Sunday, March 29, 2020

थँक्यू कोरोना

बाल वात्रटिका
---------------------------------------
थँक्यू कोरोना
सगळेच पोलीसकाका आता,
पोलीसदादा वाटू लागले.
जे बंदी मोडून रस्त्यावर आले,
त्यांना चांगलेच रेटू लागले.
लहान व्हायचे दिवस,
घरातल्या मोठ्याला आले,
कोरोनामुळे सगळेच मोठाले,
आमच्या वाट्याला आले.
शाळा झाल्या सुन्या सुन्या,
डॉक्टरकाका देव वाटू लागले,
न्यूज चॅनलच्या बातम्यांमुळे,
अंगावर काटे फुटू लागले.
नकट्या नाकाच्यांना सांगा,
आम्हीच सत्य शिंकू शकतो !
वाट्टेल ती किंमत देऊन,
माणूसच जिंकू शकतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
सूर्यकांती
29मार्च2020
----------------------------- --------------
#कोरोना

No comments:

वडाची साल.. ...