Thursday, March 12, 2020

कोरोनाची बाधा

आजची वात्रटिका
---------------------------------------
कोरोनाची बाधा
कोरोना आपले हातपाय,
चांगलेच पसरू लागला.
कुणी दाखवतो माणुसकी,
कुणी ती विसरू लागला.
कुणी मांडला बाजार,
कुणी पोळ्या भाजतो आहे.
ब्रेकींग न्यूज म्हणून,
फक्त कोरोना गाजतो आहे.
आयती आलेली संधी,
प्रत्येकजण साधीत आहे !
कोरोनाच्या अफवांनी तर,
सगळे जगच बाधीत आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5744
दैनिक पुण्यनगरी
12मार्च 2020

No comments:

daily vatratika...3april2025