Tuesday, March 31, 2020

वस्त्रहरण

आजची वात्रटिका
---------------------------------------
वस्त्रहरण
कुणाचे कुडमुडे,
कुडकुडायला लागले.
कुणाचे पोपट
तडफडायला लागले.
कुंडलीवाल्यांना सुद्धा
ग्रह दशेचा मेळ नाही.
राहू म्हणाला केतुला,
हा साधासुधा खेळ नाही.
तमाम ज्योतिषांचे
जाहीर वस्त्रहरण आहे!
या सर्व वर्तमानाला,
कोरोना हेच कारण आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
सूर्यकांती
31मार्च2020
----------------------------- --------------
#कोरोना

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...