांना नव्याने सद्दी आहे.

जुन्याच मुद्द्यांच्या पंगतीला,
काहीतरी नवे तोंडी लावले जाते !
किमान समान कार्यक्रम म्हणून,
जुन्याच मुद्द्यांना जिवंत ठेवले जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
फेरफटका-9006
वर्ष-25 वे,
दैनिक झुंजार नेता
14ऑगस्ट2025
 
Wednesday, August 13, 2025

दैनिक वात्रटिका l 13ऑगस्ट 2025वर्ष- पाचवेअंक -71 आणि 72वा l पाने -69

दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक..
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com

मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका

बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..

आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 13ऑगस्ट 2025
वर्ष- पाचवे
अंक -71 आणि 72वा l पाने -69
अंक डाऊनलोड लिंक  -
https://drive.google.com/file/d/11PFi4boJZUpuNFZYz7voPjsA0MYwZ4x_/view?usp=drivesdk

काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 143
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2012 ते 2025 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या  50+ सदाबहार  वात्रटिका
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय

अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे

खाद्यसंस्कृतीचा विजय असो!....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

खाद्यसंस्कृतीचा
विजय असो!

ज्याला खायचे ते खाऊ द्या,
ज्याला प्यायचे ते पिऊ द्या.
ज्याला त्याला स्वातंत्र्य आहे,
त्यांच्या मनासारखे होऊ द्या.

खाणारे आवडीने खातात,
खाणारे निवडीने खातात.
त्यांच्यावरती सक्ती कशाला?
जे आपल्या सवडीने खातात.

प्रत्येकाचे सहअस्तित्व,
चिरंजीव आणि अजय असो!
ज्याच्या त्याच्या खाद्यसंस्कृतीचा,
अगदी मनापासून विजय असो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
फेरफटका-9005
वर्ष-25 वे,
दैनिक झुंजार नेता
13ऑगस्ट2025
 
Tuesday, August 12, 2025

पक्षांतराची कारणमीमांसा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

पक्षांतराची कारणमीमांसा

कुणावर लवकर;कुणावर उशिरा,
नेतृत्वाकडून नक्की अन्याय होतो.
त्यामुळे कुणी विचारू नका,
पक्षांतराचा प्रकार कसा काय होतो?

कधी अन्यायाचा बाऊ केला जातो,
कधी अन्यायाचे समर्थन केले जाते.
कधी मांडला जातो तमाशा,
कधी कधी मात्र किर्तन केले जाते.

आपलीच आपल्याला नसते खात्री,
नेतृत्वावरचाही विश्वास उडला जातो!
नेहमीच तात्पुरता उपाय म्हणून,
राजकीय पक्षच सोडला जातो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9004
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
12ऑगस्ट2025
 
Monday, August 11, 2025

दैनिक वात्रटिका l 11ऑगस्ट 2025वर्ष- पाचवेअंक -70 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक..
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com

मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका

बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..

आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 11ऑगस्ट 2025
वर्ष- पाचवे
अंक -70 वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक  -
https://drive.google.com/file/d/141cg1Q_P9PEH23eQXIVuQX5-nUw9fM59/view?usp=drivesdk

काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 142
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2012 ते 2025 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या  50+ सदाबहार  वात्रटिका
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय

अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे

चोरीकडून हॅकिंगकडे...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

चोरीकडून हॅकिंगकडे

आमची इच्छा असून सुद्धा,
ते दोघे आमच्याकडे आले नाहीत.
सत्ता स्थापन करण्याचे,
आमचे इरादे पूर्ण झाले नाहीत.

मतदान चोरीची चर्चा,
ईव्हीएम हॅकिंगकडे वळली आहे.
कुणा कुणाची चिप चोरी गेली ?
ज्याची त्याला गोष्ट कळली आहे.

मतदान चोरीच्या वास्तवाला,
ईव्हीएम हॅकिंगचा उतारा आहे !
ज्याच्या त्याच्या खऱ्या विजयावर,
मतदान चोरीचा पोतारा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
फेरफटका-9003
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
11ऑगस्ट2025
 
Sunday, August 10, 2025

दैनिक वात्रटिका l 10ऑगस्ट 2025वर्ष- पाचवेअंक - 68 आणि 69 वा l पाने -66

दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक..
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com

मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका 

बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..

आजचा अंक 
दैनिक वात्रटिका l 10ऑगस्ट 2025
वर्ष- पाचवे
अंक - 68 आणि 69 वा l पाने -66
अंक डाऊनलोड लिंक  -

काय आहे आजच्या अंकात? 
1) ग्रोकायन 141
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान 
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2012 ते 2025 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या  50+ सदाबहार  वात्रटिका 
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय

अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे

देवा शपथ सांगतो... साप्ताहिक सरकारनामा वात्रटिका

साप्ताहिक 
वात्रटिका
---------------------------

देवा शपथ सांगतो...

जिकडे बघावे तिकडे,
आरोपी निर्दोष सुटायला लागले. 
कायदा आंधळा असतो, 
हे पुराव्यानिशी वाटायला लागले

लोकांचे गैरसमज होऊ लागले,
आपली न्यायदेवता वेंधळी आहे, 
डोळ्यावरची पट्टी निघाली तरी, 
अजूनही न्यायदेवता आंधळी आहे.

न्यायदेवतेवरच्या लोकविश्वासाला,
उठसूट हातोड्याचा झटका आहे !
पुरावे सिद्ध झाले नाहीत म्हणून, 
आरोपींची निर्दोष सुटका आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-----------------------------
साप्ताहिक सरकारनामा
 9ऑगस्ट 2025 

बोगसगिरी ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

बोगसगिरी

बोगस मतदानाच्या जोडीला,
बोगस मतदारांची जोड आहे.
भारतीय लोकशाहीला,
बोगसगिरीची जुनीच खोड आहे.

बॅलेट पेपर पासून ईव्हीएम पर्यंत,
बोगसगिरीची परंपरा कायम आहे.
बोगसगिरीशिवाय निवडणूक नको,
जणू असाच अलिखित नियम आहे.

वाढती सत्तापि पासू वृत्ती हीच,
बोगसगिरीची आई आहे !!
बॅलेट पेपर असो ईव्हीएम,
साक्षीदार बोटावरची शाई आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
फेरफटका-9002
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
10ऑगस्ट2025

Saturday, August 9, 2025

मत चोरी.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

मत चोरी

एकावरती झाले आरोप,
उत्तर मात्र दुसराच देतो आहे.
तोंडावर आपटले तरी,
जो तो तोंडसुख घेतो आहे.

चोरी झालीच नाही,
असाच उलटा हेका आहे.
चोरी एवढी मोठी की,
ती चोरी नसून डाका आहे.

फक्त एकच बॉम्ब फुटला,
खरा धमाका तर बाकी आहे !
पळसाला पाने तीन,
ही तर केवळ झाकी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-9001
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
9ऑगस्ट2025
 
ऑपरेशन फोडाफोडी

आजची वात्रटिका ---------------------------- ऑपरेशन फोडाफोडी आज यांचे त्यांचे फुटले, उद्या दुसऱ्याची बारी आहे ऑपरेशन फोडाफोडी, सगळीकडूनच जारी...