Sunday, March 15, 2020

कोरोनाची दहशत

आजची वात्रटिका
---------------------------------------
कोरोनाची दहशत
प्रत्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही
कोरोनाला टरकू लागले.
कोरोनाच्या अफवांचे लोण,
आपल्याकडे सरकू लागले.
कोरोनाची दहशत एवढी की,
जणू कोरोना रोगांचा दादा आहे !
बातम्या आणि व्यंगचित्राबरोबर
आमच्या वात्रटिकांनाही
सध्या कोरोनाची बाधा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5747
दैनिक पुण्यनगरी
15मार्च 2020
----------------------------------------
#कोरोना

No comments:

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...